विश्वकल्याणाची आस

विठ्ठलाच्या दर्शनासाठी झेपावणारा लाखो वारकऱ्यांचा भक्तिसागर पाहिल्यावर , या प्रचंड भक्तिसाम्राज्याचं मूळ ज्ञान आहे , याचं भान सुटू लागलं आहे की काय , हा प्रश्न व्याकूळ करतो. भक्तीने चित्त निर्मळ होतं , पण ते अंतिम साध्य नव्हे…

नेमेचि येतो मग पावसाळा। हे सृष्टिचे कौतुक जाण बाळा , ही बालपणी प्राथमिक शाळेत पाठ केलेली काव्यपंक्ती दरवषीर् नेमकी आठवते , ती पावसाळा सुरू होताच. परंतु पुण्यात येऊन राहिल्यापासून गेली ५८ वर्षं एकही पावसाळा असा गेला नाही की , ज्या पावसाळ्याच्या आगमनामागोमाग देहू-आळंदीहून पुण्यात येऊन , पूर्ण दिवस विश्राम घेऊन , ज्ञानोबामाऊली-तुकाराम किंवा ग्यानबा-तुकाराम असा टाळ-मृदंुग-वीणांच्या गजरात भजन करत , हजारो-लाखो वारकऱ्यांच्या असंख्य दिंड्या असणारा पालखी सोहळा , पाहायला मिळाला नाही.

या अखंड ५८ वर्षांच्या वाषिर्क पालखी सोहळ्याच्या दर्शनाने मनात एक प्रश्ान् अस्वस्थ करू लागला आहे आणि तो म्हणजे , या लाखोंच्या संख्येने पंढरीची वाटचाल करणाऱ्या भक्तिसागराच्या तळाशी मूलभूत हेतू कोणता ? याचं उत्तरही मिळालं ते ज्या पवित्र धर्मग्रंथावर हात ठेवून न्यायालयात वा विधिमंडळ-राज्यसभा-लोकसभेतून शपथ घेतली जाते , त्या श्रीमद्भगवद्गीतेत.

नहि ज्ञानेन सदृशं पवित्रम् इह विद्यते। (गीता ४.३८) – हे गीतावचन सांगते. ज्ञानासारखं पवित्र , श्रेष्ठ असं जगात अन्य काहीही नाही. ज्ञान हेच परमेश्वराचं अंतिम स्वरूप आहे. तेच चिरंतन सत्-चित्-आनंद (सच्चिदानंद) या नावाने आपल्या आराधनेचं , उपासनेचं अंतिम ध्येय , साध्य , ज्ञेय , प्राप्तव्य आहे.

पृथ्वीच्या पाठीवरचा अन्य कोणताही धर्म वा संप्रदाय ज्ञान म्हणजेच परमेश्वर असं मानणारा नाही. ज्ञान हाच आपला परमेश्वर ही आर्य , सनातन , वैदिक धर्माची नि:स्सीम श्रद्धा , सहस्त्र वर्षांपासून चालत आलेली आहे. वेद म्हणजेच जे जाणलं जावं , जाणलं जातं , जाणलं गेलं ते ज्ञान. पं. जवाहरलाल नेहरूंचं ५० वर्षांपूवीर्चं आझाद-स्मृति-व्याख्यानमालेतलं पहिलं व्याख्यानपुष्प मी कधीच विसरू शकत नाही.

त्यांनी त्यात ऋग्वेद म्हणजेच अतिप्राचीन काळात भारताने जगाला दिलेला , मानवतेच्या इतिहासातला सर्वप्रथम असा अक्षरबद्ध विचार असा ( first ever recorded thought of mankind) विचार मांडला. ऋग्वेदाची अशा शब्दातली अन्वर्थक ओळख नीट समजावून घेऊन आपण स्वीकारली तर ? आज अंधश्रद्धा म्हणून वेदांवरून गदारोळ करणारे निरुत्तर होतील. युनेस्कोने पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातलं ऋग्वेदाचे हस्तलिखित जागतिक महत्त्वाचा ठेवा , असं नुकतंच जाहीर केलं आहे.

परमेश्वर हे अन्य काही नव्हे , तर अंतिम सत्य , प्रकाशमान , आनंद , अमृत असणारं ज्ञान हाच धर्म अशी डोळस श्रद्धा , हाच धर्म मानून भा म्हणजेच ज्ञान-प्रकाश , तेज त्यात रत होतो , बुडून जातो , ज्ञानोपासना हाच धर्म सर्वस्व मानून जातो , रमतो , तोच भारत. अशा या भारतातल्या ज्ञानदीपाचं ज्ञान-धर्माचं संरक्षण-संवर्धन ज्यांनी केलं ते गंगा , सिंधू , सरस्वती , यमुना , ब्रह्मापुत्र यासारख्या नदनदी प्रवाहांच्या तटावरच्या आश्रमातून (ज्यांनी अखंड तप:साधना परंपरेसाठी गुरुकुलांची उभारणी केली) ध्यान-धारणा समाधिस्थ असणारे थोर ऋषिमुनी हेच भारताचं खरं भारतत्व.

पंचवीसशे वर्षापूवीर्चे भगवान गौतमबुद्ध , भगवान महावीर , बाराशे वर्षापूवीर् होऊन गेलेले जगद्गुरू आद्य शंकराचार्यासह सर्व विविध (द्वैत , अद्वैत , विशिष्टाद्वैत) दर्शनाचार्य हे सर्वच या ज्ञानमार्गाचे पाईक. आपापल्या ग्रंथरत्नांच्या हजारो पृष्ठांतून , भाष्य-टीका-विवरणातून या सर्व (परमेश्वरी अवतार स्वरूप मानल्या गेलेल्या) युगपुरुषांनी अखंडित तेवत ठेवला तो ज्ञानाचा नंदादीप.

महषिर् वेदव्यासांनी सर्वप्रथम प्रज्वलित केलेला धर्म-मंदिरातल्या ज्ञानाचा नंदादीप ऋषिपरंपरेच्या मागोमाग बुद्ध-महावीर-शंकराचार्यांसह त्या त्या अवतारी युगपुरुषांनी आठव्या शतकापर्यंत (शंकराचार्य काळ ७८८ ते ८२०) अखंडित ठेवला. परंतु ही परंपरा अलीकडच्या सात-साडेसातशे वर्षांत कुणी जिती-जागती ठेवली असेल तर ती श्री ज्ञानेश्वरमाऊलींनी.

श्ाीज्ञानेश्वरमाऊलींनी भक्तीच्या मोक्ष-साधन सामग्रीने (सिमेंट-शिलाचूर्णाने) याच ज्ञान-मंदिराचा पाया भक्कम करून ठेवला. संतांच्या मांदियाळीने या ज्ञानमंदिराची – गगनचुंबी धर्म-प्रासादाची उभारणी पूर्ण केली. शेवटी कळसच चढवला जगद्गुरू श्री तुकोबारायांनी. आज लाखांेच्या संख्येने इंदायणी-काठापासून चंदभागा-तीरी वैकुंठरायाच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी झेपावणारा , लाखो वारकऱ्यांचा भक्त-भक्तिसागर पोट भरभरून पाहिल्यावर , एक प्रश्न व्याकूळ करतो. तो म्हणजे या सर्व प्रचंड भक्तिसाम्राज्याचं मूळ आहे ज्ञान , याचे भान सुटू लागले आहे की काय ? भक्ती ही चित्त निर्मळ व्हावं म्हणून. पण ते अंतिम साध्य नव्हे.

सर्व जग विज्ञान-तंत्रज्ञान-प्रधान जीवनपद्धतीच्या रगाड्यातून रगडून , चिरडून , ज्ञानाच्या अध्यात्माच्या मूलतत्त्वाला पारखं होत आहे का ? ज्ञानाची नंदादीपाची ज्योत विज्ञाननिष्ठेच्या , सर्वच बाजारीपणाच्या झंझावातात फडफडून निस्तेज होत विझून गेली तर ? भारत भा-रत राहाणार नाही. ज्ञानापासून-अध्यात्मापासून सत्-चित्-आनंदापासून देशाची नौका भोगवादाच्या खडकावर , धर्मशून्य-भोगवादाच्या पहाडावर , आदळून फुटली तर ? एकच दुर्गती पाहणं नशिबी येईल. (खगोलशास्त्राचे जनक सर आयझॅक न्यूटन यांनी १७४० मध्ये भाकीत करून ठेवलं आहे की २०६० या वषीर् जगाचा अंत होणार.)

हाच संभाव्य धोका ओळखून , हेरून पुण्यनगरीतल्या अध्यात्मनिष्ठ त्रिमूतीर्ंनी-माशेलकर-कराड-भटकर या तीन ज्ञानोपासक समाज-धर्मसेवकांनी अलीकडेच एक क्रांतदशीर् स्वरूपाचा , दीर्घकालीन कल्याणकारक ठरणारा असा एक निर्णय घेतला. निश्चय नव्हे , प्रतिज्ञाच केली. ती म्हणजे भारत-धर्माची नौका श्रद्धा-शून्यतेच्या खडकावर फुटून होणारा जगाचा सर्वनाश टाळायचा असेल , तर केवळ देहू-आळंदी-पंढरपूरच नव्हे , सर्वच तीर्थक्षेत्रं ज्ञानक्षेत्रं करायची. तीर्थक्षेत्रांचं ज्ञानक्षेत्रात म्हणजेच यथार्थ धर्मक्षेत्रात परिवर्तन हाच तो धर्मविश्वाचं शाश्वत , चिरंतन , कल्याण साधणारा कार्यक्रम.

देहू-आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रांचा कायाकल्प , कायापालट करण्याच्या श्रीगणेशापासून या संकल्पाची दिंडी आता पंढरीला पोहोचत आहे. गीतेच्या १८ अध्यायांच्या नावाने चंदभागा तिरी १८ घाट उभारणं , त्याचप्रमाणे भागवत , गीता , ज्ञानेश्वरी , गाथा , दासबोध , गुरूचरित्र यासारख्या ज्ञानग्रंथांचा अखंड स्वाध्याय चालू राहिल , अशी प्रत्येक तीर्थक्षेत्री ज्ञानपीठांची उभारणी करणं असा हा कार्यक्रम.

हरिदा (हळद) ही भारताचीच साऱ्या विश्वाला कल्याणकारक अशी युगायुगापासूनची देणगी , असं ठासून सांगत , अमेरिकेचा हळदीचं पेटण्ट लाटण्याचा डाव उधळून लावणारे , आजच्या वर्तमानकाळातले विज्ञानेश्वर डॉ. माशेलकर , राज कपूरकडून पुण्याजवळ मिळवलेल्या राजबाग परिसराच्या १०० एकर भूभागावर विश्वामित्रासारखी गुरुकुलाची प्रतिसृष्टी उभारणारे विद्याक्षेत्रातले एक दिग्गज डॉ. विश्वनाथ कराड हे विश्वशांतीचे राष्ट्रसंघ (युनेस्को) सन्मानित अध्यासनेश्वर आणि संगणक-विद्या-क्षेत्रात परम-महासंगणक निमिर्तीमुळे जगाच्या नकाशावर पुण्यपत्तनाचे नाव झळकावत , अमेरिकेला गाल चोळत बसायला लावणारे संगणकेश्वर , भारत-विश्व-ज्ञान-पीठम्चे संस्थापक पद्मश्री डॉ. विजयानंद भटकर या त्रिमूतीर्ंचा , तीर्थक्षेत्रांचे ज्ञानक्षेत्रांत परिवर्तन करण्याचा ध्यास , ही उद्या विश्वकल्याणाची आस ठरणार आहे. भैरवसिंह शेखावतांसारखे राजकीय नेते निवृत्तीनंतर आळंदीक्षेत्री इंदायणीकाठी विसावण्याची स्वप्नं पाहत आहेत. यालाच म्हणतात

प्रसादचिन्हानि पुर:फलानि।
तेजस्विनावधीतमस्तु। मा विद्विषावहै।।

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 2, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: