गोस्वामी तुलसीदासांचा गौरव

सुरतिय नरतिय नागतिय,
चाहत सब अस होय ।
गोद लिये, हुलसी फिरै,
तुलसी-सो सुत होय ।।

आज श्रावण शुक्‍ल सप्तमी. गोस्वामी तुलसीदासांची जन्मतिथी. संवत १५५४ म्हणजेच सन १४९८ मध्ये श्रावण शुक्‍ल सप्तमीला आजच्या उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील यमुनेच्या काठी असलेल्या राजापूर या गावी तुलसीदासांचा जन्म झाला. त्यांचे आध्यात्मिक गुरू बाबा नरहरिदास तर विद्यागुरू शेष सनातन हे होतो. नरहरिदासांनी त्यांना रामकथेची गोडी लावली म्हणून ते “रामचरितमानस’ सारखे उत्कृष्ट महाकाव्य लिहू शकले. शेष सनातन यांनी त्यांना संस्कृत भाषा आणि वाङ्‌मय यांचे ज्ञान करून दिले. तुलसीदासांनी संपूर्ण भारताची यात्रा करून विविध प्रकारचे अनुभव, देशस्थिती आणि लोकजीवन यांचे सखोल ज्ञान प्राप्त करून घेतले. त्यामुळेच रामचरितमानस म्हणजेच तुलसी रामायण या आपल्या महाकाव्यात जीवनाच्या विविध अंगांचे साक्षेपी चित्रण करण्यात ते यशस्वी झाले.जीवनाच्या ऐहिक आणि पारमार्थिक उन्नतीसाठी त्यांनी रामभक्तीचा मार्ग सर्व समाजासाठी खुला केला. फारच थोड्या कवींना स्वतःच्याच आयुष्यात कीर्ती लाभल्याचे भाग्य प्राप्त होते. ते तुलसीदासांना सुदैवाने लाभले होते. समाजाने त्यांना गोस्वामी ही मानाची पदवी देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. अकबराच्या नवरत्नांपैकी एक रहीम या तुलसीदासांच्या एका समकालीन मुसलमान कवीने वरील दोह्यात तुलसीदासांचा गौरव केला आहे. हा रहीम काही वर्षे काशीचा सुभेदार होता आणि त्याने तुलसीदासांशी मित्रत्वाचे नाते जोडले होते. वरील दोह्याचा मतितार्थ हाच, की या जगातील म्हणजे तिन्ही लोकांतील स्त्रियांना आपण हुलसी (तुलसीदासांच्या आईचे नाव) व्हावे आणि आपल्या पोटी तुलसीदासांसारखा महाकवी आणि युगपुरुष जन्माला यावा, असे वाटते. एक समकालीन मुलसमान कवीने केलेला तुलसीदासांचा हा गौरव म्हणजे त्यांच्या महान योग्यतेचा पुरावाच आहे.

तात्पर्य – घरोघरी तुलसीदास निर्माण व्हावेत असे कितीही वाटले, तरी युगायुगातून एखादाच तुलसीदास निर्माण होतो.

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 20, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: