विठ्ठलाचा प्रपंच

ज्या काळात धर्ममार्तंड आणि धर्मशास्त्रज्ञांनी प्रस्थापित केलेल्या चातुर्र्वण्य पद्धतीत केसभरही बदल शक्य नव्हता , तिथे हे सर्व मिरॅकल घडले! -आणि संतांच्या वैचारिक भूमिकेमुळे सामाजिक सुधारणेला गती मिळाली. कालबाह्य गोष्टी नाकारण्याचे सार्मथ्य हळूहळू जनसामान्यांना देण्याचा प्रयत्न हा नकारात्मक प्रयत्न नव्हता. तो तथाकथित पुरोगाम्यांना कोण सांगणार ?

विठ्ठल बहुजन समाजाचे दैवत आहे. या समाजाचे पंढरीशी असलेले आंतरिक नाते अद्वितीय व कालातीत आहे. पंढरीतील पांडुरंग म्हणजेच विठ्ठल : विठोबा : विठ्ठाई , महाराष्ट्रासोबत आंध्र , कर्नाटकातल्याही बहुजन समाजाचे इष्ट दैवत आहे. हेच विठ्ठल सावळे सुंदर ध्यान , वारकरी सांप्रदायाचे आद्य अधिष्ठान आहे. मानवतावादाचा- आध्यात्मिक क्षमतेचा ध्वज याच विठोबाला केंदस्थानी ठेवून- वारकरी सांप्रदायाने , कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या घामाने आणि रक्ताने भिजलेल्या पवित्र मातीत रोवला. आठशे वषेर् उलटून गेली या घटनेला.

ज्या काळात धर्ममार्तंड आणि धर्मशास्त्रज्ञांनी प्रस्थापित केलेल्या चातुर्र्वण्य पद्धतीत केसभरही बदल शक्य नव्हता. तिथे हे सर्व मिरॅकल घडले! स्वकीय , परकीय राज्यर्कत्यांनी (ज्यात मुस्लिमसुद्धा आले) जातीप्रथा , रूढी , परंपरा अधिक घट्ट केल्या आणि त्यातूनच हिंदू धर्मवेत्त्यांनी कर्मठ , कठोर , श्रेणीबद्ध जातीव्यवस्था व धर्माधिष्ठित न्यायनिवाडा राज्यर्कत्यांनी आपापल्या राज्यात लागू केला. थोडक्यात , धर्मशास्त्र आणि धर्ममार्तंडांच्या तालावर नाचणाऱ्या राज्यर्कत्यांनी घालून दिलेल्या मर्यादा सर्वसामान्यांनी ओलांडणे दैववशातही शक्य नव्हते.

ज्ञानार्जनाचा सर्व अधिकार ब्राह्माण जातीपुरता मर्यादित होता. परकीयांचे जोखड सन्मानाने मानेवर मिरवणारी हीच जात म्हणा वा अथवा विविक्षित मानवी समूह शूदातिशूदांना धर्मशास्त्राचा आधार घेऊन ब्रह्मा , ईश्वर , मोक्ष , मुक्ती , कर्मकांडाच्या नावाखाली भरडून काढत होती. या सर्वांविरुद्धचे बंड म्हणजे , वारकरी संप्रदाय. वारकरी सांप्रदायातील रथीमहारथी प्रतिभावंत संत , त्यांच्या संतवाणीने आणि आध्यात्मिक तत्त्वचचेर्ने इथे आध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित केली. या संप्रदायाचे एकाथीर् प्रवक्तेपण ज्ञानेश्वर माऊलीकडे जात असले , तरी खऱ्या अर्थाने ही चळवळ बहुजन कष्टकरी , शेतकरी , दलित , पददलित समाजापर्यंत नेण्याचे काम नामदेव , तुकाराम , चोखामेळा , मुक्ताई , जनाई आदी संतशिरोमणींनी केले. त्यात नामदेव आणि तुकाराम यांनाच प्रामुख्याने प्रवक्तेपणाची , भाष्यकाराची पदवी द्यावी लागेल. या द्वयांत अग्रक्रम नामदेवांचाच.

वेदोपनिषदातील ज्ञान संस्कृत भाषेचा अडथळा दूर करून प्राकृतात आणण्याचा प्रयत्न संतांनी केला असे नाही , तर त्याचा ऋणानुबंध वारकरी संप्रदायाशी जोडला. आडवळणाने त्यात धर्ममार्तंडांनी काही गैर घुसविण्याचा प्रयत्न केला , तो या संप्रदायातील बुद्धिमंत संतांनी हाणून पाडला.

वेदे बहुत बोलिले , विविध भेद सुचिले। तऱ्ही आपण हित आपले तेचि घेणे। ज्ञानेश्वर माऊलीने हे सांगितल्यावरही नामदेवांच्या विठ्ठलाने या वेदोपनिषदांना लंघून उच्च-हीन कुळाचे अंतर तोडून माणसा-माणसांत सेतू बांधला. वेदासी कानडा , ऋतीशी कानडा। विठ्ठल उघडा। पंढरीये. माऊलीने स्वीकारलेल्या चिद्वादाला जो वेदांतातून अभिव्यक्त केला गेला , तो नामदेवाने एका फटक्यातच नाकारला. जादूटोणा , जारणमरण , अंधश्रद्धा , मिरची-मोहऱ्या , कावळी , घुबड , शकुनापशकुन या सर्वांना ओलांडून वारकरी सांप्रदाय पुढे गेला. सामाजिक अर्थाने ही क्रांतीच होती. गतानुगतिक समाजाला , सुखकर नि:श्वास विठ्ठलाच्या माध्यमातून वारकऱ्यांनी बहाल केला. यामागे नुसती भावनिक नाही , तर वैचारिक भूमिका संतांची होती. आजचे तथाकथित पुरोगामी बुद्धिमंत मानोत न मानोत , पण संतांच्या या वैचारिक भूमिकेमुळे सामाजिक सुधारणेला गती मिळाली. कालबाह्य गोष्टी नाकारण्याचे सार्मथ्य हळूहळू जनसामान्यांना देण्याचा प्रयत्न हा नकारात्मक प्रयत्न नव्हता. तो तथाकथित पुरोगाम्यांना कोण सांगणार ?

भक्त विठोबाचे भोळे। त्यांचे पायी ज्ञान लोळे। भक्तिवीण शब्दज्ञान। व्यर्थ अवघे ते जाण। अथवा ब्रह्माज्ञानावीण मोक्ष आहे भू-ती। वाचेसि म्हणती विठ्ठलनामा। खरे तरी वेदप्रामाण्यांची साधकबाधक चर्चा , आपापल्या बौद्धिक आणि सदविवेकी मगदुराप्रमाणे संतांनीही केली आहे.

विठ्ठलाला वेठीस धरणारे संत आहेत. नामदेवांचे अभंगबद्ध चरित्र , त्यातले एकेक अभंग या अर्थाने बोलके आहेत. शिंप्याचे कुळी जन्म झाला माझा। परि हेतू गुंतला सदाशिवी , रात्रिमाजी सिवी , दिवसामाजी सिवी आराणूक जीवी नोव्हे कदा। सुई आणि सुतळी कात्री गज दोरा। मांडियेला पसारा सदाशिवी। नामा म्हणे सिवी विठ्ठलाचे अंगी। म्हणूनी या जगी धन्य जालो। विठ्ठलासाठी गृहजीवनाचा त्याग करताना तो आई , बाप , बायको सर्वांशी भांडला.

विठ्ठलाच्या तंदीत असताना आईने ती भंग केली म्हणून नामदेव आयुष्यभर आईवर रुष्टच राहिला. तू त्याची नि माझी ताटातूट केलीस , तू माझी आईच नव्हे , असे सांगणारे नामदेव ग्रेटच म्हटले पाहिजेत. पोरगा त्यांचा प्रपंच बुडवायला निघाला म्हणून तिने त्याचा धिक्कार करीत गलबला केला. घरावर उदक सोडून विठ्ठलाच्या भक्तीत रंगलेला नामदेव , त्याला तिने खडसावून विचारले , अन्नेसी उपवासी बैसलासी येथे। काय देईल तू ते विठ्ठल हा ? नामदेवाने आईला उत्तर दिले , मला संसार विषासारखा वाटतो. जनिता जीवविता। सर्वज्ञ प्रतिपाळता। अडाणी संभाळिता चराचर। एक पांडुरंग दुजा बहिचांग। म्हणून याचा संग धरिला माते। काया वाचे मने ममत्व माझे ठायी ते तू ठेवी पायी विठ्ठलाचे। नामदेवाने हे आईला सुनावले तेव्हा तिने हलकल्लोळ माजवला. ती गरजली. विठ्ठलाची निर्र्भत्सना केली. तुज नेल्यावाचून नच जात येथून। पंढरी गिळीन विठोबासहित। तरीही मुलगा (नामदेव) बधत नाही म्हणून तिने सुनेला पुढे केले. तीही नवऱ्यापुढे हतप्रभ झाली. ती नामदेवला म्हणते , मी तव अज्ञान नकळे तुमचा महिमा। अपराध क्षमा करा माझा। अंतरीचे खूप काही सांगा मज। जे तुम्ही बीज हृदयी धरूनी असा। जेणे सुखे तुमचे चित्त निरंतर आनंदे निर्भर सदा असे। असे सांगून तिने नवऱ्याची वाट मोकळी केली. पुढे नामदेवाची आईही त्याच्या भक्तीपुढे लीन झाली. एका अथीर् नामदेवाच्या विठ्ठलाशी जणू तिने मांडवलीच केली. ती म्हणते , मी एक आहे तव करीन तळमळ। मग तुझा सांभाळ कोण करी। जरी जपलाशी शहाणा तरी माझे लेकरू। माझा व्यवहारू विठ्ठलासी.

नामदेव असो वा अन्य संत , त्यांची अशीच अवस्था- विठ्ठलासी तादात्म्य पावण्यासाठी झाली. त्यांचे चरित्र नामदेवाहून विठ्ठलाठायी लीन होण्यापेक्षा वेगळे नाही.

विठ्ठल मूळचा महाराष्ट्रातला नाही. तो दक्षिणेकडून आला , असे विद्वान मंडळी सांगतात. त्याला पुरावे नाहीत. संतांनी याची साक्ष काढली आहे. ते रूप भीवरे पांडुरंग खरे। पुंडलिक निर्धारे उभे केले. निवृत्तीनाथ म्हणाले , पुंडलिके भक्त रे तारिले विश्वजना. वैकुंठीची मूतीर् आणिली पंढरपुरा पाटणा। ज्ञानेश्वर आला पुंडलिकासाठी उभा सम पाय विटी। संत एकनाथानेही कबूल केले. धन्य पुंडलिका बहु खोकेले निधान आणिले पंढरीचे. तुकोबारायाने म्हटले , युगे अठ्ठावीस विटेवरी उभा। वामांगी रखुमाई दिसे भव्य शोभा। पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा आले गा। चरणी वाहे भीमा उद्धरी जगा। नामदेवाने हे लिहून पंढरीला येण्याची विठोबाची कथा सांगितली आहे.

पुंडलिकाच्या पितृभक्तीचा वृत्तान्त ऐकून , नऊ लक्ष गायी , पाचशे सवंगडी घेऊन कृष्ण गोकुळाहून पंढरपुरी आला. पुंडलिकाची परीक्षा पाहण्यासाठी वाळवंटी उभा राहिला. हे विठ्ठलाचे ईप्सित कळूनही पुंडलिक विचलित झाला नाही. त्याचे सेवाव्रत चालू राहिले. त्याने कृष्णासाठी (म्हणजे पांडुरंगासाठी) वीट फेकली , तोच कृष्ण विठ्ठल. आजतागायत तो त्याच विटेवर उभा आहे. पुंडलिकाचे आईबाप , त्यांचे आत्मचरित्र याचे पुरावे उपलब्ध नाहीत. अभंगबद्ध पुंडलिकाचे त्रोटक चरित्र हेच जाणकारांसाठी आव्हान आहे. पुंडलिक विठ्ठल ही एक भक्तिसंपदा. यातील त्याच्या भावविश्वातील मिथ आहे. १२३६ सालच्या एका शिलालेखात पुंडलिका मुनीचा उल्लेख आहे. कदाचित तोच पुंडलिक असावा. आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी। नामदेवाने पंढरीचे केलेले वर्णन हृदयंगम आहे. हेमादीच्या चातुर्र्वण्य चिंतामणी आणि जुन्या ग्रंथात याचे संदर्भ सापडतात.

इ. स. ५१६च्या ताम्रपटात पंढरीचा उल्लेख आहे. साधारणत: आजचे पंढरपूर सहाव्या शतकापासून अस्तित्वात आले असावे. पंढरीतला विठ्ठल बिट्टिग नावाने ओळखला जायचा. विठ्ठल जसा कृष्णावतार , तसा शैव वैष्णवाच्या एकीकरणाचे प्रतीक आहे. तो बुद्धाचाही अवतार आहे. नाथपंथी तत्त्वज्ञानापासून बुद्धाच्या प्रज्ञावादापर्यंत त्याचे तात्त्विक क्षेत्र आहे. नामदेवाला विठ्ठल सहवासाचा अहंगंड जडला होता. ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंडे यांची भेट शके १२१२ च्या कातिर्क महिन्यानंतर आळंदीला झाली. त्यात हा गंड प्रदशिर्त झाल्याचा दाखला मुक्ताबाईने नामदेवाची निर्र्भत्सना अभंगांद्वारे करून दिला आहे. निवृत्तीनाथांपासून सोपानदेव यांच्यापर्यंत सर्वांनी नामदेवांचे चरण वंदिले , पण नामदेव जराही वाकला नाही , याची हजेरी मुक्ताईने अभंगांत घेतली आहे. निवृत्तीनाथांना नामदेवांसारखा मनस्वी भक्त आपल्या सांप्रदायात हवा होता. त्याने नामदेवाला सन्मानाने वागविले. मुक्ताबाई-गोरोबांच्या साक्षीने नामदेव बदलून गेला. त्याला गुरू उपदेशाची आवश्यकता भासली. विठ्ठलाचा साक्षात्कार होऊन त्याला अनुमती मिळाली. .

असा हा संतांचा प्रपंच ज्यात चोखोबा असो , नामदेवाची जनाबाई असो , विठ्ठलासाठी वेसवापण स्वीकारणारी जनी असो , आपणाला विठ्ठलाच्या प्रपंचातच पाहायला मिळते. चोखोबापासून सावता माळ्यापर्यंत सर्व जण आपणाला भेटतील. विज्ञानाने परमेश्वरी कल्पनेच्या अनिवार्यतेचा अंत जरी घडवून आणला असला , तरी भक्तीच्या अंतरंगाने द्विगुणित आणि अलौकिक ठरलेला विठ्ठलाचा भला मोठा प्रपंच , त्याचे भलेमोठे कुटुंब , समतेच्या वैशिष्ट्यांनी अभंग बहरला आहे. ही अभिव्यक्ती संतांच्या अंतरंगाचा मानवी आविष्कार म्हटला पाहिजे!

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 2, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: