परदेशी युनिव्हर्सिटीच्या उंबरठ्यावर

परदेशातील युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशअर्ज करताना सर्व कागदपत्रांबरोबर स्टेटमेण्ट ऑफ पर्पज ( एसओपी ) सादर करावं लागतं . या एसओपीच्या माध्यमातून तुमचा प्रभाव युनिव्हर्सिटीतील निवड समितीवर पडतो . कोर्सला प्रवेश घेण्याचा उद्देश , करिअर प्लॅन आदी गोष्टी एसओपीतून स्पष्ट व्हायला हव्यात . याचं कारण म्हणजे त्यावरूनच विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश द्यायचा की नाही , याचा निर्णय निवड समिती घेते . परदेशातील युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेताना अर्जाबरोबरच स्टेटमेण्ट ऑफ पर्पज सादर करावं लागतं . परदेशात उच्चशिक्षणासाठी जाताना विद्याथीर् अनेक बाबींची तयारी करतात . युनिव्हसिर्टी , तिथले कोसेर्स तसंच विविध सोयीसुविधा , बँक लोन , तिथे सादर करावी लागणारी डॉक्युमेण्ट्स आदी सर्व तयारी करावी लागते . परदेशातील युनिव्हसिर्टींमध्ये प्रवेशअर्ज करताना सादर कराव्या लागणाऱ्या सर्व कागदपत्रांबरोबर स्टेटमेण्ट ऑफ पर्पज ( एसओपी ) ही सादर करावं लागतं . हे स्टेटमेण्ट ऑफ पर्पज कसं तयार करायचं , यात कोणते नेमके मुद्दे लिहायचे याची माहिती खूपच कमीजणांकडे असते . हे स्टेटमेण्ट ऑफ पर्पज म्हणजे नक्की काय आणि ते कसं लिहायचं , हेच आज आपण पाहणार आहोत . काही कॉलेजांमध्ये या स्टेटमेण्ट ऑफ पर्पजला लेटर ऑफ इण्टेण्ट म्हणतात , काही ठिकाणी याला पर्सनल स्टेटमेण्ट , तर काही ठिकाणी याला ऑटोबायोग्राफिकल स्टेटमेण्ट म्हटलं जातं . हे स्टेटमेण्ट लिहिण्याचेही काही नियम आहेत . मर्यादित शब्दांत हे स्टेटमेण्ट लिहणं , हासुद्धा यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणावा लागेल . काही युनिव्हसिर्टींमध्ये तुम्हाला याबाबत व्यवस्थित मार्गदर्शन दिलं जातं . पण प्रत्येक युनिव्हसिर्टीत ते मिळेलच , याची खात्री नाही . पण यात एक गोष्ट सारखीच आहे . ती म्हणजे ग्रॅज्युएट स्कूलध्ये तुम्हाला नक्की काय शिकायचं आहे , हा कोर्स तुम्हाला का करायचा आहे , या क्षेत्रातील तुम्हाला असणारा अनुभव आणि कोर्स पूर्ण झाल्यावर / डिग्री मिळाल्यावर तुम्ही काय करणार आहात , याची तुम्ही आखलेली योजना हे चार मुद्दे एसओपीमधून व्यवस्थितरीत्या सादर करायला हवेत . युनिव्हसिर्टीमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा याचा निर्णय अॅडमिशन कमिटी घेते . या समितीला तुमचा एखाद्या कोर्ससाठी त्या युनिव्हसिर्टीमध्ये प्रवेश घेण्यामागची भूमिका काय आहे , त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्या क्षेत्राचा अभ्यास करण्याची खरंच इच्छा आहे की नाही , हे जाणून घ्यायचं असतं . फक्त डिग्री घेण्यासाठीच म्हणून नाही , तर कोर्स पूर्ण केल्यावर त्याचा पुढच्या करिअरमध्ये खरंच उपयोग करणार का , त्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे का हे जाणून घेतल्यावरच समिती तुमचा प्रवेश अर्ज स्वीकारते . विद्यार्थ्यांची त्या क्षेत्रातील क्षमता आणि तिथे यशस्वी होण्याची इच्छा जाणून घेणं , हा या या स्टेटमेण्ट ऑफ पर्पज लिहून घेण्यामागचा उद्देश आहे . म्हणूनच हे स्टेटमेण्ट काळजीपूर्वक लिहायला हवं . तुमचं स्टेटमेण्ट तपासणाऱ्या समितीमध्ये असणारे सदस्य हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ असतात . त्यामुळे एसओपी नीट लिहा . तुम्ही किती विचार करू शकता , हे त्यांना जाणून घ्यायचं असतं , याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही . मास्टर्स डिग्री आणि डॉक्टरेट प्रोग्रामला प्रवेश घेताना यापेक्षा अधिक कमीटमेण्ट आणि फोकस आवश्यक आहे . याचं कारण म्हणजे निवड समिती खूप काळजीपूर्वक विद्यार्थ्यांची निवड करते . या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्ही काय करू शकता , हे समितीला जाणून घ्यायचं असतं . यातून तुम्हाला त्या क्षेत्रातील कामाचा अनुभवही स्पष्ट करून सांगायचा असतो . तुम्हाला या क्षेत्रात खरंच करिअर करायचं आहे , त्यासाठी रिसर्च आणि मेहनत करण्याची तुमची तयारी आहे , हे स्पष्ट होईल , अशा तऱ्हेने एसओपी लिहायला पाहिजे . काही युनिव्हर्सिटीमध्ये काही ठराविक प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित असतं . यासाठी प्रश्न आधी नीट समजून घ्या आणि त्यानुसार व्यवस्थित उत्तर लिहा . उदाहरण : लोकांना बरोबर घेऊन काम करताना आपलं ध्येय ठरवणं , ते साध्य करणं यातील सार्मथ्य आणि कमतरता काय , अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं . यात ध्येय ठरवण्यातील आपलं सार्मथ्य , ध्येय साध्य करण्यातील आपलं सार्मथ्य , लोकांबरोबर काम करतानाचं आपलं सार्मथ्य , ध्येय ठरवण्यातील कमतरता , हे ध्येय गाठण्यातील कमतरता आणि लोकांबरोबर काम करण्यातील आपली कमतरता अशा सहा प्रश्नांची उत्तरं एकाच प्रश्नातून द्यायची आहेत , हे लक्षात घ्या . यातून तुमचा लोकांबरोबर काम करण्याचा अनुभव आणि तुमचं सार्मथ्य कमतरता हे सर्व जाणून घ्यायचं असतं . म्हणूनच एसओपी व्यवस्थितपणे लिहा . साधारणपणे ग्रॅज्युएट स्कूल्सना या एसओपीमधून पुढील गोष्टी जाणून घ्यायच्या असतात : ग्रॅज्युएट स्टडीमागील तुमचा उद्देश स्पेशलायझेशनचा विषय ग्रॅज्युएशननंतरचा करिअर प्लॅन अॅकॅडेमिक कोर्सबरोबरच एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिविटीजसाठी तुमचा फिटनेस कोर्सला नेमक्या त्या स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचं कारण याशिवाय एक व्यक्ती म्हणून तुमची माहिती देणंही यात अपेक्षित आहे . एसओपी लिहिताना या गोष्टी लक्षात ठेवा : अॅडमिशन कमिटीकडे तुमच्यासारखे हजारो एसओपी आलेले असतात . त्यामुळे पाल्हाळ लावता मोजक्या शब्दात आपलं स्टेटमेण्ट तयार करा . कमिटीतील सदस्यांचा वेळ फुकट जाईल , अशा प्रकारे एसओपी लिहिणं टाळा . तुम्ही प्रवेश घेणाऱ्या क्षेत्रातील तुमच्या क्षमता नमूद करायलाच हव्यात . तुमच्या शैक्षणिक कारकीदीर्त एखादी समस्या ( बॅड सेमिस्टर ) आलेली असल्यास तिचं सकारात्मक पद्धतीने स्पष्टीकरण द्या . पीएचडी प्रोग्रामला अर्ज करताना इतरांपेक्षा आपला एसओपी वेगळा होईल , याची काळजी घ्या . असंबंधित माहिती देणं टाळा . डिग्री लेवलवरील तुमची लक्षणीय कामगिरी नमूद करायला विसरू नका . एसओपी लिहून झाल्यावर या क्षेत्रातील एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला दाखवून ते योग्य आहे हे याची खात्री करून घ्या . त्यानंतरच हा एसओपी युनिव्हसिर्टीकडे पाठवा . तसंच वेगवेगळ्या युनिव्हसिर्टींमध्ये अर्ज करताना एकाच स्टाइलमधील एसओपी पाठवू नका . एकच माहिती वेगवेगळ्या तऱ्हेने प्रेझेण्ट करता येईल . एसओपी लिहिताना काळजी घ्यायला हवी , कारण यातून तुमचं इम्प्रेशन त्या सदस्यांवर पडणार आहे आणि त्यातूनच तुमचा प्रवेश निश्चित होणार आहे .

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 10, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: