विवाह

विवाह हा आयुष्यातला संस्मरणीय प्रसंग असला, तरी त्यातील दिखाऊपणाला जास्त महत्त्व आलं आहे. या ग्लॅमरस लग्नसोहळ्यांमुळे किती लोकांचा बिझनेस जोरात चालतो किंवा किती लोकांनी नवीन उद्योग या निमित्ताने सुरू केले आहेत, याची नुसती कल्पनाच केलेली बरी! हिंदी चित्रपट आणि मालिकांच्या प्रभावामुळे संगीत, मेंदी, बारात हे अमराठी संस्कृतीतले सोहळे मराठी लग्नात कधी शिरले, ते कळलंच नाही.
गेल्याच आठवड्यात एका राजकीय नेत्याच्या मुलाच्या लग्नाला जाण्याचा योग आला. तिथेही तीच परिस्थिती. हॉटेलमधला हॉल बुक करून संगीत, पाटीर्, डीजे, ऑकेर्स्ट्रा होता. नियोजित वधूवरांपासून सिनेकलाकारांपर्यंत जमलेले सगळे नृत्यात दंग होते. वधू आणि सासूही एकमेकींच्या साथीने नृत्यात रमल्या होत्या. सासू पटकन म्हणाली, ‘आता तर नाचून घेतो. नंतर बघू कोण कुणाला नाचवतं ते?’ आहे की नाही गंमत?

सध्याच्या लग्नसराईत हेच दृश्य सगळीकडे दिसतं. हिंदी चित्रपट आणि मालिकांचा एवढा प्रभाव जनमानसावर पडतोय, की संगीत, मेंदी, बारात हे अमराठी संस्कृतीतले सोहळे मराठी लग्नात कधी शिरले, ते कळलंच नाही. पूवीर् मराठी संस्कृतीत तीन-तीन दिवस लग्नसोहळे चालायचे. आदल्या दिवशी सीमांत पूजन, वाङ्निश्चय, दुसऱ्या दिवशी विवाह सोहळा, तिसऱ्या दिवशी मांडव परतणी वगैरे. पण हळूहळू त्या सोहळ्यांना काट लावून एका दिवसात लग्न उरकण्याची पद्धत पडली. ‘हम आपके है कौन?’ या चित्रपटानंतर साग्रसंगीत लग्नसोहळे हा मराठी संस्कृतीचाही भाग बनत चालला आहे. असे लग्नसोहळे करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. उच्चविद्याविभूषित मुलं-मुली लग्नाचे असे सोहळे करवून घेतात, हेही आश्चर्यच आहे.

हल्ली लग्नाची खरेदी म्हणजे नुसत्या साड्या आणि ड्रेसेस नाही, तर त्यावर मॅचिंग पसेर्स, ज्वेलरी, अगदी चपला, सॅण्डल्ससुद्धा. पूवीर्च्या शालू, पैठणीची जागा डिझाइनर लेहेंगा, चनिया-चोलीने घेतली आहे. संगीत पाटीर्साठी वेगळा ड्रेस, मेंदीसाठी वेगळा. पुरुषांचंही तसंच. शेरवानी, दुपट्टा, ब्लेझर, थ्री-पीस प्रत्येकावर मॅचिंग मोजड्या किंवा शूज. दागिन्यांचीही तीच तऱ्हा. नेकलेस, मंगळसूत्र, पाटल्या, बांगड्या यांची जागा डिझायनर ब्रॅण्डेड दागिने, डायमण्ड, व्हाइट गोल्ड, प्लॅटिनम यांनी घेतली आहे.

वेडिंग प्लानर ही नवी जमात किंवा हा नवा उद्योग सध्या मूळ धरू पाहत आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे लग्नाची तयारी करायला मदत मिळत नाही. कित्येकदा मुलगा अमेरिकेतून आलाय, पंधरा दिवसांत लग्न करून जाणार आहे, अशा परिस्थितीत वेडिंग प्लानर्स मदतीला येतात. तुमच्या लग्नाच्या खेरदीपासून हॉलचं बुकिंग, कॅटरर्स, डेकोरेशन ते अगदी पाठवणीपर्यंत सगळ्याची ते व्यवस्था करतात. अनेकदा परदेशस्थ भारतीय मुद्दाम भारतात येऊन लग्नाची खरेदी करतात. त्यांनाही हे वेडिंग प्लानर्स मदत करतात. लग्नाचं बजेट एक लाखापासून एक कोटी रुपयांपर्यंत असतं. लग्नाची सर्व खरेदी एकाच ठिकाणी करता यावी, म्हणून अलीकडे वेडिंग एक्स्पो या नावाने प्रदर्शनं भरवली जातात. त्यात केवळ कपडे, दागिने नाही, तर मेकअप, अॅक्सेसरीज, वास्तुतज्ज्ञ, भविष्य, टॅरोकार्ड रीडिंग यांचेही स्टॉल्स असतात. इतकंच काय, पण अनेक ट्रॅव्हल एजन्सीज वेगवेगळ्या स्थळांच्या हनिमून पॅकेजेससह या विवाहोत्सुकांचं स्वागत करण्यासाठी तयार असतात. त्यामुळेच सध्या विवाह हा ‘इव्हेण्ट’ झाला आहे. दोन व्यक्तींच्या सहजीवनाचा प्रारंभ खरंच ‘खचिर्क’ झाला आहे

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 10, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: