ध्यान का व कशासाठी?

शिरीष पै या संवेदनशील साहित्यिक, कवयित्री, ‘हायकू’कार म्हणून प्रसिद्ध आहेत. आचार्य अत्रे यांच्या ‘नवयुग’मध्ये १९५३ साली त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली आणि पुढे ‘मराठा’तही अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

मन म्हणजे विचारांचा अखंड प्रवाह. आपली सर्वसाधारण अवस्था या प्रवाहाविषयी मूच्छिर्त असण्याची- झोपेत असण्याची, अजागृत असण्याची असते. या मूच्छेर्मुळेच तादात्म्य निर्माण होते. मी साक्षात मन आहे असे वाटावयास लागते. जागे व्हा आणि विचाराकडे लक्ष द्या. रस्त्याच्या कडेला उभे राहून रस्त्यांवरून जाणाऱ्या लोकांकडे बघावे, तद्वत या जागे होऊन पाहण्यानेच क्रांती घडून येते. स्वत:चे विचारांशी असलेले तादात्म्य तुटून जाते. या तादात्म्यभंगाच्या अंतिम किनाऱ्यावरच निविर्चार चेतनेचा जन्म होत असतो. चित्ताकाश विचारापासून मुक्त असणे हीच स्वत:ची नैसगिर्क स्थिती आहे. तीच खरी समाधी. ध्यान हा तिचा विधी आहे. समाधी हे त्याचे फळ होय. मात्र ध्यानाविषयी विचार करू नका. विचार ध्याना- संबंधी असला तरी शेवटी तो विचारच होय. स्वत:त प्रवेश करा. बुडून जा.’ हे उद्गार आहेत आचार्य रजनीश ऊर्फ ओशो यांचे. जन्मभर ओशो अनेक विषयांवर बोलले. अनेक क्रांतिकारक विचार त्यांनी समाजापुढे ठेवले. पण समाजाला, जगाला, अवघ्या विश्वाला त्यांनी दिलेली श्रेष्ठ देणगी म्हणजे ध्यान!

ध्यान म्हणजे काय, ते का करावयाचे, त्याचे उद्दिष्ट आणि अंतिम फल म्हणजे काय, हे त्यांनी जसे हरतऱ्हेने समजावून सांगितले, तसे कुणाही तत्त्वचिंतकाने आजवर सांगितले नाही. माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याचे मन. हे मन म्हणजे असंख्य भल्याबुऱ्या विचारांची गदीर्, जिच्या कचाट्यातून माणसाला सुटता येत नाही. विचार म्हणजे विशुद्ध ज्ञान नव्हे- विचार म्हणजे मनाचे उलटसुलट फिरणे. मनाने चालवलेल्या या गोंगाटात परमात्म्याची शांती हरपून गेली आहे. आपल्यात सदैव उपस्थित असलेला परमात्मा आपल्याला सापडतच नाही. म्हणूनच ध्यान करावयाचे, विचारांकडे शांतपणे, साक्षीभावाने, लक्षपूर्वक अखंड पाहावयाचे. इतके लक्षपूर्वक की मग मनाचा लोप होतो आणि अखेर ‘तो’च राहतो- जो आपल्यात आहे- जो निराकार आहे- जो आपणच आहोत. ओशोंच्या काही शिबिरांना उपस्थित राहून मी ध्यान केलेले आहे. आधीचे शांत बैठक घालून श्वासाकडे बघत राहावयाचे ध्यान दूर भिरकावून, उपस्थित साधकांकडून त्यांनी एक वेगळेच ध्यान करवून घेतले. त्यात मी मन:पूर्वक सामील झाले होते. या ध्यानाचे चार चरण होते. चाळीस मिनिटांचे हे ध्यान असून याचे प्रत्येकी दहा मिनिटांचे चार चरण आहेत. पहिल्या चरणात उभे राहून भस्तिका नावाचा जलद श्वास घेऊन जलद सोडण्याचा प्राणायम करणे, दुसऱ्या दहा मिनिटांत सतत ‘हू.. हू… हू…’ असे ओरडणे, तिसऱ्या दहा मिनिटांत मोठ्यामोठ्याने हसायचं, रडायचं, ओरडायचं, चौथ्या दहा मिनिटांत संगीताच्या तालावर हवं तसं नाचायचं आणि ही चाळीस मिनिटं संपताच जमिनीवर शांत पडून वर आकाशाकडे पाहत दिव्यतेचं स्मरण करायचं होतं.

हे ध्यान करताना ओशांेचे अनेक साधक, विशेषत: परदेशी गोरे साधक अमर्याद होत. काही तर बेफाम होत. ही ध्यानपद्धती स्वत:तील सर्व मनोगंडांचे विरेचन करण्यासाठी होती. मीही या ध्यानात सामील झाले. पण मला शांत बसून श्वासाकडे बघण्याचे ध्यान अधिक परिणामकारक आहे, असे वाटले. हा ज्याचा त्याचा प्रश्ान् होता. या धानपद्धतीचे नाव आचार्यजींनी ‘जेट स्पीड मेडिटेशन’ असे ठेवले होते. म्हणजेच दुत गती ध्यान. गेली कित्येक वषेर् मी नेमाने ध्यान करते आहे. क्वचित कधी करीतही नाही. कधी आतील शून्यता आणि निराकारपणा अनुभवते तर कधी डोक्यातला विचारांचा गोंगाट चालूच राहतो. आता वय झाले आहे. फारवेळ बसवत नाही. पण ध्यान का करावयाचे हे आता कळले आहे. स्वत:ला निविर्कार करण्याचा ध्यान हा प्रयोग आहे. पण ध्यानात लाभलेली समाधी ध्यान संपताच लयाला जाते. मग पुन्हा मनाच्या पातळीवर जगत राहणे राहते. मग कुठून सापडणार परमात्मा? काही काळ ध्यान करणे हे खरे ध्यान नव्हे. सतत, अखंड ध्यानात असणे- म्हणजे जागृत राहणे- स्वत:ला पाहणे हेच खरे ध्यान. तेव्हाच कधी नवी परम शक्ती प्राप्त होते. ओशो म्हणतात,”प्रभूको पाना नही। प्रभु होना है।”

शिरीष पै

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 20, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: