नव्या जमानातले बूमिंग सेक्टर्स

जमाना बदलतोय आणि त्यासोबत नवनवी सेक्टर पुढे येत आहेत. रिटेल , एविएशन , हॉस्पिटॅलिटी , एण्टरटेन्मेण्ट , आयटी , डिझायनिंग या सेक्टरना असणारी मागणी आणखी वाढणार आहे. यामुळे या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना करिअरसाठी चांगल्या ओपनिंग्ज मिळू शकतात .करिअरमध्ये चांगला ब्रेक मिळावा , अशी वाट अनेक जण पाहत असतील . चांगला जॉब मिळावा म्हणून प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना या वर्षातील बूमिंग ठरू शकणाऱ्या इण्डस्ट्रीत प्रवेश करता येईल . या वर्षात रिटेल , आयटी , एण्टरटेन्मेण्ट , डिझायनिंग यासारख्या काही क्षेत्रांना प्रचंड मागणी येईल , असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत .

ग्लोबलायझेशनचा परिणाम आज अर्थव्यवस्थेवर होत आहे . याचं कारण म्हणजे बदलता काळ आणि लाइफस्टाइल , अत्याधुनिक कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी , सविर्स ओरिएण्टेड अशा नवीन क्षेत्रांचा उदय या अनेक बाबींमुळे वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक प्रोफेशनल्सची गरज निर्माण होऊ लागली आहे . बीपीओ , रिटेल अशी अनेक सविर्स ओरिएण्टेड क्षेत्रं नव्याने उदयाला आली आहेत आणि येत्या काही वर्षांत अशा सविर्स ओरिएण्टेड क्षेत्रांचा व्याप असाच वाढत राहणार आहे . त्यामुळे करिअरच्या हमखास संधी मिळतील , अशा सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत .आज प्रत्येक ठिकाणी कम्प्युटरचा वापर केला जातो . कम्प्युटरच्या साहाय्याने काम पूर्ण करताना वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्सची गरज भासते . त्यामुळे सॉफ्टवेअर्स प्रोग्रामिंग / इंजिनीअर्स / डेव्हलपर्स आदी विविध विषयांचं ट्रेनिंग घेतलेल्यांना इथे जॉब मिळू शकतो . कम्प्युटरच्या मेण्टेनन्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही . कम्प्युटरमध्ये आलेले तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्याचं काम हार्डवेअर इंजिनीअर्स करू शकतात . त्यामुळेच सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजिनीअर्सना आज करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतात , असं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात .

आयटी तंत्रज्ञानही या इण्डस्ट्रीचा भाग बनत आहे . त्यामुळे आयटी प्रोफेशनल्सना इथे बराच वाव आहे . अॅनिमेेशन , वेब डिझायनिंग या क्षेत्रांनाही आज प्रचंड मागणी येऊ लागली आहे . अॅनिमेशन इण्डस्ट्रीची उलाढाल आजपर्यंत तीन हजार कोटींची होती . ही उलाढाल येत्या काही वर्षांत दुप्पट होऊ शकते , असा अंदाज कीतीर् सॉफ्टवेअर अॅण्ड हार्डवेअर इन्फोटेक प्रा . लि . चे एक्झिक्युटिव डायरेक्टर सुधाकर सोनावणे व्यक्त करतात . ही उलाढाल वाढण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ग्लॅमर , फिल्म इण्डस्ट्रीतही या तंत्राचा वापर होऊ लागला असल्याचं ते सांगतात .आज शॉपिंग मॉल्सची संख्या प्रचंड वेगाने वाढतेय , याचं कारण म्हणजे रिटेल इण्डस्ट्रीचा वाढता पसारा . येत्या पाच वर्षांत ही वाढ प्रचंड वेगाने होणार आहे , हे लक्षात घेता कस्टमर केअर , रिटेल मॅनेजमेण्ट आदी विषयांचं ट्रेनिंग घेतलेल्या व्यक्तींना इथे नक्कीच प्रवेश करता येईल , असा अंदाज या क्षेत्रातील प्रोफेशनल्स व्यक्त करत आहेत .

रिटेलप्रमाणेच फायनान्शिअल आणि बँकिंग सेक्टरचा व्यापही वाढत आहे . आंतरराष्ट्रीय बँकांचा आणि कंपन्यांचा भारतातील प्रवेश , यामुळे फायनान्स एक्स्पर्ट म्हणून इथे चांगला ब्रेक मिळवता येईल , आज सेन्सेक्सने १४ हजाराचा पल्ला गाठला आहे . बँका आणि नामांकित कंपन्यांचा भारतातील प्रवेश यामुळे फायनान्स क्षेत्राचा आवाका वाढत आहे .या कंपन्यांचा समावेश स्टॉक एक्सचेंज लिस्टिंगमध्ये झाल्याने त्यांच्या शेअरचा भावही वाढत आहे . कॅपिटल माकेर्ट आणि रिअल इस्टेट तसंच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेण्ट सेक्टरला प्रचंड मागणी येत आहे . पण मागणीच्या तुलनेत स्किलफुल मॅनपॉवरचा अभाव आहे . हेच ध्यानात घेऊन आज विद्यार्थ्यांनी संबंधित क्षेत्राचं ट्रेनिंग घेऊन फायनान्स क्षेत्रात प्रवेश करायला हवा , असं मत टॅक्स आणि इनव्हेस्टमेण्ट कन्सल्टण्ट धनश्री केळकर सांगतात .

इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट सेक्टरचा पसारा वाढत आहे , हे लक्षात घेता इथे इंजिनीअर्सनाही चांगला ब्रेक मिळू शकतो . डिझायनिंगमध्येही विविध पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत . अॅनिमेशन , इण्टिरिअर , गेम किंवा गामेर्ण्ट डिझायनिंगमध्येही येत्या वर्षांत चांगल्या संधी निर्माण होतील , असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत . याचबरोबर आजची प्रचंड मागणी असणारी क्षेत्रं म्हणजे इन्शुरन्स , हॉस्पिटॅलिटी , एविएशन आणि एण्टरटेन्मेण्ट . टीव्ही मालिका , चित्रपट , म्युझिक आल्बम्सना असणारी मागणी पाहता एण्टरटेन्मेण्ट क्षेत्र असंच वाढत राहणार असल्याचं डिजिटल अॅकॅडमीचे डायरेक्टर कातिर्केय तलरेजा सांगतात . रेडिओच्या अनेक चॅनल्सची सुरुवात आणि कमी बजेटमध्येही फिल्म / मालिकांचीही निमिर्ती ; यामुळे या क्षेत्राचं भविष्य उज्ज्वल असल्याचं ते सांगतात .

आज अनेक आजारांचं प्रमाण वाढलं आहे . या आजारांवर मात करण्यासाठी मेडिकल क्षेत्रात करण्यात येणाऱ्या रिसर्च आणि एकंदरच कामकाजामुळे फार्मास्युटिकल आणि हेल्थ सेक्टरमध्ये संबंधित प्रोफेशनल्सना चांगल्या संधी मिळू शकतात .

हॉस्पिटॅलिटी क्षेत्र आजच्या जीवनमानाचा अविभाज्य भाग बनू लागलं आहे . त्यामुळे हॉटेल / ट्रॅव्हल अॅण्ड टूरिझम मॅनेजमेण्ट किंवा तत्सम शिक्षण घेतलेल्यांना चांगल्या संधी मिळू शकतात . याच इण्डस्ट्रीचा भाग म्हणजे एविएशन सेक्टर . नवनवीन एअरलाइन्स कंपन्यांच्या प्रवेशामुळे इथे स्पर्धा निर्माण होऊ लागली , या स्पधेर्चा परिणाम म्हणजे कमी भाड्यात हवाई प्रवास करण्याची संधी सामान्यांनाही मिळू लागली , अर्थातच याचा परिणाम म्हणजे या सेक्टरचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे .त्यामुळे इथल्या एअरक्राफ्ट कंपन्यांमध्ये पायलट , एअर होस्टेस , केबिन क्रू तसंच फ्रण्ट / बॅक ऑफिसमध्ये तरूणांना चांगल्या ओपनिंग्ज आहेत , असं एअरहोस्टेस अॅकॅडमीच्या फाऊण्डर आणि चीफ कन्सल्टण्ट सपना गुप्ता सांगतात .

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 10, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: