दहीहंडी

दहीहंडी भारतीय देवदेवतांमध्ये रामाची कथा ही एका आदर्श अशा विभूतीची गाथा आहे. तर ‘ कृष्णाची लीला ‘ ही सर्वसामान्य माणसाच्या इच्छा , आकांक्षा , वृत्ती-प्रवृत्तींशी समरस झालेल्या आणि सामान्यांत राहून आपलं असामान्यत्व जपणाऱ्या आणि असामान्य असूनही सामान्यांना आपल्यापैकी एक जिवाभावाचा सखा वाटणाऱ्या ‘ पुरुषोत्तमा ‘ ची लोककथा आहे. म्हणूनच राम हा राजा आहे तर कृष्ण हा केवळ अर्जुनाचाच नव्हे तर सर्वांचाच सखा , मित्र , सवंगडी आणि खेळगडी आहे. गोपींच्या रासक्रीडेत रमणारा तो कृष्ण आणि अर्जुनाला युद्धभूमीवर जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारा तत्वज्ञ तोही कृष्णच! त्याची ही दोन्ही रूपं विलोभनीय आहेत. कृष्ण हा असा देव आहे की ज्याच्या बालपणाच्या क्रीडा या प्रत्येक लहान मुलाच्या जीवनात आढळणाऱ्या आहेत. दही-दूध चोरणारा माखनचोर असूनही आईला आपल्या मुखातून विश्वरूपदर्शन घडवण्याइतका थोर आहे. पेंद्यापासून सुदाम्यापर्यंत गोरगरीब गोपाळांचा तो मित्र आहे. म्हणूनच एकट्याने करंगळीवर ‘ गोवर्धन ‘ पेलूनही इतर बाळगोपाळांना आपल्या काठ्या आधाराला लावायला सांगून तो आपल्या पुरुषार्थाचं सामूहिक पुरुषार्थात रूपांतर करणारा ‘ नेता ‘, ‘ टीमलीडर ‘, ‘ कॅप्टन ‘ असतो. म्हणूनच एकमेकांच्या मदतीने दहीहंडी फोडून त्यातला काला प्राप्त करण्याच्या खेळातही एक संदेश असतो. भारतीय क्रीडाप्रकारांच्या इतिहासातला एक अध्याय ‘ दहीहंडी ‘ च्या खेळाचा आहे. मुळात मांजराने दूध , दही , लोणी सहजपणे फस्त करू नये म्हणून शिंक्यात ते अधांतरी टांगून ठेवण्याची प्रथा आदिकाळापासून होती. बाळकृष्णाने दूध , दही , लोणी मटकावता यावं या हेतूने उंचावर ठेवलेल्या शिंक्यापर्यंत पोचण्यासाठी आपल्या सवंगड्यांच्या खांद्यावर उभं राहून ‘ गोविंदा ‘ ची ‘ दहीहंडी ‘ रचली आणि त्यातून ‘ दहीहंडी ‘ चा खेळ खेळातून सण , सणातून उत्सव , उत्सवातून महोत्सव आणि आता ‘ फेस्टिवल ‘ पर्यंत येऊन पोहोचला आहे. मानवी वृत्ती-प्रवृत्ती आणि भारतीय संस्कृती यांच्या संगमातून ‘ गोविंदा ‘ ची क्रीडा आणि ‘ गोविंदा ‘ चे थर उभे करून तोल सांभाळून दहिहंडी फोडण्याची कला लोकाश्रयाने वाढली. कृष्ण गोकुळात बाळलीला करत होता तरी त्याची ‘ दहीहंडी ‘ मात्र महाराष्ट्रात आपली परंपरा निर्माण करून गेली.

Advertisements

~ by manatala on सप्टेंबर 5, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: