चटकदार साल्सा डान्स

जोडीदारासह करायच्या नृत्य प्रकारांमधील एक लयबद्ध गतिमान नृत्यप्रकार म्हणजे ‘साल्सा’. साल्साचे उगमस्थान क्युबा हा देश मानला जातो. तरीही हे नृत्य १०० टक्के क्युबन नाही. इंग्लंड-फ्रान्समधील कण्ट्री डान्समध्ये आफ्रिकन रुग्बाचे सूर मिसळले आणि त्यात क्युबाच्या सॉनची भर पडून हे जोडीदारासह करायचे अनोखे नृत्य बहरले. या नृत्याला साल्सा हे नाव मिळाले, न्यूयॉर्कमध्ये. अमेरिकन स्पॅनिश भाषेत साल्सा म्हणजे चटकदार सॉस. त्यात रुग्बा, सॉन, मांबो, गुजिरा, डँझेन, नेता त्यिादी अनेक नृत्यांच्या छटा मिसळल्या आहेत. मुळात साल्सा हे स्त्री-पुरुष जोडीदारांनी हातात हात गुंफून करायचे नृत्य आहे. उत्स्फुर्तता हा साल्साचा आत्मा आहे. सोशल डान्स म्हणूनच साल्सा विकसीत झाले आहे, तरीही साल्सामध्ये सोलो परफॉर्मन्सला मान्यता आहे. तसंच काही वेळा विशेष समारंभांसाठी प्रदर्शनीय नृत्य म्हणून सादर करताना एकमेकांत अंतर राखून, कलात्मक पदन्यास करूनही साल्सा सादर केले जाते. बहुतेक वेळा साल्सा करताना पुरुष जोडीदार आपल्या नृत्यसखीच्या हालचालींचे नियंत्रण करत असतो. कधी हात सरळ गंुफून तर कधी विरुद्ध हातांचा गोफ करून पुरुषनर्तक आपल्या सखीला वर्तुळाकार वा अर्धवर्तुळाकार गिरक्या घ्यायला लावतो, गिरक्या घेताना कधी तो तिला आपल्या हातांवर झुकवतो तर कधी दोघं विरुद्ध बाजूना झुकतात, टॅपडान्समधील साल्सा, चटपटीत पदन्यास शरीराचे झोकदार हेलकावे, गिरक्यामध्येच अलग होणे, एकमेकांबोवती गोलफिरणं, अशा नजकातदार हालचालींना साल्सा अगदी डौलदारपणे सादर केला जातो. क्युबन लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क, कोलांबेगा अशा साल्साच्या विविध स्टाइल्स प्रसिद्ध आहेत. इंटरनॅशनल डान्स ऑर्गनायझेेशनची र्वल्डसाल्सा चॅम्पियनशिप २००१ साली जिंकणाऱ्या आयझॅक आणि लॉरा अटमन या जोडीने र्वल्ड साल्सा फेडरेशन स्थापन केले असून या फेडरेशनतफेर् होणारी सहावी वाषिर्क साल्सा चॅम्पियनशिप यावषीर् मायामित होणार आहे. दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यात ब्राझील, अजेर्ंटिना, क्युबा इथे ओरिजीनल साल्साचा आनंद तुम्ही मनमुराद लुटू शकता.

Advertisements

~ by manatala on सप्टेंबर 3, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: