विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म

नको सांडू अन्न नको सेवू वन। चिंती नारायण सर्वभोगीं।।
नको गुंफो भोगीं नको पडों त्यागीं। लावुनि सरें अंगीं देवाचिया।।

असे म्हणून आता नको पुसो वेळोवेळा या परता उपदेश मला करायचा नाही , असे ते निक्षून सांगतात. विश्वाला कल्याणकारक अशी तुकाराम महाराजांची उपदेशवाणी राजाच्या हृदयापर्यंत जाऊन भिडली. त्यांना खऱ्या संतबोधाची जाणीव झाली. तुकोबारायांचा मनोदय त्यांच्या लक्षात आला , त्यांची राज्यकारभारापासून विन्मुख झालेली वृत्ती त्याकडे सन्मुख झाली. त्यांची मूळची क्षात्रवृत्ती जागी झाली , आणि नव्या दमाने कर्तव्याला सामोरे जायला ते उद्युक्त झाले. हा इष्ट बदल पाहून जिजामातेला खूप आनंद झाला आणि त्यांनी कृतज्ञतेने तुकोबारायांना वंदन केले.

मग शिवाजी राजयाची आई । तुकोबाच्या लागतसें पायीं।।
म्हणे तुमचे उतराई व्हावे कायी। तो पदार्थ काहीं दिसेना।। महिपती

तुकोबारायांनी शिवाजी महाराजांच्या पत्ररूप भेटीतून किंवा प्रत्यक्ष भेटीतून जो उपदेश केला त्यातून तुकोबारायांची थोरवी लक्षात येते. एक सच्चा वारकरी , एक सद्गुरू एक संतश्ाेष्ठ म्हणून त्यांचा महिमा थोर आहेच पण या उपदेशाच्या निमित्ताने ध्यानी येते की , गुरू-शिष्य संबंधाबद्दलची त्यांची जाणीवकळा अतिशय तेज:पुंज आणि उदात्त आहे. यामागे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ। अशी तुकोबारायांची भक्कम तात्त्विक बैठक आहे. त्यांच्या जीवन यात्रेत पावलोपावली त्यांच्या आचार-उच्चारातून या तत्त्वज्ञानाचे उन्मेष प्रकट होत राहिलेले आहेत. अर्थात त्यांच्या निखळ-निर्मळ विचारधारेची गंगोत्री म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीचे प्रेमबोधाचे तत्त्वज्ञान. माऊलींनी भूतमात्रांत भगवंत पाहिला , विश्व हे आपले घर मानले. भंगवंताच्या ठिकाणी उच्च नीच भाव नाही हे त्यांचे आधारसूत्र. म्हणूनच कुल जाती वर्ण ते आघवेचि गा अप्रमाण असा बंडखोर पुकारा त्यांनी केला. उत्तमापासून अंत्यजावरी मुक्तीची सेल मागावी रे असे त्यांचे आश्वासन आहे. पुढे एकनाथ महाराजांनीही ज्ञानाचा एका या एकनिष्ठेने हाच मार्ग चोखाळला , तो कृतीत , उक्तीत उतरवला , समदृष्टीचा डांगोरा पिटवला. उच्च नीच भावांचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात ते म्हणतात , ‘ सुवर्ण विष्णू सुवर्ण श्वान । एक पूज्य एक हीन । विकू जाता मोल समान । निंद्य वंद्य आत्मत्वीं तैसे। नामदेव महाराजही आपल्या अभंगामधून ऐक्यतेची प्रतितीच प्रगट करतात. ते म्हणतात , ” विश्वीं विश्वंभर कोंदलासे एक । भेदाचे कवतुक कैसे सांगा।

पुढे तुकोबारायांनीही याच दृष्टीकोणाचा अंगिकार केला , गुरु-शिष्य संबंधाबद्दल शिवरायांना उपदेश करताना याच अधिष्ठानावरून तुकोबाराय बोलतात. तसे पाहिले तर शास्त्रअधिष्ठित परंपरेमध्ये उच्चवणिर्यांनी नीचवणिर्यांना नमस्कार करायचा नाही असा दण्डक आहे. पण वारकरी परंपरेत पंढरीच्या लोकां नाहीं अभिमान अशी धारणा असल्यामुळे पाया पडे जन एकमेंका असे दृश्य आहे. पाया पडावे हे माझंे भांडवल अशी विनीत विश्वस्पशीर् समदृष्टी हा स्थायीभाव असल्यामुळे , जो उच्चनीचभाव विरहित तोच श्ाेष्ठ संत अशी त्यांची श्ाद्धा आहे. तशीच त्यांची शिकवण आहे. म्हणूनच वर्णाभिमान विसरली याती। एक एका लोटांगणी जाती रे। अशी भक्तीच्या अध्यात्माच्या क्षेत्रातली लोकशाही प्रस्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न वारकरी संतपरंपरेने केला. तुकोबारायांचेही या स्वरूपाचे प्रयत्न अत्यंत गौरवास्पद आहेत. याती शूद असे स्वत:बद्दल सांगणाऱ्या तुकोबारायांच्या अनुयायांमध्ये कित्येक उच्चवणीर्य आहेत , हा त्यांच्या या प्रयत्नाच्या स्तंभावर फडकत राहिलेला यशोध्वज आहे.

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 10, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: