ऐकावे जनाचे (अभियांत्रिकी प्रवेश)

बारावीची परीक्षा आटोपून निकाल जाहीर झाला की लगबग सुरू होते ‘पुढच्या वाटा’ ठरविण्याची. अगदी हल्लीहल्लीपर्यंत शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांची मानसिकता ‘चांगले मार्क मिळाले, प्रवेश मिळत असेल तर अभियांत्रिकी नाहीतर वैद्यकीय शाखेकडे जायचे’ अशी होती. अभियांत्रिकीला पर्याय ठोकळेबाज असायचे. पण गेल्या काही वर्षांत असंख्य ज्ञानशाखांचे आणि शिक्षणसंस्थांचे पेव फुटल्यामुळे ही निर्णयप्रक्रीया कमालीची गोंधळून टाकणारी झाली आहे ! ‘कुठल्या महाविद्यालयात कुठली शाखा’ ही कॉंबिनेशन्स गोंधळात भरच टाकतात ! मग हा गोंधळ निस्तरायला काही लोक तज्ञांचे (!) मार्गदर्शन घेतात, काही समुपदेशनाचा आधार शोधतात, काहीजण ‘कल चाचणी’ देतात, तर काही चक्क ‘चार लोक काय करतायत’ ते करतात !
‘चार लोक’ काय सांगतात ? या ‘चार लोकांत’ तज्ञ आले, पालक आले, सिनिअर्स आले, आणि ज्यांचा अभियांत्रिकीशी काहीच संबंध नाही ते पण आले !!

वाचा !!

“छे छे ! तुमच्या त्या सगळ्या कॉम्प्यूटर, इलेक्ट्रॉनिक्स या म्हणजे ‘वडापाव ब्रॅंचेस’. खरे इंजिनिअरिंग म्हणजे कोअर ब्रॅंचेस – मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल नाहीतर सिव्हिल.”
“अहो ते कॉम्प्यूटरचे काही खरे नाही. आज आहे, उद्या नाही. मेकॅनिकल, आणि सिव्हिल कसे – जग बुडाले तरी छिन्नी हातोडा कुठे जात नाही !”
“कॉम्प्यूटर ना, साईड बाय साईड करता येते. NIIT मधे नाही का ढिगाने कोर्स असतात.”
“मेकॅनिकल करून कॉम्प्यूटरला जाता येते नंतर. उलटे नाही करता यायचे.”
“प्रिंटिंग चांगले. त्यात थोड्याच सीट्स असतात. सगळ्यांना नोक-या मिळतात.”
“इलेक्ट्रॉनिक्स च्या ऐवजी कॉम्प्यूटर ला जा. तसा अभ्यासक्रम सारखाच असतो. कॉम्प्यूटर ला नोक-या ब-या मिळतात हल्ली.”
“शी प्लेन इलेक्ट्रॉनिक्स अजिबात घेऊ नकोस. इलेक्ट्रॉनिक्स विथ टेलिकॉम असेल तरच घे बाई !”
“मेकॅनिकल ला मरण नाही!”
“VIT म्हणजे नुस्ती शाळा आहे. कॉलेज लाईफ पण हवे की नाही थोडेसे !”
“शेवटी COEP ते COEP ! आम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज म्हटले की तेवढेच समजते. बाकीच्या कॉलेज मधे काही अर्थ नाही”
“छे हो ! हल्ली COEP मधे काही राम राहिलेला नाही. बेकार स्टाफ !”
“ते ऑटॉनॉमी का कायससं मिळालं आहे ना आता COEP ला ? ते बरं का वाईट ?”
“PVG घराच्या जवळ आहे. तेच घेतलेले बरे…”
“MIT चे कॅंटीन कसले आहे पहिलेस का ? कॅम्पस स्टड आहे !”
“कम्मिन्स्स नक्को घेऊ बाई. नुस्तं मुलींचं कॉलेज. नो गाईज 😦 सो बोअरिंग…”
“उलटं बरं की ग ! जरा सुरक्षित वाटतं आपल्या मुलींना घालायचं तिथे म्हणजे…”
“COEP हे बोट क्लब असलेले एकमेव कॉलेज आहे ! Full Maaz !”
“PICT हे Comp ला बेस्ट आहे. इतक्या वर्षांची परंपरा आहे…”
“पण ओव्हरऑल COEP ला प्लेसमेंट चांगले आहे.”
“इथे जॉब कुणाला करायचाय ? इथे डिग्री छापायची आणि सरळ स्टेट्स ला सुटायचे. Purdue नाहीतर Stanford मधून MS झाले की लाईफ बनेल.”

कशासाठी शिकायचे ?
Engineer College मधे कशासाठी जायचे ?
ज्ञान, आवड, गरज, पैसा, समाधान, सामाजिक प्रतिष्ठा, छंद, Extracurricular Activity, टवाळक्या, आई-बाबांना कृतार्थ करायला… नक्की कशासाठी ?
प्रत्येक शाखेत काय शिकावयास मिळते ?
तुम्हांस ते आवडते का ?
झेपेल का ?
पुढे करियर च्या संधी काय असतात ?
वस्तुस्थिती काय आहे ?
बदलत्या जगाचे नियम काय आहेत ?

स्वत:ला काडीची अक्कल नसताना लोकांना फुकटचे सल्ले देणारे आणि गैरसमज पसरविणारे हे महामूर्ख आजूबाजूला नसते तर किती बरे झाले असते नाही ?

Advertisements

~ by manatala on जुलै 30, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: