किरकोळ नियम

नियम ९ : पूर हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना यातील ‘पू’ दीर्घ लिहावा.

उदाहरणार्थ: नागपूर, तारापूर, सोलापूर.

नियम १०: ‘कोणता, एखादा’ ही रूपे लिहावीत. ‘कोणचा, एकादा’ ही रूपे लिहू नयेत.

नियम ११: ‘हळूहळू, चिरीमिरी’ यांसारख्या पुनरुक्त शब्दांतील दुसरे व चौथे ही अक्षरे दीर्घान्त लिहावीत. परंतु यांसारखे पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे ऱ्हस्व लिहावेत.

उदाहरणार्थ: लुटुलुटु, दुडुदुडु, रुणुझुणु.

नियम १२: एकारान्त सामान्यरूप या-कारान्त करावे.

उदाहरणार्थ: करणे – करण्यासाठी; फडके – फडक्यांना.

अशा रूपांऐवजी ‘करणेसाठी, फडकेंना’ अशी एकारान्त सामान्यरूपे करू नयेत.

नियम १३: लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे.

उदाहरणार्थ: असं केलं; मी म्हटलं, त्यांनी सांगितलं.

अन्य प्रसंगी ही रूपे ए-कारान्त लिहावीत.

उदाहरणार्थ: असे केले; मी म्हटले; त्यांनी सांगितले.

नियम १४: ‘क्वचित्, कदाचित्, अर्थात्, अकस्मात्, विद्वान्’ यांसारखे मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द व्यंजनान्त (म्हणजेच पायमोडके) न लिहिता ‘क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात, विद्वान’ याप्रमाणे अ-कारान्त लिहावेत. कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतील उच्चाराप्रमाणे लेखन करावे. इंग्रजी शब्द, पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अ-कारान्त अक्षर आता व्यंजनान्त (म्हणजेच पायमोडके) लिहू नये.

नियम १५: केशवसुतपूर्वकालीन पद्य व विष्णुशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावेत. तदनंतरचे (केशवसुत व चिपळूणकर यांच्या लेखनासह) मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखनविषयक नियमांस अनुसरून छापावे.

नियम १६: ‘राहणे, पाहणे, वाहणे’ अशी रूपे वापरावीत. ‘रहाणे, राहाणे; पहाणे, पाहाणे; वहाणे, वाहाणे’ अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग करताना मात्र ‘राहा, पाहा, वाहा’ यांबरोबरच ‘रहा, पहा, वहा’ अशी रूपे वापरण्यास हरकत नाही.

नियम १७: ‘ही’ हे अव्यय तसेच ‘आदी’ व ‘इत्यादी’ ही विशेषणे दीर्घान्तच लिहावीत.

नियम १८: पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना ऱ्हस्व-दीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असावे.

Advertisements

~ by manatala on जुलै 31, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: