पेपरची लाइन… पोस्टपेड ते प्रीपेड

न्यूज चॅनलची संख्या वाढत गेली… इंटरनेट-मोबाइलवरही न्यूजफ्लॅश झळकू लागले. तरी आजही अनेकांचा दिवस सुरू होतो दाराच्या कडीला लावलेला कोराकरकरीत पेपर काढूनच. गेल्या काही वर्षात मुंबईतील वृत्तपत्रांची संख्या वाढली आणि बातम्यांच्या दुनियेतही कमालीचे बदल झाले. बातम्या बदलल्या तसाच पेपरचा धंदाही बदलला. पूवीर् महिन्याच्या शेवटी पेपरवाला बिल घेऊन येत असे ; आता बिलाची लाइन पोहोचली आहे प्रीपेड कूपनपर्यंत!

वृत्तपत्र क्षेत्रातील स्पधेर्वर स्वार होण्यासाठी वृत्तपत्रसमूहांनी आकर्षक योजना सादर केल्या आहेत. प्रीपेडची योजना त्यातलीच. त्यात वर्षभराच्या पेपरचे पैसे आधीच भरलेले असल्याने पेपरवाल्याला बिल द्यायची गरजच नाही. महिनाअखेरीस त्या त्या महिन्याचे प्रीपेड कूपन दिले की झाले. पेपरवाला ते कूपन डीलरला देऊन त्याच्याकडून त्या महिन्याचे पैसे मिळवतो. या व्यवहाराने ग्राहक , वृत्तपत्रांबरोबरच पेपर विक्रेत्यांचाही फायदा झाला आहे.

आथिर्क आघाडीवर पेपरवाल्यांचा फायदा झाला असला तरी रोजच्या कामाचा व्याप मात्र वाढला आहे. पूवीर् मोजकीच वृत्तपत्रे होती. त्यांचे गठ्ठे जमा केले की धंद्याला सुरुवात व्हायची. गेल्या काही वर्षांत वृत्तपत्रांची संख्या तिपटीने वाढली. भल्या पहाटे वृत्तपत्रांच्या गाड्या येईपर्यंत वाट पाहावी लागते. एखाद्या गाडीला उशीर झाला तरी पेपरवाटप सुरू करायला उशीर होतो आणि गिऱ्हाइकाची ओरड सहन करावी लागते.

पेपर वाढले आणि पूवीर् आठवड्यातून एकदा किंवा सणासुदीला येणाऱ्या पुरवण्या रोजच येऊ लागल्या. अंकाच्या गठ्ठ्यासोबत पुरवण्यांचे गठ्ठे उचला. त्या वेगळ्या करून प्रत्येक अंकात भरा. त्यात गोंधळ झाला की गिऱ्हाईक नाराज!

या धंद्यात पैसा असला तरी वाढत्या दगदगीमुळे कामासाठी मुले मिळणे कठीण झाले आहे. काही शे रुपयांसाठी सकाळी लवकर उठण्यापेक्षा पिझ्झा बॉय सारख्या नोकऱ्या करणे मुले पसंत करतात. हे टाळण्यासाठी काही पेपरवाले तर मुलांना पेपर टाकण्यासाठी सायकलऐवजी बाइक देऊ लागले आहेत!

पेपरची लाइन अशी ओळख असणारा वृत्तपत्रांचा हा व्यवसाय कितीही बदलला तरी सकाळी पेपर आला नाही तर आपल्याला जमणार नाही आणि त्या पेपरवाल्यालाही. त्यामुळे उन , पाऊस , थंडी काही असो भल्या पहाटे कानांवर पेपर असा आवाज पडतच राहणार. कारण इंग्लंड-अमेरिकेतही प्रत्येकासाठी टीव्ही , इंटरनेट , मोबाईल असले तरी पेपरचा धंदा बंद झालेला नाही…

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 9, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: