थालीपीठ

ताल्पिट.. क्या होता है ये?” माझ्या अमराठी रूममेट्ने शक्य तितका बरोबर उच्चार करत विचारलं.
” ओह, थालीपीठ ( ठ चा अगदी ठसठशीत उच्चार करत) अरे बहोत सही होता है.. मेरी मॉम बनाती है ना ( माझ्या जवळपास सगळ्या पदार्थांची सांगायची सुरवात माझी आई/मावशी/ काकू/ आत्या/ आज्जी यानी बनवलेल्या त्या पदार्थांच्या आठवणीत रमलेल्या मनाला जागं करून होते. ) तो पहले हम सारे आटे (??) आय मीन सारे फ्लोअर लेके उसमे ओनियन ( प्याज गं ,माझी बयो) डालते है और उसका गोला बनाके तवे पे थापते मतलब लगाते है.. ( हिंदीचा आणि पर्यायाने थालीपीठाच्या रेसिपीचा यथास्थित चुराडा करूनही माझ्या रूममेटच्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह काय संपलं नाही.)

आता एखादीनं काय केलं असतं की एकतर गेला बाजार आपली हिंदी सुधारून चांगली रेसिपी दिली असती नाहीतर कमीतकमी थालीपीठ करून खायला घातलं असतं. पण नाही, आम्ही समस्या दिसली किंवा नसली तरी शोधून काढून त्याचे विश्लेषण करणार. तिच्या (समस्येच्या हो) मूळावर घाव घालायच्या प्रयत्नात आम्ही. तर आमचे असं का होतं? दाक्षिणात्यांची इडली-डोसा-सांबार , पंजाब्यांचे सरसों का साग आणि मक्के की रोटी इतकं जगप्रसिध्द आणि जगभर मिळत असताना आमच्या मराठी पदार्थांना काहीच ‘ब्रँड व्हॅल्यू’ असू नये म्हणजे काय ते! प्रश्न अगदी मराठी अस्मिता- आम्ही मराठी सदैव मागंमागंच का, अशा धोकादायक वळणांवर जाताना पाहून मी विचारांचे उधळलेले घोडे आवरले आणि पाककृतीचा शोध सुरू केला.
अस्सल मराठीतून गुगलून झाल्यावरही हव्या तशा पाककृती सापडेनात ( थालीपीठ हा एक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आहे यावर विकी ने थालीपीठाला खाऊन टाकलं होतं!) मराठीतून फूड ब्लॉग (अर्थात अन्न्-जालनिशी??) खूपच कमी आहेत असंही दिसलं. इंग्लिश्मधले सुरेख छायाचित्रांनी नटलेले ब्लॉग्ज पाहून खर्‍या अर्थानं रसना रसरसली. पण असे सुरेख पदार्थ माझ्या हाती आपलं सारं अस्तित्व विसरून तिसर्‍याच कशाच्या रूपात अवतीर्ण होतात हे काही नवीन नाहिये! आताही थालीपीठांनी तवा सोडायचं नाकारलं, आपलं तोंड काळं करत तव्याचा बट्ट्याबोळ करवला जेणेकरून माझ्या रूममेट्ला कुठुन ही अवदसा आठवली याचा पुनःप्रत्यय दिला.(काम आणि कंटाळा याच्या अभूतपूर्व संगमामुळे मी मागच्या पोस्टवरती अजून प्रतिक्रिया टाकतेच आहे, अशा भयानक उत्साही मला असलं काही सुचलं याचं समाधान वाटावं की केलेल्या पराक्रमामुळे थक्क व्हावं असा पेच पडला असणार तिला!! 😀 ) आणि वरती माझी प्रतिक्रिया होतीच, अरे मेरी मॉम ये बहोत अच्छा बनाती है.. ( खरंतर ‘मी बनवलेला हा पदार्थ आतापर्यंत मी खाल्लेला सर्वोत्कृष्ट पदार्थ आहे’ आणि ‘माझे केस हे सगळ्यात सुंदर केस आहेत’ असं म्हणणारी मुलगी/तरूणी/स्त्री/ वृद्धा मलातरी आढळलेली नाहीये, त्यामुळे मी ही काहीही केलं आणि कसंही झालं तरी पहिलं वक्तव्य करायचं सोडत नाही!!)
माझे प्रयोग मी संपवल्यानंतर माझ्या रूमीने शहाणपणाने भात रांधायला घेतला आणि डाळ शिजायला ठेवली. तस्मात काय, कधीतरी स्वयपाकघरात जाऊन प्रयोग करण्यापेक्षा मराठी अस्मिता जपायचे अजून मार्ग आहेत ( आणि ते तोंडातून जात असले तरी पोटात जात नाहीत!) त्यामुळे बोलांच्या कढीभाताचे प्रयोग सुरू ठेवणे श्रेयस्कर!

Advertisements

~ by manatala on जुलै 30, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: