टीडीएस सटिर्फिकेट हवेच!

म. टा. व्यापार प्रतिनिधी

उगमस्थानी करकपात अर्थात टॅक्स डिडक्शन अॅट सोर्स (’टीडीएस’) ही यंत्रणा गतिमान करवसुलीच्या हेतूने निर्माण करण्यात आलेली आहे. ‘टीडीएस’ कर भरण्याची जबाबदारी ही यंत्रणा मालकावर किंवा उत्पन्न देणाऱ्यावर टाकते. कराच्या आकारणीनुसार कर भरला जाण्यापूवीर् इन्कम टॅक्स उगमस्थानी (अॅट सोर्स) कापून तो ‘टीडीएस’ निर्धारित तारखेपर्यंत सरकारकडे जमा केला जातो. आथिर्क वर्षात ठराविक मर्यादेच्या आत उत्पन्न असेल तरच व्यक्तींना ‘टीडीएस’ कपातीतून सूट मिळते. उदाहरणार्थ, ‘एनएसएस’मधील (नॅशनल सेव्हिंग्ज स्कीम) गुंतवणुकीवर मिळालेले उत्पन्न २,५०० रु.च्या वर नसेल, त्यावर ‘टीडीएस’ लागू होणार नाही. ‘टीडीएस’ जेथे कापून घेतला जातो तेथे ही रक्कम कापून घेणारा एम्प्लॉयर किंवा मालकाने ज्या कर्मचाऱ्याच्या वेतानातून, उत्पन्नातून ही रक्कम कापून घेतली त्याला सदर कपातीची पावती अर्थात ‘टीडीएस सटिर्फिकेट’ द्यावे लागते. हे ‘टीडीएस सटिर्फिकेट’ मिळविल्यानंतरच ते त्याला इन्कम टॅक्सपोटी आधीच पैसे भरल्याचा पुरावा म्हणून इन्कम टॅक्स खात्याला सादर करता येते. सध्या एक लाख रुपयांपर्यंतचे वाषिर्क उत्पन्न सरकसकट करमुक्त आहे, तर महिलांसाठी ही उत्पन्न मर्यादा १ लाख ३५ हजार रु. व ज्येष्ठ नागरिकांसाठी १लाख ८५ हजार रु. आहे. ‘टीडीएस’ची कपात केलेली रक्कम म्हणजे तुम्ही सरकारकडे आगाऊ जमा केेलेले पैसे असतात. ‘टीडीएस सटिर्फिकेट’सह जेव्हा तुम्ही टॅक्स रिटर्न फाइल करता तेव्हा लागू असलेल्या रकमेपेक्षा अतिरक्त कर कापून घेण्यात आलेला असल्यास तो तुम्हाला परत मिळणार असतो. कटकटमुक्त टॅक्स क्रेडिट मिळवायचे असेल तर ‘टीडीएस सटिर्फिकेट’सह तुम्ही जेव्हा टॅक्स रिटर्न फाइल करता तेव्हा ओरिजनल टीडीएस सटिर्फिकेट सादर करायला हवे. सर्व माहिती, कर कापून घेणाऱ्याचा (टॅक्स डिडक्टर) ‘टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर (’टॅन’), तुमचा स्वत:चा ‘पॅन’ (पर्मनन्ट अकाउंट नंबर) यासह नीट भरून दिलेली असली पाहिजे. त्यावर हे ‘टीडीएस सटिर्फिकेट’ देणाऱ्याची व्यवस्थित सही व शिक्का असला पाहिजे. काही वेळा दोन आथिर्क वर्षांमध्ये मिळू घातलेल्या उत्पन्नाचे ‘कॉमन टीडीएस सटिर्फिकेट’ दिले जाऊ शकतेे. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचे घर एका कंपनीला भाड्याने दिलेले आहे आणि त्या कंपनीने सहा महिन्यांचे भाडे (जानेवारी २००७ ते जून २००७) तुम्हाला अॅडव्हान्स दिले आहे. त्या कंपनीला तुमचा ‘टीडीएस’ कपात करणे बंधनकारक असते. तेव्हा ती कंपनी दोन आथिर्क वर्षांचे (२००६-०७ आणि २००७-०८) ‘कॉमन टीडीएस सटिर्फिकेट’ देते. अशा वेळी त्या सहा महिन्यांच्या ‘टीडीएस’चाच क्लेम करता येईल. संपूर्ण आथिर्क वर्षाचा ‘टीडीएस’ क्लेम करण्याची घाई करता येणार नाही. एक गोष्ट मात्र नेहमीच लक्षात ठेवावी, ती म्हणजे ‘पॅन’ कार्डाशिवाय ‘इन्कम टॅक्स रिफंड’ किंवा ‘क्रेडिट फॉर टॅक्स’ मिळवता येत नाही. …………………………………………………………………….. ओरिजनल टीडीएस सटिर्फिकेट सादर करणे हवे इन्कम टॅक्सपोटी आधीच पैसे भरल्याचा पुरावा अतिरक्त कर कापून घेतला असल्यास परत मिळतो

Advertisements

~ by manatala on जुलै 28, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: