राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा …..

सरकारी नोकरीत उच्चपदावर बसून राजकारणात अप्रत्यक्षरित्या का होईना, महत्त्वाची भूमिका बजावण्याचं स्वप्न पाहण्याचं धैर्य आजच्या तरुणांमध्ये आलं आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठीचा एक मार्ग म्हणजे राज्य लोकसेवा आयोग. त्यामुळेच आज ही परीक्षा देणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढलेली आहे. पण राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देणं वाटतं तेवढं सोपं नाही. ही परीक्षा द्यायची तर वेळेतच योग्य तयारी करायला हवी. अशावेळी या परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या मार्गदर्शक पुस्तकांची मदत घेता येते.

वाणिज्य अर्थव्यवस्था घटक’ हे त्यापैकीच एक. पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक मंत्रालय सहाय्यक पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारं असं हे पुस्तक आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बदलला आहे. यामुळे वैकल्पिक विषय रद्द होऊन सामान्य क्षमता चाचणी हा २०० मार्कांचा एकच पेपर द्यावा लागतो. या एकाच विषयात सायन्स आणि इंजिनीअरिंग, कृषीविषयक घटक, वाणिज्य आणि अर्थव्यवस्था, कलाशाखा, बुद्धिमापन चाचणी आणि चालू घडामोडी या सहा विषयांचा अभ्यास करावा लागतो. अर्थातच यामुळे परीक्षेचा अभ्यास व्यापक झालाय. हाच अभ्यासक्रम पोलिस उपनिरीक्षक आणि तत्सम पदांसाठी घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेतल्या ‘सामान्यज्ञान’ या विषयासाठीही डिझाइन करण्यात आला आहे. त्यामुळे एकाच वेळी राज्यसेवा आणि पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षांची तयारी करता येणं शक्य आहे. भारतीय अर्थव्यवस्था, पंचवाषिर्क योजना, आयात निर्यात, बँकिंग, शेअर बाजार आदी क्षेत्रांची तपशीलवार माहिती देतानाच नमुना प्रश्नपत्रिकाही दिलेल्या आहेत. त्यामुळे परीक्षेची तयारी वेळेत करणं शक्य आहे.

प्रशासकीय अधिकारी पदाप्रमाणे पोलिस दलातही भरती करण्यासाठी परीक्षा घेतली जाते. पोलिस शिपाई पदासाठी केवळ बारावी पास ही शैक्षणिक पात्रता असतानाही अनेक उच्चशिक्षित विद्याथीर्ही ही परीक्षा देताना आढळतात. या वाढत्या स्पधेर्चा परिणाम परीक्षेच्या स्वरूपावर झाला नाही, तरच नवल! या परीक्षेचं स्वरूप लक्षात घेऊन परीक्षेची सर्व ती तयारी करून घेण्यासाठी पोलिस भरतीची माहिती, पोलिस यंत्रणा, अंकगणित, सामान्यज्ञान आणि चालू घडामोडी आदी सर्व विषयांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. आवश्यक ते सर्व काही विद्यार्थ्यांना पुरवण्याचा प्रयत्न स्तुत्य म्हणावा लागेल.

हल्ली सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागातफेर् सहकार अधिकाऱ्याची निवड करण्यासाठी परीक्षा घेतल्या जातात. या पदांमध्ये थोडाफार फरक असला, तरी यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा अभ्यासक्रम साधारण सारखाच आहे. याच सहकार विषयाची ओळख करून देणारं पुस्तक म्हणजे सहकार, पणन व वस्त्रोद्योग अधिकारी निवड परीक्षा दीपस्तंभ. सहकार क्षेत्राचा इतिहास आणि सिद्धांत, कायदे, बँकिंग क्षेत्राची सविस्तर माहिती यातून समजून घेता येईल.

तपशीलवार माहिती, सोपी भाषा आणि मुद्देसूद स्पष्टीकरण ही या पुस्तकांची वैशिष्ट्य म्हणता येतील. लांबलचक दाखले आणि पाल्हाळ न लावता विषय थोडक्यात आणि नेमकेपणाने विषय समजावून देण्यात आला आहे. म्हणूनच आवश्यक ते सर्व काही माहीत करून घेण्यासाठी या पुस्तकांची मदत घेता येईल.

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 3, 2007.

One Response to “राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा …..”

  1. Please tell me, where is the forms are availble of lokseva agoga

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: