श्री समर्थोपदेश

सावध चित्ते शोधावे !
शोधोनी अचूक वेचावे !
वेचोनी उपयोगावे !
ज्ञान काही !!

 सामर्थ्य आहे चळवळीचे ।
जो जो करील तयाचे ।
परंतु येथे भगवंताचे ।
अधिष्ठान पाहिजे ।।

मरावे परी किर्तीरुपे उरावे !

केल्याने होत आहेरे आधी केलेची पाहिजे !

दिसामाजी काहितरी ते ल्याहावे !
प्रसंगी अखंडीत वाचीत जावे !!

अखंड सावधान असावे ! दुश्चित कदापी नसावे !
तजविजा करीत बैसावे ! येकान्त स्थळी !!

धिर्धरा धिर्धरा तकवा ! हडबडु गडबडु नका !!

रुप लावण्य अभ्यासिता नये !
सहज गुणासी न चले उपाये !
काहितरी धरावी सोये !
अगांतुक गुणांची !!
(अगांतुक – यत्नपुर्वक मेळविलेले.)

काहि गल्बला ! काही नीवळ !
ऐसा कंठीत जावा काळ !

प्रपंच मुळिच नासका !
विवेके करावा नेटका !
नेटका करीता फ़िका !
होत जातसे !!

जयासी वाटे जीवाची भये !
त्याने क्षात्र धर्म करो नये !
काहितरी करोनी उपाये !
पोट भरावे !!

इहलोक साधाया कारणे !
जाणत्याची संगती धरणे !
परलोक साधाया कारणे !
सद्गुरु पाहिजे !!

ब्राह्मणे बाळबोध अक्षर !
घडसोनी करावे सुंदर !
जे देखताची चतुर !
समाधान पावती !!

खनाळामध्ये जाऊन राहे !
तेथे कोणीच न पाहे !
सर्वत्रांची चिंता वाहे !
सर्वकाळ !!

अवघड स्थळी कठीण लोक !
तेथे राहणे नेमक !
सृष्टीमध्ये सकळ लोक !
धुंडीत येती !!

म्लेंच्छ दुर्जन उदंड ।
बहुता दिसाचे माजले बंड ।
या कारणे अखंड ।
सावधान असावे ।।

शरीर परोपकारी लावावे ।
बहुतांच्या कार्यास यावे ।
उणे पडो नेदावे ।
कोणी येकाचे ।।

जितुके काही आपणासी ठावे ।
तितुके हळुहळु सिकवावे ।
शाहाणे करूनी सोडावे ।
बहुत जन ।।

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 3, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: