चांदोबा नाही भागला!-(चंद्रकांत वाकडे)

“आई – मुलांचे मासिक’ ही बिरुदावली सार्थ करणारा “चांदोबा’ गेल्या महिन्यात ६० वर्षांचा झाला! पण आम्ही त्याला आजोबा म्हणणार नाही. कारण या चंद्रास क्षयाचा शाप नाही- हा जन्मापासून आहे तसाच गोलगरगरीत आहे, ताजा आहे, प्रसन्न आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर हे खेळाडू अगदी निवृत्त झाले तरी आपले त्यांच्याशी “अरे, तुरेचे’च भावबंध असतात – तसेच या “चांदोबा’ मासिकाशी आमचे आहेत. …….
बालविद्यामंदिर, आई-वडील, शिक्षक आणि चांदोबा यांनी आमचं जीवन संस्कारबद्ध केलं. चांदोबा मासिक सुसंवादी आहे; आजही तेवढंच कोमल, कणखर आहे- जेवढं साठ वर्षांपूर्वी होतं. बालपणी आम्ही वडिलांच्या पगाराची वाट पाहायचो – चांदोबा मासिकाच्या खरेदीसाठी आई-वडिलांना चिंता असायची. महिन्याच्या खर्चाच्या तोंडमिळवणीची. आमचं भावविश्‍व चांदोबाशी निगडित होतं. “चांदोबा’ छडी हातात नसलेला सर्वोत्तम शिक्षक होता. साधे अर्धगर्भ शब्द, सुंदर रंगीत बोलकी चित्रं, चित्रकथा, विविध विषयांची नावीन्यपूर्णता, फोटोशीर्षकांची विचारांना चालना देणारी स्पर्धा, ही “चांदोबा’ची बलस्थानं होती / आहेत. “चांदोबा’ मिळविण्यासाठी मैल मैल धावणारं आमचं ते शैशव कधीच अदृश्‍य होणार नाही. नीतीने अनीतीवर, मंगळाने अमंगळावर, सत्याने असत्यावर मिळविलेल्या विजयाच्या सुबोध, बालसुलभ कथा, हे चांदोबाचं वैशिष्ट्य! नीतिकथा, प्रीतिकथा, भीतिकथा – शौर्यकथा, क्रौर्यकथा यात सारं होतं; पण अखेरीस अतिशय सुसह्य, धीर देऊन मुलांचं धारिष्ट्य वाढविणारं, मुलांना सुसंस्कारित करणारं एक संजीवन चांदोबातून दर महिन्याला ओसंडून वाहायचं. कलेशी बोलणारा ६० वर्षांचा इतिहास – चांदोबा आजही तेवढ्याच स्निग्धतेत सांभाळून आहे. विविधतेत एकता साधणारा चांदोबा भारतातील जवळजवळ सर्व बोली भाषांतून – चक्क इंग्रजीतूनही! (जरी इंग्रजी ही इथल्या कुण्या एका राज्याची राजभाषा नसली तरीही!) भारतभेटीतील लहान-मोठ्यांशी हितगुज करतो. आदर, श्रद्धा, कौतुकमिश्रित भावनेनं आम्ही लहानपणी दसऱ्याच्या सरस्वतीपूजनात पाटी-पुस्तकांबरोबर चक्क चांदोबा मासिकाचंही पूजन करायचो! ते सारं उत्स्फूर्त होतं – हृदयातून उगम पावलेलं असायचं. चांदोबानं पालकांनाही हसत खेळत पालकत्व कसं वर्धिष्णू होतं, याचं सहजसुलभ शिक्षण कसं दिलं ते आता प्रौढ झालेल्या पालक पिढीला जाणवतंय

Advertisements

~ by manatala on जून 7, 2008.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: