डाएट की उपास?

जंक फूड किंवा अवेळी खाण्याने वजन वाढलं की डाएट करण्याची वेळ येते. आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेेवर न खाण्याला आपणच जबाबदार आहोत. पण जे काही खायचंय ते पौष्टिक असावं. बिर्याणी, पास्ता किंवा मेयॉनेजविरहित सॅलेड्स वगैरे खायला हरकत नाही. सॅण्डविचसाठी ब्राऊन ब्रेड वापरावा नाहीतर क्लिअर सूप हाही एक चांगला पर्याय आहे. क्रॅश डाएट करण्याऐवजी डाएट हेल्दी ठेवून आरोग्य सांभाळता येऊ शकतं.

…………………

रतातील विविध शहरांमधल्या पक्वान्नांच्या सफरीचा आस्वाद घेताना या वेळी छोटीशी विश्रांती घ्यायचं ठरवलं. श्रावणही जवळ आलाय, तेव्हा आहारावर किंवा आवडी-निवडींवर ब्रेक लावला पाहिजे. उपवासाच्या माध्यमातून ब्रेक लावण्यामागे कुणाची श्रद्धा असू शकते किंवा चेंज म्हणूनही त्याच्याकडे पाहता येईल. उपवासाचे पदार्थ रोजच्या जेवणामधला एक चेंज असला तरी तो भरगच्च खाण्याचाही ठरू शकतो. पूवीर्च्या काळी मात्र असं नसायचं. तेव्हा उपवास मोजकेच पदार्थ खाऊन केले जायचे. म्हणूनच मला वाटतं की आजचं डाएट म्हणजेच पूवीर्चे उपवास!

या व्यवसायामुळे माझ्या विविध क्षेत्रांतील लोकांशी ओळखी झाल्या आहेत. सध्याची खाद्यसंस्कृती पाहता खाण्या-पिण्याला कुठेच आळा घातलेला दिसत नाही. दोन्ही वेळचं जेवण सर्रास रेस्तराँमध्ये केलं जातं. मग ते जंक फूड असो वा तेलकट-मसालेदार! हॉटेलच्या किचनमध्ये काम करणारा मी तुम्हाला ठामपणे सांगतो, की रोज बाहेर जेवणं चांगलं नाही; पण अनेकदा आपल्यापुढे पर्याय नसतो. अशा खाण्याला बॅलन्स करण्यासाठी ओघाने आठवते ती डाएट थेरपी! मग सुरू होतात वेगवेगळ्या प्रकारची डाएट्स! लो-कॅलरीज, हाय प्रोटिन्स, लो-फॅट, रिच फायबर… असे नाना प्रकारची डाएट्स आहेत. हृदयविकार, डाएबिटिस किंवा आजारपणामुळे काहींना पथ्यं सांभाळावी लागतात. पण तरीही त्यातल्या बऱ्याच खवय्ये मंडळींना खाण्याची अत्यंत आवड असते. त्यांच्या पुढे जे येईल त्यावर ते ताव मारतात. काहीजणांचं तर रोज अरबट-चरबट खाणं होतं. रात्री उशिरा किंवा अवेळी जेवण होतं. नंतर वजन वाढलं की अशा लोकांना डाएट करणं भाग पडतं. ते करताना त्यांना कठीणही जातं.

शेफ आणि डाएटिशियन यांचा नेहमीच छत्तीसचा आकडा राहिला आहे. आम्ही जिभेचे चोचले पुरवणार तर डाएटिशियन खाऊ नका असं सांगणार. सध्या परिस्थिती बदलतेय. फिटनेसबाबत जागरूकता वाढतेय. पोटावर दडपण आणून जेवणं लोकांना मान्य नाहीय. रेस्तराँमध्ये गेल्यावर कमी तेलाचा किंवा अजिनो-मोटोच्या वापराबद्दल चौकशी करणाऱ्या हेल्थ कॉन्शस लोकांना मग डाएटिंग करण्याची गरज पडत नाही.

डाएट म्हणजे कमी जेवण असं नाही, तर योग्य आणि वेळेवर आहार घेणं हे आहे. योग्य म्हणजे चांगल्या आणि माफक तेलात केलेला स्वैपाक! घरचं लोणी किंवा साजूक तूप वापरलं तर उत्तम! वनस्पती तूप आरोग्याला हानीकारक असल्याचं आपण सगळे जाणतोच. अशा पदार्थांवर परदेशात बंदी आहे. ऑलिव्ह ऑइल किंवा राइस ब्रॅन ऑइल वा सोयाबिन तेल हे आरोग्यासाठी उत्तम आहे. तेल आणि त्याचे प्रकार यावर पुढच्या लेखात सविस्तर माहिती देईन.

आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेेवर न खाण्याला आपणच जबाबदार आहोत. तरीही जेव्हाही खाण्याची वेळ येईल तेव्हा पौष्टिक आहार असणं महत्त्वाचं आहे. अवेळी खायचं असेल तर नुसती बिर्याणी किंवा पास्ता खाऊ शकता किंवा एखादं मेयॉनेजविरहित सॅलेड खावं. सॅण्डविच खायचं असेल तर ब्राऊन ब्रेड वापरावा नाहीतर क्लिअर सूप हाही एक चांगला पर्याय आहेच.

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 7, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: