टायपोग्राफीचा बादशहा मॅथ्यू कार्टर

प्रत्येक छापील अक्षर पाहतो त्यांना एक विशिष्ट आकार असतो. या आकारांनाच टाइप असं म्हणतात. असे अनेक लोकप्रिय टाइप्स बनवणारा डिझाइनर म्हणून मॅथ्यू कार्टरचं नाव आदराने घेतलं जातं. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘द वॉशिंग्टन पोस्ट’, ‘द बोस्टन ग्लोब’, ही अमेरिकन आणि लंडनचं ‘द गाडिर्यन’ या वर्तमानपत्रांचे टाइप्स मॅथ्यू कार्टरने बनवलेले आहेत.

……………….

थ्यू कार्टर हा, ज्याचं लेखन जगात सर्वाधिक वाचलं जातं, असा लेखक आहे. मात्र तो काही कथा, कादंबऱ्या वगैरे लिहित नाही. तो टाइपफेस बनवतो. जी जी छापील अक्षरं आपण वाचतो, त्यांच्या आकारावरून त्यांना विशिष्ट नावं दिलेली असतात. उदा. टाइम्स ऑफ इंडिया ‘टाइम्स रोमन’मध्ये आहे. महाराष्ट्र टाइम्स ‘योगेश’ या फॉण्टमध्ये आहे. ही सगळी अक्षरं अगोदर मोठ्या आकारात डिझाइन करून नंतरच ती कागदावर येतात. मॅथ्यू कार्टर आज ७० वर्षांचा आहे आणि तो केंब्रिजमध्ये राहतो. टाइम मासिक, न्यूज वीक, नॅशनल जिओग्राफी, वायर्ड स्पोर्ट्स, इलस्ट्रेटेड या नियतकालिकांचा टाइप त्याने बनवलेला आहे.

मायक्रोसॉफ्टने त्याला संगणकासाठी योग्य असा टाइप बनवायला सांगितलं आणि त्याने ‘वेर्दाना’ हा टाइप बनवला. हा बहुतेक वेळा कम्प्युटरमध्ये वापरला जातो. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘द वॉशिंग्टन पोस्ट’, ‘द बोस्टन ग्लोब’, ही अमेरिकन आणि लंडनचं ‘द गाडिर्यन’ या वर्तमानपत्रांचे टाइप्स मॅथ्यू कार्टरने बनवलेले आहेत.

एक टाइप बनवताना इंग्रजीत २२८ कॅरॅक्टर्स बनवावी लागतात. २८ अक्षरं छोट्या-मोठ्या आकारात बनवावी लागतातच शिवाय उद्गारचिन्हं, स्वल्पविराम, डॉलरचं चिन्ह, उणे अशी चिन्हंही डिझाइन करावी लागतात.

१९३७ मध्ये लंडनमध्ये जन्मलेल्या कार्टरचे वडीलही टायपोग्राफर होते. शिवाय टायपोग्राफीचा इतिहासही त्यांनी लिहिला होता. लहानपणी त्याला वाचता यावं म्हणून आईने वेगवेगळे अल्फाबेट्स कापून त्याला खेळायला दिले होते.

टाइप बनवताना तो कापून त्याचा धातूचा मोल्ड करून त्यातून अक्षरं तयार केली जातात. वेगवेगळे टाइप बनवणारे लोक या शास्त्राबद्दल प्रचंड गुप्तता पाळत. पी. एच. रॅडिश नावाच्या अशाच टाइप बनवणाऱ्या माणसाकडे कार्टर असिस्टण्ट म्हणून काम करू लागला. तो आपलं टाइप बनवण्याचं यंत्र (१९ व्या शतकात टाइप्स मशिनने बनू लागले. त्याआधी ते हातानेच बनत) कोणालाही पाहू देत नसे आणि जेव्हा ते मशीन नकोसं झालं तेव्हा रॅडिश रोज त्याचा एक-एक भाग काढून जवळच्या नाल्यामध्ये टाकत असे. हा रॅडिश कोणालाही आपली कला शिकवायला नाखुषच होता. पण कार्टरला त्याने ठेवून घेतलं आणि हाताने टाइप कापून कसा बनवायचा ते शिकवलं. त्यानंतर हाताने कापून टाइप बनवण्याची कला अस्तंगतच झाली.

एखादा टाइप बनवला की, तो पत्र्यावर ठेवून सुईने त्याच्यावर आऊटलाइन काढली जाई. त्यानंतर बाहेरचा भाग काढून टाकण्यात येई. छोटी कानस, चीजल, जाडी मोजण्याचं यंत्र यातल्या काही गोष्टी टाइप बनवणाऱ्यालाच बनवाव्या लागत. यात चूक झाल्यावर सगळंच काम टाकून द्यायची वेळ येई.

एखाद्या अक्षराचं डिझाइन तयार करायला खूप मेहनत घ्यावी लागते. ज्या स्टीलच्या पत्र्यावर अक्षरं कापून बनवली जात त्याला ‘पंच’ म्हणतात. मॅथ्यू कार्टर ते अक्षर मेणबत्तीवर धरत असे. जेणेकरून त्यावर कुठलाही कचरा राहू नये. त्यानंतर काळ्या धुरात तो ते अक्षर पकडे. मग ते कागदावर उमटवून पाही. कारण हाच टाइप पुढे त्याच्या प्रति बनवल्यावर खिळे जुळवणाऱ्याकडे जाई आणि त्याला शाई लावून छपाई व्हायची तेव्हा तो कागदावर उमटे. चांगला दिसणे ही टाइपची प्राथमिक अट होती. ऑफसेट छपाईचं तंत्र आल्यावर खिळे जोडणं बंद पडलं.

आपण जेव्हा एखादं छापील पान पाहतो तेव्हा आपण पांढऱ्या कागदावरची काळी अक्षरं पाहत असतो. टाइप डिझायनरला मात्र मधला पांढरा अवकाश बघावा लागतो. उदा. च्ह्रज् या अक्षराच्या दोन्ही बाजू सारख्या आहेत की नाहीत. अक्षराच्या आतल्या जागेला ‘काऊण्टर’ म्हणतात. च्रूज् मधल्या काऊण्टरचं च्हृज् मधल्या काऊण्टरशी साम्य असावं लागतं. कोणतंही अक्षर दुसऱ्या अक्षराच्या शेजारी आल्यावर त्यातले काऊण्टर एकमेकांना अनुरूप वाटायला हवेत. च्ढ्ढज् सारख्या अक्षराच्या टोकाला जे वळण असतं त्याला ‘सेरीफ’ म्हणतात. हे ‘सेरीफ’ वाचण्याचं काम सोपं करतात. नाहीतर ढ्ढ, रु ही अक्षरं सारखीच दिसतील. द्बद्यद्यश्ाद्दद्बष्ड्डद्य सारखा शब्द पाहिल्यावर हे म्हणणं लक्षात येईल.

एखादा टाइपफेस बनवताना डिझायनरला अक्षरश: लक्षावधी शक्यता दिसत असतात. टाइप बनवताना अगोदर ष्ड्डश्चद्बह्लड्डद्य च्।।ज् आणि च्ह्रज् ही अक्षरं बनवली जातात. हे एक अक्षर आपण जर कागदावर बनवायला घेतलं तर त्यात रूंदी किती ठेवायची, दोन दांड्यामधलं अंतर किती ठेवायचं, असे निर्णय घ्यावे लागतात. च्ह्रज् सारखं अक्षर नेहमी निमुळतं जाड होत जातं. यातल्या जाड भागाला च्।।द्गड्ड१४ज् असं म्हणतात. प्रत्येक अक्षरातला असा भाग निवडणं आणि त्याची जाडी किती ठेवायची, हा एक निर्णय असतो. सारख्या उंचीची अक्षरं ही नीट न काढल्यास एकमेकांशी कमी-जास्त उंचीची भासू शकतात. च्।।ज् आणि च्ह्रज् काढल्यानंतर डिझायनर च्क्रज् हे अक्षर बनवतो. ‘वेर्दाना’मधल्या च्क्रज् ची तिरकी दांडी किंचित बाहेर येते.

मॅथ्यू कार्टरने जे पहिलं काम घेतलं होतं ते एका टेलिफोन डिरेक्टरीचं होतं. अधिकाधिक मजकूर कोंबून बसवण्यासाठी टेलिफोन डिरेक्टरीचा टाइप लहानात लहान असावा लागतो. शिवाय ती अनेकदा स्वस्त कागदावर छापली जाते. बाजारात असलेला कोणताही टाइप त्यांच्यासाठी उपयोगी ठरत नव्हता. तेव्हा मॅथ्यू कार्टरने त्यांना असा टाइप बनवून दिला.

त्या-त्या क्षेत्रातली माणसं अनेकदा आपल्या कामाने झपाटून जातात आणि सर्वत्र ते आपल्या कामाचीच रूपं पाहत असतात. तसा मॅथ्यू कार्टर वाइनची बाटली असो किंवा सिनेमाचे पोस्टर्स असो त्यातली टायपोग्राफी पाहत असतो. एखादा सिनेमा पाहत असतानादेखील त्यात वेगवेगळ्या ठिकाणी असलेली अक्षरंच त्याला आधी दिसतात. ‘सिनेट्री’सारख्या ठिकाणी त्याला जायला आवडतं. कारण तिथे विविध प्रकारचे टाइपफेस बघायला मिळतात!

अलीकडे एका बाईने कोर्टात फसवणुकीचा दावा केला. तिच्या वडिलांच्या भागीदाराने, त्यांनी आपल्याला कंपनीचे मालकी हक्क दिले आहेत असं दाखवणारी कागदपत्रं सादर केली. या कागदपत्रांवर १९८१ ची तारीख होती आणि टाइपफेस मॅथ्यू कार्टरने बनवला होता. मॅथ्यू कार्टरने कोर्टात सांगितलं की, आपण १९९५ मध्ये हा टाइपफेस तयार केला. साहजिकच तो १९८१ च्या कागदपत्रांवर असणं शक्य नाही. या पद्धतीच्या विविध स्तरांवरच्या गोष्टींनाही टाइप डिझायनरला सामोरं जावं लागतं.

१५०१ मध्ये व्हेनिसमध्ये पहिलं पुस्तक छापण्यात आलं. त्याचा टाइपफेस हस्ताक्षराशी जुळणारा होता. त्यानंतर गेली ५०० वर्षं विविध डिझाइनर्सनी टायपोग्राफी प्रयोग केले. ते सगळेच मान्य होणारे होते असं नाही. १७५७ मध्ये ‘कॅल्स्टन’ हा टाइपफेस लोकप्रिय असतानाच ‘बास्कर विले’सारखा अत्यंत पातळ टाइप अस्तित्वात आला. त्याने डोळ्याला ताण येईल असा काहींचा आक्षेप होता, तरीही आजही ‘बास्कर विले’ अस्तित्वात आहे. मॅथ्यू कार्टरसारखे टाइप डिझायनर इतिहासातले टाइप्स अभ्यासूनच ते आधुनिक करत असतात. मॅथ्यू कार्टर म्हणतो की, ‘प्रत्येक पिढीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच चांगले टाइप डिझायनर असतात.’

टाइप डिझाइन करणाऱ्याला १० वर्षं तरी उमेदवारी करावी लागत असे. त्यानंतर त्याला एखादं अक्षर बनवायला दिलं जात असे. तुम्ही बनवलेला टाइप एकदा वापरात आला की, त्यातूनच टाइप डिझाइनर शिकत जातो. हे एक अत्यंत कठीण असं शास्त्र आहे ते कुठेही शिकवलं जात नाही. अक्षर सुलेखन ही एक वेगळी कला आहे आणि अनेकदा अक्षर सुलेखन करणारे टाइप बनवतात. पण मॅथ्यू कार्टरला अक्षर सुलेखन म्हणजेच कॅलीग्राफी येत नाही!

१९५८ मध्ये ‘द न्यू मेकॅनिकल एक्झरसायझेस’ या टायपोग्राफीला वाहिलेल्या मासिकाने मॅथ्यू कार्टरचा फोटो आपल्या मुखपृष्ठावर छापला आणि त्यांनी लिहिलं नवा आणि ज्याच्याबद्दल आशा दाखवावी असा एक हॅण्डपंच कटर सध्या आपल्या क्षेत्रात उदयाला आला असून तो टायपोग्राफिकल डिझाइनरही आहे.

त्यानंतर वडिलांच्या एका मित्राने कार्टरला आथिर्क मदत केली आणि तो न्यूयॉर्कला गेला. मासिक, जाहिराती, पोस्टर्स हे सगळं पाहून तो थक्क झाला. १९६० मध्ये तो एका संगीताच्या कार्यक्रमाला गेला होता. अनेकदा तोच कार्यक्रम त्याने पुन्हा-पुन्हा पाहिला. मॅथ्यू कार्टरने म्हटले आहे की, ‘अनेकदा ते एकच गाणं पुढच्या कार्यक्रमातही वाजवत. म्हणजे ते आळशी होते असं नाही पण त्यांना स्वत:च्या आधीच्या परफॉर्मन्सपेक्षा अधिक काहीतरी चांगलं करून दाखवायचं होतं. स्वत:चं आधीचं काम मागे पडेल असं काहीतरी केलं पाहिजे.’

हे उमगल्यानंतर तो न्यूयॉर्कमध्ये राहिला आणि पुढच्या ४७ वर्षांत त्याने बनवलेल्या टाइप्सने जग पाहिलं.

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 3, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: