पांडुरंगाची आरती

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा ।।

वामांगीं रखुमाई दिसे दिव्य शोभा ।।

पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा आलें गा ।।

चरणीं वाहे भीमा उध्दरीं जगा ।। ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ।।

रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा ।। जय. ।। धृ.।।

तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं ।।

कांसें पीतांबर कस्तुरि लल्लाटीं ।।

देव सुरवर नित्य येती भेटी ।।

गरुड हनुमंत पुढें उभे राहती ।। जय. ।। ।।

धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा ।।

सुवर्णाचीं कमळें वनमाळा गळां ।।

राई रखुमाबाई राणीया सकळा ।।

ओंवाळीती राजा विठोबा सांवळा ।। जय. ।। ।।

ओंवाळूं आरत्या कुरवंड्या येती ।।

चंदभागेमाजी सोडुनियां देती ।।

दिंड्या पताका वैष्णव नाचती ।।

पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। जय. ।। ।।

आषाढी कातिर्की भक्तजन येती ।।

चंदभागेमाजीं स्नानें जे करिती ।।

दर्शन हेळामात्रें तयां होय मुक्ती ।।

केशवासी नामदेव भावें ओंवाळिती ।। ।।

~ by manatala on ऑक्टोबर 22, 2007.

यावर आपले मत नोंदवा