देश आणि संस्कृती – कोलंबिया

हा देश दक्षिण अमेरिकेत असून, या देशाच्या सीमा व्हेनेझुएला, इक्वेडोर, पेरू, ब्राझील आदी देशांना लागून आहे. स्पेनपासून या देशाला २० जुलै १८१० मध्ये स्वातंत्र्य मिळाले. या देशाची राजधानी बोगोटा आहे. येथील लोकांची भाषा स्पॅनिश आहे. बहुतेक लोकवस्ती ही डोंगरमाथा आणि समुद्रकिनारी वसलेली आहे. या देशाला बहुतेक पर्यटक नाताळ आणि या देशाच्या स्वातंत्र्य मिळालेल्या महिन्यात भेट देतात. कारण येथे त्या काळात सर्वाधिक विविध उत्सव साजरे केले जातात. कार्निव्हल दी बोगोटा हा उत्सव उन्हाळ्यात बोगोटा शहरात पाच दिवस साजरा केला जातो. विविध प्रकारची नृत्ये, खेळ, समारंभाचे आयोजन केले जाते. येथील लोक मांसाहार अधिक पसंत करतात. बंधेजा पैसा, अजिऍको (चिकन सूप), सॅकोचो (चिकन, मासे) आदी येथील आवडते खाद्य पदार्थ आहेत. येथील संस्कृतीवर स्पॅनिशव्यतिरिक्त कॅरेबियन संस्कृतीचा प्रभाव आहे.

~ by manatala on ऑगस्ट 1, 2007.

यावर आपले मत नोंदवा