अवांतर वाचन हीच शिदोरी

लहान मुले लहानपणी जसे संस्कार करू तशी ती घडतात. त्यांना घडविण्यात आई-वडील, घरातील मंडळी व शिक्षक यांचे योगदान मोठे. विद्यार्थिदशेतच त्यांना वाचनाची गोडी लावावी. आजची मुले तल्लखबुद्धी आणि आधुनिक तंत्रज्ञानाविषयीच्या ज्ञानामुळे सर्वत्र आत्मविश्‍वासाने वावरतात. लहान वयातच संगणक, टीव्ही या माध्यमाद्वारे त्यांच्या उपजत बुद्धीला पोषक खाद्य मिळते. या माध्यमाचा दुरुपयोग होत नाही ना हे पाहणे पालकांचे कर्तव्य आहे. …..
जवळच्या ग्रंथालयात नाव नोंदणी करून मनोरंजनाची, विज्ञानाची पुस्तके त्यांना द्यावीत. बालवयात गृहपाठाव्यतिरिक्त वाचनाची गोडी निर्माण करणे म्हणजे भक्कम पाया असलेली इमारत उभी करणे. पुढील आयुष्यातील आव्हाने पेलण्यासाठी अवांतर वाचन हीच शिदोरी आहे.
जीवनातील अत्यंत आवश्‍यक आणि नितांत सुंदर भूमिका संस्कार बजावत असतात. संस्काराविना जीवन म्हणजे शुद्ध वजाबाकीच! त्यासाठी बालवयातच मुलांवर संस्कार करणे हे माता-पित्याचे आद्य कर्तव्य आहे. कुंभार माती ओली असतानाच मडक्‍याला हवा तसा आकार देतो, त्याप्रमाणे मुलांवर बालपणी केलेले संस्कार कधीच पुसले जात नाहीत. प्रत्येक मातेने लक्षात ठेवावे की मुलाचा पहिला गुरू ती स्वत: असते. मायेपोटी मुलांना कधीच लाडावू नये. बालवयातच मुलांशी मैत्री करण्याची शिकवण द्यावी. मोठेपणी हेच संस्कार समाजात वावरताना त्यांना आत्मविश्‍वास देतात. संस्कार हीच जीवनाची पहिली पायरी आहे.
संस्कारमय शिक्षण फारच गरजेचे आहे. कारण मुले उद्याचे नागरिक असतात. मला वाटत नाही की आज मुलांना असे संस्कारमय शिक्षण दिले जाते. पालकांनी आणि शिक्षकांनी बालवयातच मुलांवर संस्कार करायला हवेत. नीट बसणे, वागणे, स्वच्छता राखणे, मोठ्यांचा मान राखून बोलणे हे संस्कार पालक व शिक्षकांनीही आपल्या कृतीतून करायला हवेत. त्यासाठी वेगळा उपक्रम राबवायची गरजच नाही.

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 2, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: