मेघदूत

महाकवी कालिदासकृत अजरामर रचनेच्या काव्यानुवादाचा एक प्रयत्न करत आहे. मूळ संस्कृत मेघदूत येथे मिळू शकेल.

कश्चितकान्ता विरहगुरूणा स्वाधिकारात्प्रमतः शापेनास्तङ्गणितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ।
यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु स्निग्धच्छायातरूषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ।। १ ।।

संवत्सरपूर्ण अर्धांगिनाचा विरही घाव जया मर्मी
फळ भोगण्यासी उद्दामपणाची यक्ष एक अधिकारी
जनकपुत्रीच्या स्नानाने जाहल्या पुनीत तडागतीरी
तरूंच्या छाया महाकाय वसे रामगिरीच्या आश्रमी

तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः ।
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।। २ ।।

भोगीतो काळ उदासी रूतती प्रियेच्या आठवणी
वाळल्या बाहुतुनी त्वरे सरती सोनियाच्या वाकी
आषाढी प्रथम दिनी प्रकटला लघु मेघ मालेतुनी
भासला मदोन्मत्त गज उत्सुक जणु तो संगरी

तस्य स्थित्वा कथमपि पुरः कौतुकाधानहेतोः अन्तर्बाष्पश्चिरमनुचरो राजराजस्य दध्यौ ।
मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्ति चेतः कण्ठाश्लेषप्रणयिनि जने किं पुनर्दूरसंस्थे ।। ३ ।।

यक्षराजाच्या सेवकास दिसे बहु आशेनी
खचितच तो बाष्प समोर उभा होवोनी
थांबवी त्यांस वाट करू पाहे जो नयनांची
वसे तया अंतरी परी विकल यश प्रयत्नांती

अवलोकीता जयास कातर जेथ होती
सुखसागरी मिनलेली युगुले की प्रणयी
व्हावी कशी स्थिती विलगांची जे दिगंतरी
इच्छुक बाहुंचे अलंकार चढविण्या कंठांसी

प्रत्यासन्ने नभसि दयिताजीवितालम्बनार्थी जीमूतेन स्वकुशलमयीं हरयिष्यन् प्रवृत्तिम् ।
स प्रत्यग्रैः कुटजकुसुमैः कल्पितार्घाय तस्मै प्रीतः प्रीतिप्रमुखवचनं स्वागतं व्याजहार ।। ४ ।।

जाणे श्रावण कुशल पाठीसी
कळविण्या क्षेम तिजसाठी
आधार केवल हाच जीवनी
जीने व्यापले मन नभासी

सुपुष्पे तया अर्पीली कुटजांची
करीतो मधुर भाषणे वैखरीसी
स्वागतार्थे हर्षीत चित्ती होवोनी
करीतसे अर्घ्य आदी उपचारी

धूमज्योतिः सलिलमरुतां संनिपातः क्व मेघः संदेशार्थाः क्व पटुकरणैः प्राणिभिः प्रापणीयाः ।
इत्यौत्सुक्यादपरिगणयन् गुह्यकस्तं ययाचे कामार्ता हि प्रकृतिकृपणाश्चेतनाचेतनेषु ।। ५ ।।

काया म्हणो ते उष्ण वाफेसवे अनिल
असा मेघ जीवन दूत काय होईल?
कुठे ठेवु विवेक म्हणे खजिनदार
करतात घायाळ जेव्हा मदनाचे शर!

जातं वंशे भुवनविदिते पुष्करावर्तकानां जानामि त्वां प्रकृतिपुरुषं कामरूपं मघोनः ।
तेनार्थित्वं त्वयि विधिवशाद्दूरबन्धुर्गतोऽहं याच्ञा मोघा वरमधिगुणे नाधमे लब्धकामा ।। ६ ।।

पुष्करावर्तक नामे कुळासी तुवा जन्मलासी
इच्छावेषी असशी अमृत इलेसी सर्वही जाणती
करू पाहतो तुजसी आर्जवी विनंती नम्र विरही
कधीही नकार श्रेष्ठ तुझा कुटीलांच्या सहाय्यापरी

संतप्तानां त्वमसि शरणं तत् पयोद प्रियायाः संदेशं मे हर धनपतिक्रोधविश्लेषितस्य ।
गन्तव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वराणां बाह्योद्यानस्थितहरशिरश्चन्द्रिकाधौतहर्म्या ।। ७ ।।

तूची शमवीतो तापाते संदेश मज प्रियेसी देणे
अग्नीसागरी हृदय ठेवीले मी धनपती क्षोभाने
यक्षेश्वराचा असे वास अलकापुरीस जाणे करावे
तेजाळीत बाहेरी उद्यानी असे शशी ललाटी शिवाते

त्वामारूढं पवनपदवीमुद्गृहीतालकान्ताः प्रेक्षिष्यन्ते पथिकवनिताः प्रत्ययादाश्वसन्त्यः ।
कः संनद्धे विरहविधुरां त्वय्युपेक्षेत जायां न स्यादन्योऽप्यहमिव जनो यः पराधीनवृत्तिः ।। ८ ।।

कौतुके बघतील स्वारी तुझी भार्या पांथस्थांच्या
उंचावीत माना भुरभरत्या बटांसवे त्या वायुच्या
आरोहणा होईसी तू तयार उपेक्षी कोण विरही नर?
नसे दुर्भाग्ये परवशता कुणास निश्चित मजसमान!

मन्दं मन्दं नुदति पवनश्चानुकूलो यथा त्वां वामश्चायं नदति मधुरं चातकस्ते सगन्धः ।
गर्भाधानक्षणपरिचयान्नूनमाबद्धमालाः सेविष्यन्ते नयनसुभगं खे भवन्तं बलाकाः ।। ९ ।।

अनुकुल वाहता वारा नेई तुजसी गंतव्या
उडतो चातक मंजुळ समीप सुवास येता
स्मरूनी गर्भाधानाचा क्षण मुदीत जाहल्या
तुझिया सेवेसी रांगेत क्रौंचिणी सुखद नयना

तां चावश्यं दिवसगणनातत्परामेकपत्नीं अव्यापन्नामविहतगतिर्द्रक्ष्यसि भ्रातृजायाम् ।
आशाबन्धः कुसुमसदृशं प्रायशो ह्यङ्गनानां सद्यःपाति प्रणयि हृदयं विप्रयोगे रुणद्धि ।। १० ।।

टाळोनी अडथळे तू खचित् ते जाशी पाहण्यासी
सरल्या दिवसांना मोजण्यात मग्न तुझी वहीनी
कोमल जाहली दोरी परी आशेचिया पाकळ्यांनी
उर कातळी जाते स्त्रियांचे निमेषे वियोग समयी

कर्तुं यच्च प्रभवति महीमुच्छिलिन्ध्रामवन्ध्यां तच्छ्रुत्व अ ते श्रवणसुभगं गर्जितं मानसोत्काः ।
आ कैलासाद्बिसकिसलयच्छेदपाथेयवन्तः संपत्स्यन्ते नभसि भवतो राजहंसाः सहायाः ।। ११ ।।

तव प्रसन्न गर्जना रोमांचिते हिरवळी धरित्रीला
जाण्याची मनीषा मानस सरोवरा येईल सह थवा
नभी मनोहर राजहंसांचा चोंची कमलिनी जयांच्या
जिनसा प्रवासाच्या मार्गाते शिखर जे सुंदर कैलासा

आपृच्छस्व प्रियसखममुं तुङ्गमालिङ्ग्य शैलं वन्द्यैः पुंसां रघुपतिपदैरङ्कितं मेखलासु ।
काले काले भवति भवतो यस्य संयोगमेत्य स्नेहव्यक्तिश्चिरविरहजं मुञ्चतो वाष्पमुष्णम् ।। १२ ।।

प्रिय मित्रा दे निरोप पर्वतास वंदनीय जाहल्या
स्पर्शुनी रघुपतीच्या उमटल्या पावलांची मेखला,
जडला अनुबंध लोटला काळ ऋतुपरी ऋतुंचा
अरे, प्रसंग वियोगांचे असतां उच्छ्वास वाफाळला !

मार्गं तावच्छृणु कथयतस्त्वत्प्रयाणानुरूपं संदेशं मे तदनु जलद श्रोष्यसि श्रोत्रपेयम् ।
खिन्नः खिन्नः शिखरिषु पदं न्यस्य गन्तासि यत्र क्षीणः क्षीणः परिलघु पयः स्रोतसं चोपभुज्य ।। १३ ।।

वर्णितो मार्ग तुजसाठी योग्य प्रवासाचा
माझिया निरोप श्रवणीय शब्दी बांधला
जेव्हा कृश होता, येता शीण शिखरांचा
मिळेल पुष्टता प्राशिता जळांस नद्यांच्या

अद्रेः शृङ्गं हरति पवनः किं स्विदित्युन्मुखीभिर् द्र्ष्टोत्साहच्चकितचकितं मुग्धसिद्धाङ्गनाभिः ।
स्थानादस्मात् सरसनिचुलादुत्पतोदङ्मुखः खं दिङ्नागानां पथि परिहरन् स्थूलहस्तावलेपान् ।। १४ ।।

हलकेच व्हावे आरोहण व्योमाचे उत्तरेच्या
टिळे भुवयांमध्ये तपस्विनींच्या चकीत माथा
म्हणती नेतो पवन जणू विशाल पर्वताचा
चकवी मत्त गजांना निवास सारस पक्ष्यांचा

रत्नच्छायाव्यतिकर इव प्रेक्ष्यमेतत् पुरस्ताद् वल्मीकाग्रात् प्रभवति धनुष्खण्डमाखण्डलस्य ।
येन श्यामं वपुरतितरां कान्तिमापत्स्यते ते बर्हेणेव स्फुरितरुचिना गोपवेशस्य विष्णोः ।। १५ ।।

वारुळाचे टोक इंद्रधनुते प्रकाशले
प्रभावळ मनोरम रत्नांची जडलीसे
श्यामवर्णाते तुझिया झळाळी चढतसे
मोरपीस मस्तकी श्रीहरीच्या गोपवेषे

त्वय्यायत्तं कृषिफलमिति भ्रूविलासानभिज्ञैः प्रीतिस्निग्धैर्जनपदवधूलोचनैः पीयमानः ।
सद्यःसीरोत्कषणसुरभि क्षेत्रमारुह्य मालं किंचित्पश्चाद्व्रज लघुगतिर्भूय एवोत्तरेण ।। १६ ।।

पापण्या बहु स्नेहाळ सुहासिनींच्या आनंदल्या
करतील तव नांगरणी मनी कल्पना सुगीच्या
धर प्रतिच्य थोडी पुनश्च मार्ग नंतर उत्तरेचा
चढावात मोहरल्या भूमीवरोनी मालाप्रदेशाच्या

त्वामासारप्रशमितवनोपप्लवं साधु मूर्ध्ना वक्ष्यत्यध्वश्रमपरिगतं सानुमानाम्रकूटः ।
न क्षुद्रोऽपि प्रथमसुकृतापेक्षया संश्रयाय प्राप्ते मित्रे भवति विमुखः किं पुनर्यस्तथोच्चैः ।। १७ ।।

आम्रकुट गिरी घेईल तुजसी शिरी
स्मरूनी उरी नाचल्या होत्या सरी
शमविले परि वनाचे दावानाल तरी
शिणलास जरी, मार्ग तुझा नभावरी

सानही धरी छत्र मदतीचे न अंतरी
आठवे बरी केले जव तया उपकारी
संशय न करी जाणतो पहा व्यवहारी
उन्नतांची रिती असतेच सदा न्यारी

छन्नोपान्तः परिणतफलद्योतिभिः काननाम्रैः त्वय्यारूढे शिखरमचलः स्निग्धवेणीसवर्णे ।
नूनं यास्यत्यमरमिथुनप्रेक्षणीयमवस्थां मध्ये श्यामः स्तन इव भुवः शेषविस्तारपाण्डुः ।। १८ ।।

तेल श्याम वेणीवरी तैसी तुझी कांती
सुशोभियले उजळत्या गिरिसी तरूंनी
आम्राचिया पक्वांनी भासे स्तनाग्र वसुधे
दिव्य लावण्य पाहतील स्वर्गीची युगुले

स्थित्वा तस्मिन् वनचरवधूभुक्तकुञ्जे मुहूर्तं तोयोत्सर्गद्रुततरगतिस्तत्परं वर्त्म तीर्णः ।
रेवां द्रक्ष्यस्युपलविषमे विन्ध्यपादे विशीर्णां भक्तिच्छेदैरिव विरचितां भूतिमङ्गे गजस्य ।। १९ ।।

वाढेल वेग तुझिया उडण्याचा
कुंजवनी भिल्ल भिल्लिणी दिसता
वर्षाव तयांच्या प्रीतीचा, आणिक
तुझा धारांचा करी क्षणे हलका

सोडीते मोकळे नर्मदा केसांना
शिळांनी विपुल चरणी विन्ध्याच्या
फिरवित जणू हत्तीवरी कुंचला
चितारले रांगोळीस मनोरमा

तस्यास्तिक्तैर्वनगजमदैर्वासितं वान्तवृष्टिः जम्बूकुञ्जप्रतिहतरयं तोयमादाय गच्छेः ।
अन्तःसारं घन तुलयितुं नानिलः शक्ष्यति त्वां रिक्तः सर्वो भवति हि लघुः पूर्णता गौरवाय ।। २० ।।

तदितर कर वृष्टी प्राशुनी त्या जळासी
गंध गजमद क्रिडेने मिळाला तयासी
हरत कदंब तो आवेश छाती समोरी
मग निघ पथ घ्यावा तू पुढील्या गतीसी

अनिल नच घेई रे तुझे तोय दूता
रजःकणसम आकारास छोटा रिकामा
अपि न संशय वृथा तू मनासी धरावा
सरळच जव प्राप्ती आदरास पूर्णता

नीपं दृष्ट्वा हरितकपिशं केषरैरर्धरूढैः आविर्भूतप्रथममुकुलाः कन्दलीश्चानुकच्छम् ।
जग्ध्वारण्येष्वधिकसुरभिं गन्धमाघ्राय चोर्व्याः सारङ्गास्ते जललवमुचः सूचयिष्यन्ति मार्गम् ।। २१ ।।

कळ्या हिरव्या नीपांच्या काही उमलल्या
पहा सजवती नदिच्या केशरी तीरांना
अनलाने भक्षिल्या वनांना गंध भूमीचा
नेतील सारंग मार्गे जीवन वर्षण्याच्या

उत्पश्यामि द्रुतमपि सखे मत्प्रियार्थं यियासोः कालक्षेपं ककुभसुरभौ पर्वते पर्वते ते ।
शुक्लापाङ्गैः सजलनयनैः स्वागतीकृत्य केकाः प्रत्युद्यातः कथमपि भवान् गन्तुमाशु व्यवस्येत् ।। २२ ।।

काळ सरेल बहु जरी घाई मजसाठी
दरवळ कुकुभ पुष्पांची पर्वतांवरी
निरोप मोरांचा घ्यावा उत्सुक स्वागतासी
आळविती राग जळी जडावल्या डोळ्यांनी

पाण्डुच्छायो पवनवृतयः केतकैः सूचिभिन्नैः नीडारम्भैर्गृहबलिभुजामाकुलग्रामचैत्याः ।
त्वय्यासन्ने परिणतफलश्यामजम्बूवनान्ताः संपत्स्यन्ते कतिपयदिनस्थायिहंसा दशार्णाः ।। २३ ।।

केतकीच्या फुललेल्या श्वेत फुलांची जणू छाया
शोभिवंते वन संपता दशार्ण देशाची सीमा
आगमन तुझे जवळ जाहले असे तयाच्या
गावात फळांनी श्याम डवरल्या जंबू तरूंच्या

भुजा बलवान तयांच्या संपन्न परी जाहल्या
घरटी काक आणिक इतरही पक्षीसृष्टीच्या
कोलाहल भरतो तेथ आसमंत रचण्याचा
निवास अवश्य तेथ काही दिवसांचा हंसांचा

तेषां दिक्षु प्रथितविदिशालक्षणां राजधानीं गत्वा सद्यः फलमपि महत् कामुकस्य लुब्धा ।
तीरोपान्तस्तनितसुभगं पास्यसि स्वादु यंत्र सभ्रुभङ्गं मुखमिव पयो वेत्रवत्याश्चलोर्म्याः ।। २४ ।।

वेत्रावतीच्या तीरी पितांना गोड पाणी
गुंजतो नाद खेळत्या लाटांचा उत्साही
जणू पापण्या मुखी पिडल्या कामज्वरी
येता जव तू विदिशा नाम राजधानी

नीचैराख्यं गिरिमधिवसेस्तत्र विश्रामहेतोस्त्वत्संपर्कात्पुलकितमिव प्रौढपुष्पैः कदम्बैः ।
यः पण्यस्त्रीरतिपरिमलोद्गारिभिर्मागरणामुद्दामानि प्रथयति शिलावेश्मभिर्यौवनानि ।। २५ ।।

आराम करावा नीचै नामक पर्वतासी
कदंब फुलांनी मुदित तव सान्निध्यानी
दरवळल्या गुहा तयाच्या रतिक्रिडेनी
गंध उधळी उद्दाम द्रव्याची तरूणाई

विश्रान्तः सन्व्रज वननदीतीरजानां निषिञ्चन्नुद्यानानां नवजलकणैर्यूथिकाजालकानि ।
गण्डस्वेदापनयनरुजाक्लान्तकर्णोत्पलानां छायादानात्क्षणपरिचितः पुष्पलावीमुखानाम् ।। २६ ।।

विश्रांती होताच पुन्हा प्रस्थान
शिंपडीत जास्वंदाचे पराग
उद्यानांनी पसरल्या ताटव्यांत
ओळी वननदीच्या तीरांवर

छायेचे छत्र मस्तकी धरून
दे क्षणभर परिचय स्त्रियांस
कर्णफुले जयांची झाली म्लान
फुले वेचितांना श्रम अपार

वक्रः पन्था यदपि भवतः प्रस्थितस्योत्तराशां सौधोत्सङ्गप्रणयविमुखो मा स्म भूरुज्जयिन्याः ।
विद्युद्दामस्फुरितचकितैस्तत्र पौराङ्गनानां लोलापाङ्गैर्यदि न रमसे लोचनैर्वञ्चितोऽसि ।। २७ ।।

फुगडी खेळतो मार्ग उत्तर दिशेला
परी टाळावा दुरावा प्रणयी वीजेचा
नांदते ती उज्जैयनीकरांच्या नयना
चलबिचल न होऊ देईल चतुरा

वीचिक्षोभस्तनितविहगश्रेणिकाञ्चीगुणायाः संसर्पन्त्याः स्खलितसुभगं दर्शितावर्तनाभेः ।
निर्विन्ध्यायाः पथि भव रसाभ्यन्तरः सन्निपत्य  स्त्रीणामाद्यं प्रणयवचनं विभ्रमो हि प्रियेषु ।। २८ ।।

निर्विन्ध्या अडखळेल पाहून तुजला
घे अनुराग रोमांचित जाहल्या तिचा
पक्ष्यांचे कूजन सोबतीस खळखळाटा
उगी लाजणे जणू स्त्रीचा शब्द प्रेमाचा
टिप – प्रतिच्य म्हणजे पश्चिम दिशा.

Advertisements

~ by manatala on जुलै 31, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: