जमाना परफॉमन्स बाइकचा

काही वर्षांपूवीर् कोणी नवीन बाइक घेतली की पहिला प्रश्न विचारला जायचा तो म्हणजे, ‘मायलेज किती?’ कारण त्यावेळी बाइक हे फक्त प्रवासाचं एक साधन म्हणून वापरण्यात येत असे. बाइक ड्रायव्हिंगच्या आनंदासाठी सुद्धा वापरली जाऊ शकते हे बऱ्याच लोकांच्या ध्यानीमनी नव्हतं. पण मागच्या काही वर्षात परिस्थिती बदलत आहे. पूवीर् मायलेजसाठी बाइक बनवणाऱ्या कंपन्याही आता परफॉर्मन्स बाइक बनवत आहेत. यातल्या तीन कंपन्यांच्या वेगवेगळ्या बाइकचा घेतलेला हा आढावा…

हिरो होंडा

फिल इट, शट् इट, फगेर्ट इट’ या स्लोगनने भारतीयांच्या मनात घर केलं. हिरो होंडा कंपनी आपल्या इकोनो बाइक्ससाठी प्रसिद्ध होती. कंपनीने आपली ही इमेज बदलली ती त्यांची १५०सीसी सेगमेन्ट मधली पहिली बाइक ‘सीबीझेड’ची निमिर्ती करून. १५०सीसीचं इंजिन, रुंद टायर्स, इंटरनॅशनल लूक आणि डिस्क ब्रेक्स ह्या सगळ्याच्या मिश्रणातून बनवलेली ‘सीबीझेड’ अल्पावधीतच लोकप्रिय झाली. हायस्पीडसाठी खास डिझाइन केली असल्याने बाइक वेगात धावताना सुद्धा स्थीर राहते. ह्या बाइकने खऱ्या अर्थाने भारतातल्या परफॉर्मन्स बाइकची सुरूवात केली. ‘सीबीझेड’ लोकप्रिय झाल्यावर बऱ्याच काळानंतर हिरो होंडाने १५०सीसी वरून थेट २२५सीसीचं इंजिन असलेली ‘करिझ्मा’ बाजारात आणली. पण त्याची किंमत प्रचंड असल्याने ती सामान्य ग्राहकाच्या आवाक्याबाहेर होती. काही महिन्यांपूवीर् हिरो होंडाने सीबीझेडची नवीन व सुधारित आवृत्ती ‘सीबीझी एक्सट्रीम’ बाजारात दाखल केली आहे. पण ग्राहकांच्या म्हणण्यानुसार ओरिजिनल सीबीझीची सर कशाला नाही.

बजाज

हमारा बजाज’ या बजाजच्या ब्रीद वाक्यामध्येच सारं काही आलं. बजाजच्या स्कूटर्स अभिमानाने चालवणारे लोक आजही भेटतात. अप्रतिम इंजिनियरींग आणि कमी मेन्टेनन्स असणारी बजाजची वाहनं खूप वर्ष वीना तक्रार धावतात. मागची काही वर्ष इतरांप्रमोच बजाज कंपनीनेही फोर एस चॅम्पियन सारख्या इकोनो बाइक्स बनवल्या होत्या. पण हिरो होंडाने ‘सीबीझी’ आणून नवीन बाजारपेठ खुली केल्यावर बजाजने सुद्धा या स्पधेर्त प्रवेश केला. पण हिरो होंडा पेक्षा एक पाऊल पुढे जाऊन बजाजने र्पल्सरचे १५०सीसी सोबतच १८०सीसी मॉडेल बाजारात दाखल केलं. प्रचंड शक्तीशाली इंजिन, अद्ययावत तंत्रज्ञान आणि मस्क्युलर लूक्स याचा सुरेख संगम असलेल्या या बाइकवर लोकांच्या अक्षरश: उड्या पडल्या. स्पधेर्त उतरलेल्या बजाजने इंटरनॅशनल टेक्नॉलॉजीचा पुरस्कार करीत आपल्या बाइक्समध्ये सतत सुधारणा केल्या. कंपनीनेे पल्सर १५० आणि १८० ला कटिंग एज लूक्स, डिजिटल स्पीडोमीटर, एलईडी टेल लॅम्प्स अशा सुविधांनी नवीन झळाळी दिली आणि त्यामागोमाग लगेचच अजून दोन नवीन बाइक्स आणल्या त्या म्हणजे पल्सर २०० आणि पल्सर २२०. ऑइल कूलर, स्टेप सीट (पी२००) आणि फ्युएल इंजेक्शन, पुढे आणि मागे डिस्क ब्रेक्स, क्लीपऑन हॅण्डलबार्स इत्यादी या बाइक्सची वैशिष्ट्य सांगितली जातात. बजाज कंपनी अजून जास्त सीसीची बाइक निर्माण करणार असल्याची चर्चा आहे.

टिव्हीएस

भारतातल्या रेसिंग बाइक्समध्ये अग्रगण्य असलेलं नाव म्हणजे टिव्हीएस. शोगुन, शॉलिन सारख्या परफॉर्मन्स बाइक देणारी टिव्हीएस कंपनी मधल्या काळात इकोनो बाइक्स बनवण्यातच समाधान मानत होती. पण टिव्हीएसने ‘अपाची’ बाइक आणली आणि कंपनीची प्रतिमाच बदलून गेली. शॉर्ट व्हिल बेस्ड, १५० इंजिन, इंटरनॅशनल लूक असणारी ‘अपाची’ बाइकप्रेमींमध्ये लोकप्रिय झाली. आता अजून एक पाऊल पुढे जाऊन टिव्हीएसने ‘अपाची’चे नवीन मॉडेल ‘अपाची आरटीआर १६०’ ची निमिर्ती केली आहे. १६०सीसीचं अत्याधुनिक इंजिन, डिजिटल स्पीडो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरटीआर अर्थात रेस थ्रोटल रिस्पॉन्स असलेल्या या बाइकचा वेग आणि पीकअप भन्नाट आहे. नावावरूनच ही बाइक कोणासाठी आणि काय उद्देशाने बनवली आहे हे लक्षात येतं. रेसिंग बाइक पासून स्फूतीर् घेतलेल्या डिझाइन्स, स्पोटीर् कलर, क्लीपऑन हॅण्डलबार्स, पेटल शेप डिस्क ब्रेक्स या वैशिष्ट्यांमुळे ही बाइक लक्षवेधी ठरली आहे. लूक्स आणि परफॉर्मन्स सोबातच टिव्हीएसने सेफ्टी ही ध्यानात घेतलेली आहे. अपाची आरटीआर १६० ला भारतातील सर्वात मोठा २७०सीसी चा डिस्क ब्रेक आहे. त्यामुळे बाइक जितक्या वेगात पुढे जाते तितक्या वेगात थांबते सुद्धा.

आजकाल बाइकच्या निवडीबाबतीत भरपूर पर्याय तर आहेतच पण त्याचबरोबर अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचाही अनुभव घेणं शक्य झालं आहे. मात्र एक गोष्ट महत्त्वाची, जमाना परफॉर्मन्स बाइकचा असला तरी हेल्मेट वापरणं मह्त्त्वाचं आहे कारण बाइकला पर्याय असला तरी हेल्मेटला पर्याय नाही.

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 8, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: