दिवाळी

दिवाळीचे चार दिवस म्हणजे धमाल! रोज नवनवीन कपडे. तसेच खायला कधी बासुंदी, तर कधी श्रीखंड, कधी खव्याच्या करंज्या, तर कधी पुरणपोळी. पहिला दिवस बायकांची न्हाणी. त्या बोचऱ्या थंडीत उठून अंगणात जायचे. सकाळी चारलाच आईची हाक आम्हाला जागे करायची. तांब्याचा चकचकीत बंब तापलेला असायचा. त्याला बघूनच जणू आमची थंडी गायब व्हायची. रात्री उशिरापर्यंत फराळाचे करायचे व सकाळी सगळ्यांआधी उठून अर्धे काम तीन उरकलेले असायचे. आम्हा मुलींना पाटरांगोळी करून तेल लावायची. स्वतः शिकेकाईनी न्हाऊ घालायची. शिकेकाई डोळ्यात जाऊ नये म्हणून आमचा हा आरडाओरडा, नि शेवटी मऊ हाताने तिने लावलेल्या उटण्याचा वास दिवसभर मागे रेंगाळत असे. दुसरा दिवस पुरुषांची न्हाणी. अभ्यंगस्नान. बाबांची आंघोळीची गडबड, देवांची पूजा, पुरुषांचे फराळ. नंतरचे दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा थाट, पाडव्याचे औक्षण. एकमेकाकडे फराळाची देवाणघेवाण. बाबांचे मित्र फराळाला, तर आमच्या मैत्रिणीही फराळाला. पण मला आजही आठवते, आईने कधी त्रागा केला नाही! सगळे कसे हसतमुखाने, मनापासून करायची. आता आठवले की कळते, की किती सोशिकपणा, किती उरक व आपलेपणा होता आईमध्ये!

Advertisements

~ by manatala on नोव्हेंबर 1, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: