जपानायण!(भाग २: खान्याचे वांदे)

आम्ही घरीचा जेवन बनावयाचो .जेवणाचं काय? फक्त पिझ्झा, बर्गर का मग?”
असे सेर्वेजन विचारयाचे .”आज काय जेवायचं?” हा सगळ्यात मोठा प्रश्न येथे मला पडतो.
रोज़ रोज़ जेवन बनवुन कंताला आला होता.कसबस काहीतरी जेवन बनावायाचा असा भाग होता.
जेवणाचं सोडा, साध्या नाश्त्याला पण इथे “बेगल” पासून ते ‘एग ऑन रोल’, फळं, डोनटस, हॉट डॉग पर्यंत नाना पदार्थ सेवेला हजर असतात. वेगवेगळ्या प्रांतातील मासे, जॅपनीज सुशी, स्पॅनिश फ़ोंडू आहे.पण आम्ही ठारालो शाकाहारी मानस .प्रत्येकाची खाण्याची तऱ्हा वेगवेगळी. जसे अगदी काट्या चमच्याने खाणारे “सोफेस्टिकेटेड” आहेत तसेच हाताने भुरका घेणारे गोरेही पाहिले. इथल्या लोकांना “स्पाईस” (मसाले)चं भारी वेड. भारतीय हॉटेलात ह्या गोऱ्यांची गर्दी. तेही अगदी मजबूत बिर्याणी वगैरे चापताना दिसतात. इथे घरुन डबा आणणं वगैरे प्रकार आपणच करतो, हि मंडळी बाहेरच खाणारी. एक मजा अशी वाटली की ही मंडळी जर डाएट वर असतील तर सलाड चघळताना दिसतील. एरवी मग तब्येतीत तंगडी मटकावतत लेकाचे!

मी एकतर खवैय्या!, म्हणजे भरपूर खातो अस नाही, पण सतत वेगवेगळं चाखायला नक्कीच आवडत. त्यामुळे खाणं हा माझा आवडता विषय. खरंतर खाणं हाच एक असा विषय आहे ज्यावर कोणीही बोलू शकतो. त्याला वयाची, ज्ञानाची, अनुभवाची, संपत्तीची अट नाही. साऱ्या मानवजातीला कवेत घेणारा असा हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. अगदी इथेही मी पाहिलं, गप्प गप्प वाटणारे हे गोरे, “खायला कुठे काय छान मिळतं?” ह्या प्रश्नानंतर इतके भरभरून सांगू लागतात की बस्स!

~ by manatala on सप्टेंबर 11, 2007.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

 
%d bloggers like this: