ए ३८० – महाकाय विमान

चं २३९ फूट लांबीचं “ए ३८०’ हे महाकाय विमान सात मे रोजी भारतीय क्षितिजावर अवतरणार आहे. मुंबई आणि दिल्ली इथं हे विमान येणार असून, त्याबाबत बरीच उत्सुकता आहे; पण या कुतूहलापलीकडेही “ए ३८०” ची एक वेगळी “स्टोरी’ही आहे. या विमानाच्या ग्राहकांना वेळेत “डिलिव्हरी’ पोचवण्यात “एअरबस’ला अपयश आले. त्यामुळे “फेडएक्‍स’सारख्या मोठ्या विमान कंपनीनं तब्बल साडेतीन अब्ज डॉलरची दहा विमानांची “ऑर्डर’च रद्द करून टाकली. हवाई वाहतूक क्षेत्रातली ही एक महत्त्वाची घटना मानली गेली… ……
या माणसांच्या समस्याही मोठ्या असतात, असं आपण नेहमीच म्हणतो. जगातील सर्वांत मोठ्या विमानाच्या बाबतीतही नेमकं हेच घडलंय. “ए ३८०’ निर्मितीपासून चर्चेत राहिलं आहे. “डबलडेकर’ बससारखं “डबलडेकर’ विमान असू शकतं या कल्पनेनंच प्रवासी हवेत गेले. गेल्या वर्षी ए ३८० नं फार्नबरोच्या “एअर शो’मध्ये देखणं उड्डाण करून विमान कंपन्यांसह प्रवाशांनाही भुरळ पाडली. बऱ्याच प्रमुख विमान कंपन्यांनी या विमानासाठी आपल्या “ऑर्डरी’ही दिल्या. विमान तयार होईपर्यंतच “एअरबस’ला दीडशेहून अधिक ऑर्डर मिळाल्या आणि त्यांना आकाश ठेंगणं होऊन बसलं. इथपर्यंत सगळं सुरळीत सुरू असताना अचानक कोठेतरी माशी शिंकली आणि “ए ३८०’ बनावटीची विमानं तयार करण्यात अडचणी येणार हे स्पष्ट झालं. विमानाच्या वायरिंगमध्ये फार मोठी समस्या निर्माण झाल्यानं पुढील विमानं तयार करण्यात अडचणी येणार आहेत. त्यामुळे साहजिकच ज्या विमान कंपन्यांना ही विमानं द्यायची आहेत, त्यांना ती द्यायला सरासरी तब्बल एका वर्षानं उशीर होणार आहे. एकीकडे कौतुकानं आकाशाला डोळे लावून बसलेले प्रवासी आणि दुसरीकडे “ए ३८०’चे हतबल ग्राहक असं चित्रं आता निर्माण झालं आहे.

“ए ३८०’कडे त्याचे ग्राहकच पाठ फिरवणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तांत्रिक अडचणींमुळे “ए ३८०’ विमानांच्या “डिलिव्हरी’ला होणारा विलंब थोडाथोडका नाही, तर पूर्ण तीन वर्षं इतका आहे. तीन वर्षांचा विलंब म्हणजे ग्राहकांचंही कोट्यवधींचं नुकसान. ग्राहक कंपन्यांना हे नुकसान परवडणार नसल्यानं बहुतेक कंपन्यांनी विलंब शुल्क द्या, असा तगादा लावायला सुरवात केली आहे. “फेड-एक्‍स’ विमान कंपनीनं तर दहा विमानांची ऑर्डर रद्द करून “एअरबस’ला धक्काच दिला आहे. हवाई वाहतूक क्षेत्रातली एक मोठी घटना म्हणून याकडे पाहिलं जात आहे. “फेड-एक्‍स‘ची ऑर्डर तब्बल तीन अब्ज डॉलरची होती. “फेड-एक्‍स’ केवळ “एअरबस’ची ऑर्डर रद्द करून थांबलं नाही, तर त्यांनी “एअरबस’ची प्रतिस्पर्धी कंपनी “बोईंग’ला साडेतीन अब्जांची बोईंग-७७७ बनावटीच्या विमानांची ऑर्डर देऊनही टाकली आहे.

या सर्व घडामोडींचा “एअरबस’च्या एकूण वाटचालीवर परिणाम तर होतोच आहे; पण यामुळे होणारं आर्थिक नुकसानही थोडंथोडकं नाही, तर तब्बल सहा अब्ज डॉलर इतकं आहे. या काळात कंपनीच्या दोन “सीईओं’ना आपलं पदही गमवावं लागलं आहे. मघाशी म्हटल्याप्रमाणे “फेड-एक्‍स’नं तीन अब्ज डॉलरची ऑर्डर तर रद्द केलीच; पण त्याशिवाय ते दहा कोटी डॉलर विलंब शुल्कही वसूल करून घेणार आहेत. “थाई एअरवेज’नं अद्याप ऑर्डर रद्द केलेली नाही; पण हा ग्राहक जाऊ नये यासाठी “एअरबस’नंच त्यांना एक कोटी डॉलर सवलत देऊ केली आहे.

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 7, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: