बालादपि…

मी १२-१३ वर्षांचा असताना एका नातेवाईकाने ‘तो सचिन तेंडुलकर बघ -तुझ्यापेक्षा फक्त ७-८ वर्षांनीच मोठा आहे, पण कुठे पोचलाय!’, असे काही कारण नसताना डिवचले होते. शहाणा मुलगा असल्याने ‘तुमच्यापेक्षा तो जवळजवळ १५-२० वर्षांनी लहान आहे, तरी पहा…’ या चालीवर उत्तर द्यायचे टाळले होते. हल्लीच सचिन-कांबळीचा ६६४ धावांचा विक्रम एका शाळकरी दुकलीने मोडला, त्यावरुन हे आठवलं.

पण हे पोस्ट क्रिकेट किंवा आगाऊ नातेवाईकांबद्दल नाही. आहे ते लहानग्या वयातच ‘वय लहान पण कीर्ती महान’ असणाऱ्या young achievers/child prodigies च्या वाढत्या संख्येबद्दल. पूर्वी सचिनचे अप्रूप होते. पण आता बघाल तर १८-२० व्या वर्षी राष्ट्रीय संघात असणे काही नवलाईचे नाही. रूद्रप्रताप सिंगची कामगिरी कशीही असो, विशीत असतानाच तो संघात आहे. राफाएल नडालचे वय २०, फेडररचे २५. सानिया जेमतेम २०, शारापोव्हा १८ ची आणि अनेक इतर ‘व्हा’ [कुझ्नित्सोव्हा, पेट्रोव्हा, देमेन्तिएव्हा] विशीच्या आसपासच्या. अमेरिकन फूटबॉलमधले पण रॉथलिस्बर्गर, रिवर्स, टॉमलिन्सन, ड्र्यू ब्रीज पण सगळे पंचविशीच्या आत-बाहेरचे. फूटबॉलमध्ये पण क्रिस्टिआनो रोनाल्डो, वेन रुनी विशीतले तर रोनाल्डिनिओ व इतर पंचविशीतले. बुद्धिबळातही गेल्या ४-५ वर्षांत सर्वात लहान ग्रँडमास्टर बनण्याचा विक्रम ५-६ वेळा तरी तोडला गेला असेल. त्यामुळे दिवसेंदिवस आपण इतके निर्ढावत चाललो आहोत, की त्यातून धक्का द्यायला ओरिसातला एखादा ३ वर्षांचा मुलगा मॅरॅथॉन पूर्ण करतो सारखी टोकाची बातमी लागते.

अचानक सगळीकडे हे achievement चे वय कमी व्हायचे कारण काय? लहान वयातच वाढलेल्या अपेक्षा आणि त्या पूर्ण करुन घ्यायची जीवघेणी धडपड? आणि हे यश मिळवण्याचे वय कमी होत होत होणार तरी किती? ‘पूर्वी कायम भरतीच होती आणि आत्ताच्या पिढीत कायम ओहोटीच आहे’, अशी टीका प्रत्येक आदली पिढी करत असताना या नव्या trend ला काय म्हणावे?

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 3, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: