‘पेअर’ फळ

रसाळ आणि गोड चवीचं ‘पेअर’ हे फळ ‘देवाची देणगी’ म्हणून ओळखलं जातं. मऊ आणि रवाळ असलेलं हे फळ तसं सगळीचकडे आवडीने खाल्लं जातं. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात हे फळ उपलब्ध होतं. पेअर हे फळ गुलाबाच्या कुटुंबातलं तर आहेच आणि ते सफरचंदाशीही जोडलं जातं. सफरचंदाप्रमाणे पेअरच्या गाभ्यातही बऱ्याच बिया असतात.

सुमारे तीन हजार वर्षांपूवीर् पेअरचं पहिलं झाड लावल्याची नोंद सापडते. पण काहींच्या मते, अश्मयुगातल्या मानवाने या झाडाचा शोध लावला. वसाहतवाद्यांनी सर्वप्रथम हे फळ अमेरिकेत आणलं. पण अमेरिकेत पहिलं पेअरचं झाड लावलं गेलं ते १६२० मध्ये. पण गमतीचा भाग म्हणजे आजही अमेरिकेला हा फळाचा पुरवठा फ्रान्सहून होतो! १८ व्या शतकापर्यंत पेअर आत्ताएवढं रसाळ आणि मधुर नव्हतं. मात्र त्यानंतर या फळाकडे चांगलं लक्ष पुरवलं गेलं, त्याच्या वेगवेगळ्या जाती विकसित केल्या गेल्या.

पेअरमध्ये भरपूर ‘क’ जीवनसत्व आणि तांबं असतं. हे दोन्ही अॅण्टिऑक्सिडण्ट्सचं काम करतात. त्यामुळे फ्री-रॅडिकल्समुळे होणारी शरीराची हानी भरून निघते. जेव्हा आपण एक पेअर खातो तेव्हा आपण आपल्या शरीराला दररोज आवश्यक असणाऱ्या ‘क’ जीवनसत्वाचा ११.१ टक्के आणि तांब्याचा ९.५ टक्के भाग देत असतो. या फळात भरपूर फायबरही असतं. कोलेस्टेरॉलची पातळी भरपूर वाढलेल्यांना फायबरमुळे बराच फायदा होतो. मधुमेह आणि हृद्विकारांचा त्रास असणाऱ्यांनाही हे फळ खूप ‘फलदायी’ ठरतं.

हे फळ एकदा का पिकलं की लगेचच खराब होतं. त्यामुळे पेअर खरेदी करताना ते गळलेले नाहीत याची खात्री करून घ्यावी. पण त्याबरोबर ते फळ खूपच टणकही असता कामा नये. फळाच्या सालीवर कोणतेही डाग असता कामा नयेत. चांगल्या प्रतीच्या पेअरचा रंग प्रत्येक वेळी एकसारखाच असत नाही. काही जातीच्या पेअरच्या सालीवर तपकिरी रंगाचे पॅच असतात. या पेअरची चवही खूपच छान असते. मात्र ज्या पेअरच्या सालीवर गडद रंगाचे डाग असतील, ते टाळलेले बरे.

पेअर कच्चे असल्यास ते पिकेपर्यंत सर्वसाधारण तापमानातच ठेवावते. जेव्हा त्याची साल थोडी आत ओढल्यासारखी वाटेल तेव्हा ती फळं पिकल्याची खूण असते. असे पेअर खाण्यासाठी तयार असतात. हे पेअर पिकल्यानंतर लगेच खाणार नसाल तर ते फ्रीजमध्ये ठेऊन द्यावेत. अशाने ते काही दिवसांसाठी ताजे राहतील. मात्र तीव्र गंध असलेल्या पदार्थांपासून पेअर लांबच ठेवावेत.

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 8, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: