आषाढातील भक्तीरसधारा

पंढरपूरची आषाढीवारी , कातिर्कीवारी , ही खरं म्हणजे ग्रामीण आणि सामान्य माणसांची अध्यात्मिक चळवळ , असं म्हणायला हवं. शेतावर काम करणारा शेतकरी , शेतमजूर किंवा शहरातला सामान्य माणूस प्रपंचातले चार दिवस ब्रह्मानंदात कसे घालवायचे या विचारातून वारीकडे प्रवृत्त झाला असला पाहिजे. वारीच्या वेळाही ध्यानात घेण्यासारख्या आहेत. तापलेली जमीन , त्यात उन्हाळ्यात करायची मशागत , नांगरट पाळी हे सगळं आटपून आता मेघराजाची वाट बघायची आणि तो बरसला की नवीन कामाला लागायचं , नवीन पिकं पेरायची , ही ज्येष्ठ-आषाढातली शेतकऱ्याची मानसिक स्थिती. निसर्गाच्या कृपेने खरीप चांगलं आलं , रब्बी पेरून झालीए आता या कृपेच्या संदर्भात चार दिवस कातिर्कात काढू , अशी ती एक वारी !

आषाढीवारीच्या दरम्यान मला माझ्या लहानपणचं खेड्यातलं वातावरण आठवतंय. त्यात असं होत असे की प्रत्येक गावात वारीला जाण्याचा कृतनिश्चय करणारी पाच-दहा सामान्य माणसं. मग त्यांचा त्या भागातला अध्यात्मातला जो कोणी गुरू असेल , असे महाराज किंवा बाबा हे लोक ठरल्याप्रमाणे बरोबरच निघायचे. आसपासच्या वेगवेगळ्या गावातले लोक अमक्या गावातून निघून अमूक गावात एकत्र भेटू , असं न बोलता , न ठरवता प्रथेप्रमाणे भेटत असत आणि मग जसं सह्यादीतून आणि सह्यादीच्या छोट्या छोट्या रांगातून निघणारे छोटे छोटे ओहोळ एकत्र येतात , ते कुठेतरी भीमेला जाऊन मिळतात आणि ती भीमा वाहत वाहत जाऊन पंढरपुरी भव्य-दिव्य चंदभागा होते , तसेच हे वारकऱ्यांचे ओहोळ गावागावातून निघून , आपल्या-आपल्या दिंड्या-पताका घेऊन , त्या दिंडीच्या भीमेला मिळत असतात.

माझ्या माहितीत किंवा ऐकीव माहितीत म्हणजे १९२०-३० च्या दरम्यान , माझे आजोबाही वारीला जात असत. त्या काळातली वारी म्हणजे रस्त्यात कुठेही हॉटेल नाही आणि देवळाशिवाय थांबायला , झोपायला जागाही नाही , अशी असायची.

बरोबर बांधून घेतलेल्या भाकऱ्या किंवा शिधा यावर वारी करायची. पण ह्या वारीचं पूवीर्पासूनच एक वैशिष्ट्य ध्यानी घेतलं पाहिजे की कुणी एखादा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारा ब्राह्माण असो किंवा शास्त्रशुद्ध अभ्यास करणाऱ्या लोकांनी वाळीत टाकलेला ए्खादा ज्ञानेश्वर असो , किंवा कुणब्या-शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा एखादा तुकाराम असो किंवा ज्यांना गावामध्ये अस्पृश्य म्हटलं जायचं असा एखादा अस्पृश्य असो , हे सर्वच जण वारीमध्ये बरोबर असत. मग तो चोखामेळा असेल – सेनान्हावी असेल , वारीमध्ये भेदभाव नव्हते. वारीमध्ये छोटा-मोठा कुणीही नव्हता व नाही.

खरी समता किंवा साम्यवाद हा मानवतेला शिकवण्याचा प्रयत्न – आपल्या माहितीप्रमाणे निदान गेल्या शतकापासून ही आमची वारी करत आली आहे. या वारीतून प्रत्येक ठिकाणी होणारा मुक्काम आणि त्या मुक्कामाच्या ठिकाणी बरोबरीच्या नेते माणसांनी केलेलं धामिर्क प्रबोधन , केलेलं अध्यात्मिक उन्नयन या सर्वांतून या वारीत गेलेला सामान्य मनुष्य तत्त्वज्ञानाच्या , ज्ञानाच्या चार आयत्या मिळालेल्या गोष्टी बरोबर घेऊन पुढे जात असतो. मग तो घरी परतल्यानंतर , अध्यात्मिकदृष्ट्या , भौतिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्याही जास्त प्रगत आणि प्रगल्भ होऊन आलेला असतो.

वारीत तो ज्या पद्धतीने जातोय , चालतोय , त्या चालण्यामागे विठ्ठलाला भेटायची त्याची जी ओढ आहे , ती निरपेक्ष आहे. त्या ओढीमध्ये काहीही मिळवायचं नाही , असं ठरलेलं आहे. ही अध्यात्मिक उंची त्या प्रत्येक वारकऱ्याला आपोआपच मिळत असे , मिळत आहे. मग वारी ही ज्ञानदान , समाजप्रब्रोधन करणारी असते , असायची. त्याहूनही जास्त महत्त्वाचं म्हणजे मानवतेचं शिक्षण देणारी अशी ही वारी , मानवतेला उंची देणारी अशी ही वारी! जे ज्ञानयोगी , ज्ञानयोगाने आपल्या भूत-भविष्यातून बाहेर पडत असतील , मुक्त होत असतील त्यांना या वारीची गरजही नाही. परंतु सर्वसामान्यांना हे करता येत नाही. ते त्या न उमजणाऱ्या आणि न जमणाऱ्या अद्वैतात गुंतू इच्छित नाहीत आणि आमच्या प्रत्येक वारकऱ्याला हे माहिती असतं की , आत्मा परमात्म्याचाच भाग आहे. जीवात्मा ईश्वराचाच भाग आहे. त्याचं जीवन म्हणजे पाणी आणि पाण्यावर उठलेली लकेर यांचा संबंध आहे किंवा वस्त्र आणि धागा यांचा संबंध आहे. आणि म्हणून त्त्वम असि। असं जर म्हटलं तर मीच तो आहे. बाहेर काहीच शोधायचं नाही , जे काही शोधायचं आहे ते आत आहे. प्रत्येक माणूस ईश्वररूप आहे. प्रत्येक जीवाणू ईश्वररूप आहे.

असं म्हटलं तर मग वेगळा देव आणि मी त्याचा वेगळा भक्त , हे संभवत नाही. हा ज्ञानयोग झाला. बरं तो जमायला अवघड आहे. मग आत्मशुद्धीसाठी सगळ्यात चांगला मार्ग भक्तियोग. मला हे कळत असून , की मी ईश्वराचा अंश आहे. माझ्या सोयीसाठी मी असं म्हणणार की समोरचा देव वेगळा आणि त्याचा मी भक्तही वेगळा. मग त्या देवाला मी जेव्हा समोर ठेवेन , भक्तिभावाने त्या मूतीर्ला धुवून काढेन , त्याला गंध लावेन , त्याला फुलं वाहेन , तेव्हा ती मूतीर् घाण झाली म्हणून मी धुतो , आणि तिला शुद्ध करण्याची , त्या मूतीर्ला सुवास देण्याची माझ्यात कुवत आहे म्हणून गंध वाहतो , फुलं वाहतो , अशी माझी भूमिका नसते.

भक्त म्हणून माझी भूमिका अशी की , माझ्या आतमध्ये जी घाण निर्माण होते ती मला धुवायची आहे! पावित्र्य निर्माण करायचं ते आतमध्ये. सुवास निर्माण करायचा तो आतमध्ये. पण समोर मूतीर् ठेऊन केलं तर माझं मन त्यामध्ये गुंतून राहतंं आणि बाकीच्या व्यवहारात ते भरकटत नाही. त्या मूतीर्मध्ये मन गुंतलं की आतली घाण धुतली जाते. तिला गंध लावला तर आतमध्ये कुठेतरी पावित्र्य निर्माण होतं. त्या मूतीर्ला फुलं वाहिली , तर आतमध्ये कुठेतरी सुवास निर्माण होतो आणि माझी आत्मशुद्धी व्हायला हे साधन म्हणून मला वापरता येतं. या मार्गाने भक्तियोगात गेलं तर गैर काहीच नाही. उलट सर्वसामान्यांना सर्वसाधारणपणे झटकन जमणारा हा आत्मशुद्धीचा मार्ग म्हणून भक्तियोगाकडे आपण बघतो आणि वारीमध्ये हा भक्तियोग अतिशय उच्च दर्जाचा असतो.

आजकाल वारीमध्ये काही अपप्रवृत्ती आल्या , काही धर्माचा बाजार करणारी माणसं आली , वारीचा उपयोग प्रसिद्धीसाठी करणारी माणसं आली , त्यांना आपण थोडा वेळ बाजूला ठेवू. परंतु पिढ्यान्पिढ्या या वारीने फक्त लोकशिक्षणाचं काम केलं असं नाही ; तर समाज सुसंस्कारित करण्याचं कामदेखील केलं आहे. एवढंच नव्हे तर जेव्हा या समाजामध्ये जातपात , वर्णव्यवस्था ही टोकाची होती आणि माणसाला माणूस म्हणून वागवायलाही आपण तयार नव्हतो , त्याही काळामध्ये वारीत हे भेदभाव नव्हते. उच्चवर्ण , कनिष्ठवर्ण वारकऱ्यांना माहीत नव्हता.

श्रीमंत-गरीब वारकऱ्यांच्यामध्ये नव्हते. सर्वजण पायी आणि पायावर आणि सर्वजण समोर एकाच ठिकाणी डोकं ठेवताहेत , हे वारीचं सामाजिक स्वरूप. ते खरं भव्यदिव्य असं स्वरूप आणि मग ही वारी चालतचालत कुणी आठ , कुणी दहा दिवस , कुणी लांबचे लोक पंधरा-पंधरा दिवस चालत-चालत दर मुक्काम , प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी भजनं-कीर्तनं आणि आध्यात्मिक अभ्यास करत दिवसभर रस्त्याने चालत असतात. चालताना एकमेकांशी अध्यात्माचा विषय जमेल त्या प्रकारे बोलत , कुठे टाळ , कुठे मृदुंग आणि देहाला लावलेला तो गंध , गोपीचंद , अष्टगंध या सगळ्यातून बेफाम होणारं विषयांच्या पलीकडचं , व्यवहाराच्या वरच्या दर्जावरचं वातावरण आणि त्याच वातावरणात तो आमचा हरवून गेलेला , विसजिर्त झालेला भक्त-वारकरी! त्याच्या कल्पनेतला तो देव आणि हा आमचा वारकरी हे केव्हाच मुक्त झाले असं म्हणावं लागेल. वारी म्हणजे काय नेलं ?

वारी म्हणजे भक्तीची गाडी , भक्तीचा टँकर. तेव्हा माझ्याजवळ आहे नाही ती सगळी माझी भक्ती , असा हा वारकरी घेऊन निघाला कशासाठी ? पांडुरंगाच्या दारी गेल्यानंतर माझ्याजवळचे हे सर्व मीपण तिथे विसजिर्त करायचं. मला तिथे पांडुरंगाच्या दारी गेल्यानंतर मी कुणी नाही , मला तुझ्यात सामावून घे , असं म्हणण्यासाठी जायचं. ही भक्तियोगातली जी अत्युच्च पायरी , त्या पायरीची ओढ त्या वारकऱ्याला असते. जेव्हा तो चंदभागेच्या वाळवंटात पोहोचतो , तेव्हा या छोट्या छोट्या ओहोळासारख्या , छोट्या नदीसारख्या , आपापली पताका घेऊन निघालेल्या सर्व दिंड्या , चंदभागेत उतरतात. जिथे पाणी नाही , तिथे वारकरीच दिसता. चंदभागेचं वाळवंट आणि पाणी हा संपूर्ण भाग अवघा वारकऱ्यांनीच गजबजून गेलेला दिसतो.

त्याला आपल्या विठ्ठलाला बघायचंय , पुजायचंय आणि त्याच्या चरणी आपलं स्वत्व विलीन करायचंय. बरं एक ध्यानी घेतलं पाहिजे की , जरी आपण असं म्हणतो की , विठ्ठल विष्णूचाच अवतार आहे तरीसुद्धा विठ्ठल हा शेतकऱ्यांचाच अवतार आहे. त्याला कोणी गायी सोडवणारा विठ्ठल म्हणेल , कोणी धनगराचा विठ्ठल म्हणेल. त्याची व्युत्पत्ती वेगवेगळी दिली , तरीसुद्धा तो सामान्यांचा आणि शेतकऱ्यांचा प्रतिनिधी. विष्णूचं हेच रूप संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे , तर दक्षिण भारताला माहीत आहे. या विठ्ठलाच्या पायी जेव्हा आमचा हा

सामान्य मनुष्य जातो तेव्हा इतर कोणत्याही दैवतांंपेक्षा त्याला विठ्ठल माझा आहे , माझ्या जवळचा आहे , असं जाणवत असतं.

तिथून एकदा हा सगळा भक्तिरसाचा भार विठ्ठलाच्या पायी वाहून झाला , श्रद्धा तिथे ठेवून झाली , तो गर्व आणि स्वत्व तिथे विसजिर्त करून झालं , की मग आमचा हलकाफुलका वारकरी पायाला आलेले फोड आणि त्यात मोडलेले काटे यांची पर्वा न करता एक अद्वितीय चिद्विलास आणि अलौकिक समाधान , शांती , शांतता घेऊन तिथून परत निघतो.

वारकऱ्यांचा तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येईल , की जसं व्यायाम करणाऱ्या माणसांना व्यायामशाळेत गेल्याशिवाय चैन पडत नाही , तसं एकदा वारीत गेलेला मनुष्य , त्याने तिथे एकदा नाव नोंदवलं की , तो त्या वारीचा कायमचाच सदस्य झालेला असतो. ही कुणाही चळवळ्यांशिवाय चालणारी सामाजिक चळवळ आहे. या चळवळीतून एक भारतीय संस्कृती , अध्यात्मिक संस्कृती तर वाढतेच , पण त्याचबरोबर समाजमनाची सांस्कृतिक बांधणी होते. ती सामाजिक , सांस्कृतिक आणि धामिर्क प्रबोधनही करते. ही वारी खरं म्हणजे एक अत्युच्च प्रकारची शैक्षणिक , अध्यात्मिक अशी शाळाच आहे. ती उघड्यावर चालते , रस्त्यावर चालते , मुक्कामाच्या ठिकाणी चालते आणि दिवसभर चालता-चालतादेखील चालते !

अशी ही वैशिष्ट्यपूर्ण वारी. ही खरं म्हणजे वर्णन करण्याची किंवा सांगण्यासारखी गोष्ट नसून अनुभवण्याची गोष्ट आहे. हा काही तासांचा किंवा एखाद्या दिवसांचा हा अनुभव असू नये , तर तयारीपासून ते परत पोहोचेपर्यंतचा असावा. तो तसा घेतला , तर मग आमच्या या सामान्य वारकऱ्याला ह्या भक्तिरसात न्हाऊन निघण्यात किती अलौकिक प्रकारचा आनंद मिळत असेल , याचा अंदाज आपल्याला घेता येईल.

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 2, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: