सम्यक श्रवण

आजचे युग विज्ञानयुग म्हणून ओळखले जाते. सर्वत्र ज्ञानाचा विलक्षण प्रचार आज आढळतो. ज्ञानी माणसाने बोलत राहणे आणि जिज्ञासूंनी ऐकत राहणे हा ज्ञानाच्या आदान-प्रदानाचा साधा सरळ मार्ग आहे. विविध व्याख्यानमाला, शैक्षणिक वर्ग, शिबिरं, शाळा, कॉलेजेस या सर्व ठिकाणी हीच वैचारिक चळवळ चालू असते. या वैचारिक उलाढालीत श्रवण फार महत्त्वाचे आहे. सम्यक श्रवण घडले नाही तर शिकविणाऱ्याची मेहनत वाया जाऊ शकते. परिणामकारक श्रवण कसे करावे याचे सुंदर शास्त्र समर्थांनी विकसित केले होते. सगळ्या संतांनी श्रोत्यांना वंदन केले आहे. कारण ऐकणारा फार महत्त्वाचा आहे. समर्थ म्हणतात- ‘कथा होईल तेथे जावे। दुरी दीनासारीखे बैसावे। तेथील हरद ते घ्यावे। अंतर्यामी।।’

श्रोत्याची भूमिका अत्यंत लीनतेची हवी. आणि त्याची मानसिकता ग्रहण करण्याची (क्रद्गष्द्गश्चह्लद्ब१द्बह्ल४) असावी.

श्रवण करताना कोणकोणते विक्षेप येतात त्याची यादीच समर्थ देतात. अनेक लोक जास्त जेवणं करून येतात. त्यांना ऐकताना झोप लागते. काही लोक खूप पाणी पिऊन येतात. त्यांना श्रवण करताना देहधर्म आठवतो. त्यामुळे त्यांचे लक्ष श्रवणाकडे राहत नाही. काही खट्याळ श्रोते मागे बसून कुजबूज कुजबूज करतात. त्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो. एखादा माणूस श्रवणाला उशिरा येतो. त्यामुळे नेमका काय विषय चालला आहे हेच त्याला कळेनासे होते. काही जण घरी वादंग घालून श्रवणाला येऊन बसतात. त्यांच्या डोक्यात घरातले विषय चालू असल्यामुळे ते श्रवणात मन एकाग्र करू शकत नाहीत. श्रवण ही साधना आहे. आणि ते मी माझ्या हितासाठी करतो आहे हे लक्षात घेवून समर्थांनी श्रोत्याला ‘श्रोता अवधान द्यावे। एकचित्ते।।’ ही महत्त्वाची सूचना केली आहे. श्रवण करताना मन जर एकाग्र नसेल तर पालथ्या घड्यावर पाणी टाकल्यासारखे होईल. जिथे प्रवचन चालू आहे तिथे डास चावत असतील, भवताली काही गोंगाट असेल तर सम्यक् श्रवण घडणार नाही. दुष्चित्तपणामुळे श्रवणाचा वेळ वाया जाऊ नये तसेच वक्त्याचे श्रमही फुकट जाऊ नये म्हणून समर्थ एवढी काळजी घेतात. श्रोता-वक्ता समानधमीर् असल्यास दोघांचे हेतू सफल होतात.

गोंदवलेकर महाराजांनी श्रवणाची फार गहन व्याख्या केली आहे. ते म्हणतात- ”संत सांगतात तसे वागणे म्हणजे श्रवण होय.” याचा अर्थ श्रवणाचा संबंध फक्त कानाशी नसून जीवनाशी आहे. श्रवणाने जीवन बदलले पाहिजे हीच संतांची तळमळ असते. म्हणून समर्थ म्हणतात-

ऐसे हे अवघेचे ऐकावे। परंतु सार शोधून घ्यावे।

असार ते जाणोनी त्यागावे। या नाव श्रवण भक्ती।।’

सार घेणे आणि असार टाकणे याचा अर्थच चांगल्या सवयी जीवनात लावून घेणे आणि असार टाकणे याचा अर्थ वाईट सवयी सोडून देणे.

केवळ एकदा ऐकून माणसामध्ये एवढा बदल होणार नाही. त्यासाठी वारंवार ऐकावे लागेल. समर्थ म्हणतात-

जेथें नाहीं नित्य श्रवण। तें जाणावें विलक्षण।

तेथें साधकें येक क्षण। क्रमूं नये सर्वथा।।

सेविलेंच सेवावें अन्न। घेतलेंची घ्यावे जीवन।

तैसें श्रवणमनन। केलेंची करावे।।’

ज्याप्रमाणे शरीराला अन्नाची गरज आहे, त्याप्रमाणे मनाला नवनवीन शुद्ध विचारांची गरज आहे. आचार्य विनोबा भावे रोज नवनवीन ग्रंथ वाचीत. बाबासाहेब आंबेडकरांना नवनवीन ग्रंथ वाचता यावेत यासाठी त्यांच्या वडिलांनी दागिने विकून त्या पैशात त्यांना ग्रंथ आणून दिले.

सुदैवाने विज्ञान युगात दूरदर्शन, संगणक, विविध प्रकारच्या ध्वनिफिती यामुळे श्रवणाची खूप सोय झाली आहे. माणसाने या सर्व साधनांचा मनापासून वापर करून स्वत:चे कल्याण करून घ्यावे. सतत ऐकत राहिले म्हणजे आपल्या वृत्तीत बदल व्हायला सुरुवात होते. जुन्या-वाईट सवयी टाकून देणे आणि नवीन चांगल्या सवयी धारण करणे येवढे सोपे नाही. त्यासाठी वारंवार श्रवण करावे लागते. समर्थांनी श्रवण करताना एक काळजी घ्यायला सांगितली. माणसाने श्रवण करताना बुद्धिभेद होईल किंवा श्रद्धा नाहीशी होईल, अशा प्रकारची उथळ भाषणे ऐकू नयेत. श्रवण हा अपाय ठरू नये. म्हणून जो बोलल्याप्रमाणे वागतो, अशा माणसाचा उपदेश ऐकावा.

Advertisements

~ by manatala on जुलै 27, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: