श्रावणात घननिळा बरसला…

ज्येष्ठ-आषाढाच्या पावसाच्या थयथयाटानं सारं जीवन कसं ओलचिंब होऊन गेलं. सुसाट्याचा वारा आणि पावसाच्या मुसळधारा यांच्या दुहेरी मारानं झाडांच्या फांद्याही थकल्या; माना टाकून गप्पगार पडल्या. पेरण्या झाल्या, लावण्या झाल्या; आता शेतं दोन-चार विता वर येऊन वाऱ्याबरोबर डोलायला लागली. ही रोपटी आणखी मोठी होतील, तेव्हा त्यांच्या हिरव्या पोपटी रंगाला गडद हिरवेपणाची किनार लाभेल. वाऱ्याची झुळूक आली की, पाण्यावरच्या लहरीसारखी अलगद, हळुवार आणि एका संथ लयीत हलणारी ही इवली इवली भाताची रोपटी. त्यांना पाहूनच बालकवींना ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती, फुलराणी ती खेळत होती…’ अशी नाजुक शब्दकळा गवसली…

असा निसर्गाचं जबरदस्त वरदान लाभलेला श्रावण. तो आपल्या भेटीला येतो आहे.

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 12, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: