संगमेश्‍वर मंदिर

chitra.jpgमुळा आणि मुठा यांच्या संगमावर असलेले संगमेश्‍वर मंदिर. तेथील घाट व स्वच्छ वाहते पाणी यांचे हे सुमारे ७५ वर्षांपूर्वीचे छायाचित्र! गोपूर असलेले, इतिहासकाळातील हे पुण्यातील एकमेव मंदिर. हा भाग आता पुण्यश्‍लोक अहल्यादेवी घाट या नावाने ओळखला जातो. सदर छायाचित्र संगम पूल अथवा वेलस्ली ब्रिज येथून काढले आहे. ……..
पूर्वी येथे स्मशानभूमी होती, त्यामुळे अर्थातच या भागास महत्त्व होते. शाहीर सगनभाऊ, होनाजी बाळा या जोडगोळीतील होनाजी; तसेच होनाजीचे आजोबा सातप्पा गवळी यांच्या समाधी याच संगमावर होत्या. १७८६ पासून या भागास मोठे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. सध्या अहल्यादेवी होळकर घाट आहे त्याच्या समोरील बाजूच्या काठावरील जागा, ब्रिटिशांचा पुण्यातील पहिला निवासी वकील चाल्‌र्स मॅलेट याने राहण्यासाठी निवडली. मॅलेटने इथे सुंदर इमारत व सभोवताली सुंदर बगीचा निर्माण केला. पुढे १८१७ पर्यंत ब्रिटिशांचे निवासी वकील येथेच राहत असत. पाच नोव्हेंबर १८१७ रोजी मराठ्यांच्या सैन्याने येथे हल्ला करून येथील बंगला चीजवस्तूंसह जाळून टाकला. तेव्हा माऊंट स्टुअर्ट एल्फिंस्टन हा वकील येथे राहत असे. आता याच जागेवर मुख्य न्यायाधीशांचा बंगला आहे. मराठी राज्य १७ नोव्हेंबर १८१७ रोजी बुडाल्यावर येथे जाण्या-येण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून ब्रिटिशांनी १८३० मध्ये संगम पूल बांधला. यासाठी पेशव्यांचा शुक्रवार वाडा पाडून त्याची लाकडे वापरली. १८७० मध्ये हा पूल दगडात बांधण्यात आला. संगम पुलाच्या सुरवातीस आजही या पुलाच्या उद्‌घाटनाची कोनशिला आहे. सदर कोनशिलेची अवस्था अत्यंत खराब असून, तिचे जतन झाले पाहिजे.

एकेकाळी हा भाग रमणीय होता. ब्रिटिश महिला-पुरुष येथे नौकाही चालवत. आता नदीची अवस्था इतकी भीषण आहे, की घाटावर उभे राहवत नाही. छायाचित्रात दिसते ते मंदिरही १९६१ च्या पुरात जमीनदोस्त झाले. आता त्याचा मागमूसही नाही.

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 7, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: