कचरा खाणारी आलिशान गाडी

कचरा-धूळ साफ करणारी, तुंबलेली गटारं मोकळी करणारी, रस्ता धुणारी आणि ओला-सुखा कचरा घेऊन जाणारी एक पिवळ्या रंगाची आलिशान वातानूकुलित गाडी सध्या मुंबईच्या रस्त्यावरून फिरते आहे. ही गाडी कचऱ्याची आहे, असा प्रश्न पडावा इतकी ही गाडी आलिशान आहे. साधारणत: आपल्याकडे कचऱ्याची गाडी म्हटली की मळकट रंगाची, चिखलाने माखलेली, कचऱ्याच्या ओझ्याने वाकलेली, भरलेला कचरा ओव्हरफ्लो होऊन पुन्हा रस्त्यात सांडत जाणारी आणि मागे दुर्गंधी सोडणारी गाडी डोळ्यासमोर येते. पण या नव्या गाडीचं तंत्र एकदमच वेगळं आहे. जर्मन टेक्नॉलॉजीच्या या नव्या गाडीविषयी…

कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा मुंबईतला एक गंभीर प्रश्न. पालिकेचे सफाई कर्मचारी आपली जबाबादारी निभावत असले तरी मुंबईत निर्माण होणारा कचरा पाहल्यावर असं वाटतं की एका झटक्यात सगळं शहर साफ करणारं एखादं मशीन यावं आणि बघता बघता या मशीनने कचरा उचलण्यापासून ते रस्ते धुण्यापर्यंत सगळी कामं वेगाने पार पाडावीत. आत्तापर्यंत हे केवळ कल्पनेतच शक्य होतं पण आता काही प्रमाणात ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते कारण अशा प्रकारची कचरा साफ करणारी यंत्रणा वाहणारी एक चारचाकी गाडी मुंबईत दाखल झाली आहे. जर्मनीतील कार्चर कंपनीची निमिर्ती असलेल्या या अत्याधुनिक कचऱ्याच्या गाड्या ठाण्यातील कुश मशीनरीज अॅण्ड स्पेअर्सने भारतात आणल्या आहेत. क्रिस्टल ट्रेडकॉमने या गाड्या विकत घेतल्या असून सध्या एमएमआरडीएच्या मार्फत या गाडीची चाचणी सुरू आहे. तब्बल ७८ लाख रुपये किमतीची ही गाडी रस्ते झाडण्यापासून ते कचरा उचलण्यापर्यंत अनेक कामं सहज करू शकते.

या गाडीला एकूण चार मोठे गोलाकार ब्रश लावण्यात आले आहेत. यातील दोन ब्रश एकाच पद्धतीने फिरतात तर उरलेले दोन ब्रश सर्व बाजूंनी गोलाकार फिरतात. या चारी ब्रशचं मुख्य काम म्हणजे रस्त्यातला कचरा खेचून घ्यायचा आणि गाडीच्या मध्यभागी जमा करायचा. कचरा गाडीखाली जमा झाला की तेथून तो आपोआप वर उचलला जातो. गाडीच्या मागच्या बाजूला कचरा गोळा करण्यासाठी कण्टेनर्स बसवण्यात आले असून या कण्टेनर्समध्ये हा कचरा साठवला जातो. ओला आणि सुखा कचरा वेगळा करून मग तो कण्टेनरच्या दोन भागात साठवण्याचं तंत्रही या गाडीत बसवण्यात आलंय. ही गाडी एका तासात ३७ हजार स्क्वेअर मीटर या वेगाने रस्ते साफ करते. या गाडीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रस्ते झाडताना धूळ उडू नये म्हणून रस्ता ओला करून मग कचरा जमा करण्याची खास सोय या गाडीत आहे. गाडीच्या खालच्या बाजूला शॉवर बसवण्यात आले आहेत. ज्या भागात जास्त धूळ आहे त्या भागात आधी शॉवरमार्फत रस्ता ओला केला जातो आणि मग तिथला कचरा गोळा केला जातो. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी या गाडीत रिसायकलिंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गाडीच्या टाकीत जमा केलेल्या पाण्याचं रिसायकलिंग करून ते पुन्हा वापरता येतं. त्यामुळे पाणी वाया जात नाही. ही गाडी चालवण्यासाठी एक ड्रायव्हर आणि एक हेल्पर अशी दोनच माणसं लागतात. बाकी सगळं काम मशीनच करतं. त्यामुळे ड्रायव्हरला किंवा हेल्परला कचरा उचलण्यासाठी गाडीतून उतरावं लागत नाही. रस्ते साफ करण्याबरोबरच सांडपाणी वाहून नेणारी गटारं साफ करण्याची सोयही या गाडीत आहे. सक्शन ट्युबच्या साहायाने पाइपलाइन किंवा लहान गटारांमध्ये अडकलेला कचरा बाहेर काढून मार्ग मोकळा केला जातो. ही गाडी नव्वद अंशाच्या कोनात वळते त्यामुळे गाडी पाकिर्ंग किंवा लहान रस्त्यांवर, वळणांवर गाडीचं घोडं अडत नाही आणि ट्रॅफिक जाम करत नाही. आकाराने ही गाडी लहान असल्यामुळे ट्रॅफिकमधूनही सहज मार्ग काढते. त्याचप्रमाणे गाडी वातानुकूलित असल्यामुळे कुठल्याही हवामानाचा गाडीवर परिणाम होत नाही. पावसाळ्यातही गाडीतील यंत्रणा चालू राहील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या या गाडीची टेस्ट चालू आहे. या टेस्टच्या दरम्यान गाडीने समाधानकारक कामगिरी बजावल्यामुळे अशाच प्रकारच्या आणखी चार गाड्या आयात करण्याचा मानस असल्याचं क्रिस्टल कंपनीचं म्हणणं आहे. वेळ आणि श्रम या दोन्हीची बचत होते त्यामुळेच आगामी काळात मुंबईतील रस्त्यावरून ही गाडी सर्रास दिसू लागेल असा विश्वास व्यक्त केला जातोय.

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 8, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: