गोपाळकाला-दहीहंडी

गोपाळकाला , गोकुळाष्टमी , कृष्णजन्मोत्सव अनेक ठिकाणी धामिर्क विधींच्या स्वरूपात साजरे होतात. पणदहीहंडीचा उत्सव झाला तो खऱ्या अर्थाने मुंबईत आणि त्याचा आधार राहिला मुंबईतला कोकणी माणूस. कृष्णजन्म आणि गोकुळाष्टमी थेट मथुरेपासून उत्तर भारतातल्या अनेक शहरांत साजरी होते पणदहीहंडीचंक्रीडाक्षेत्रमुंबईच आहे! असा मुंबईतलादहीहंडीच्या सार्वजनिक उत्सवाचा इतिहास हा गेल्या १०० वर्षांतला आहे. ‘ सत्यनारायणाची पूजा ही जशी १९०५ पूवीर् कुठेकुणीकधी केल्याचा उल्लेख नाही , किंबहुना भारतीय पूजाविधीपेक्षा आगळ्यावेगळ्या स्वरूपाची ही सत्यनारायणाची पूजा त्याच्या त्या चमत्कारांनी भरलेल्या कथेसह केव्हा कुठून आली आणि रुजली यावर अजूनही मतमतांतरं आहेत. तसंचदहीहंडीसाठी मानवी थर रचूनदहीहंडीफोडण्याची आणिगोकुळाष्टमीसाजरी करण्याची प्रथा नेमकी कोणी , कुठे सुरू केली आणि तिला सार्वजनिक मान्यता आणि लोकप्रियता मुंबईत कुणामुळे मिळाली , याचे अचूक उल्लेख उपलब्ध नाहीत. पण सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय जागृती आणि ऐक्याच्या प्रेरणेतून सुरू झाला. त्याच सुमारास मुंबईत , विशेषत: कोकणी मराठी माणसाच्या मध्य मुंबईतल्या लालबाग , परळ , दादर आणि गिरगाव या परिसरातदहीहंड्यांची प्रथा सुरू झाली , असं म्हणतात.मुंबई शहराचे खास असे जे उत्सव आहेत त्यापैकीदहीहंडीहाएक्सक्लुझिवलीमुंबईचा म्हणता येईल. गणेशोत्सव रोषणाईमुळे पुण्यात अधिक लोकप्रिय आहे तर भव्य गणेशमूतीर् हे मुंबईचं आकर्षण आहे. पण दहीहंडी बघावी तर मुंबईतच. मुंबईत हजाराहून अधिक छोटीमोठी मंडळं दहीहंडीच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर कार्यरत असतात. पूर्वतयारी , नियोजन आणि सराव करून ज्यामध्ये समूहाने लोक सहभागी होतात असादहीहंडीहा एकमेव उत्सव किंवा क्रीडाप्रकार असावा.

Advertisements

~ by manatala on सप्टेंबर 5, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: