समर्थांच्या हिंदी रचना

महाराष्ट्रातील संतांनी दैवतांचा फाजील अभिमान जोपासला नाहीच, शिवाय भाषेचा फाजील अभिनिवेषही पोसला नाही. आज मराठी माणसाचा फाजील भाषा अभिनिवेेष त्याला संतांच्या शिकवणुकीचे विस्मरण झाल्याचे द्योतक आहे. भाषेच्या भिंतीमुळे आपल्या देशात राष्ट्रीय एकात्मता कधीच प्रस्थापित होऊ शकली नाही. हजारो मैलांवरील इंग्रजांची भाषा आम्ही मोठ्या हौसेने शिकतो; पण आपल्या प्रांताला जोडून असलेल्या शेजारच्या प्रांताची भाषा आपण शिकू इच्छित नाही. भारत स्वतंत्र होऊन ६० वषेर् झाली; पण अजूनही आपण राष्ट्रभाषेचे प्रेम जनतेत निर्माण करू शकलो नाही. आमची राष्ट्रभाषेवरील भक्ती फक्त हिंदी चित्रपटातील मारामारी आणि अश्लिलता जोपासण्यापुरतीच मर्यादित आहे. ‘हिंदी बोला आणि हिंदी लिहा’ अशा सूचना बँकांमध्ये फलकावर लिहिल्या जातात. विशेष म्हणजे हिंदी लिहिण्याची ही परंपरा संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत बहिणाबाई, समर्थ रामदास, नाथपरंपरेतील देवनाथ आणि दयाळनाथ या सर्वांनी अत्यंत निष्ठेने पाळलेली आहे. संत नामदेवांचे हिंदी अभंग तर शिखांनी ग्रंथसाहिबामध्ये ‘गुरुबानी’ म्हणून स्वीकारले. आज पंजाबात संत नामदेवांची अनेक मंदिरे पाहायला मिळतात. सगळ्याच संतांनी राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक समरसता निर्माण केली.

समर्थांची ‘मुसलमानी अष्टके’ आपण पाहिली. याखेरीज समर्थांच्या हिंदी रचनादेखील आहेत. कोल्हापूरचे डॉ. रा. तु. भगत यांनी समर्थांच्या हिंदी रचना संपादित केल्या असून, त्यामध्ये समर्थांच्या सुमारे २१५ हिंदी रचना उपलब्ध आहेत. समर्थांनी ‘दासकहे’, ‘रामदास कहे’, ‘दास फकीर कहे’, ‘बंदे कमीन’, ‘बंदा’, ‘बाबा गैबी’ अशा अनेक मुदा हिंदी पदांमध्ये वापरल्या आहेत. भगवंताची भक्ती, सत्संगाचे महत्त्व, सदाचरण, नामस्मरणाचा आग्रह हे सारे विषय समर्थांच्या हिंदी रचनांमध्ये येऊन गेले आहेत. लोक त्यांना समर्थ म्हणत असले तरी ते स्वत:ला ‘रामदास’ म्हणजे रामाचा दास म्हणवून घेतात. सूरदास, कबीरदास, तुलसीदास, मलुकदास या दास्यभक्तीच्या हिंदी परंपरेत समर्थ जाऊन बसतात. सगळ्याच संतांनी स्वत:कडे कायम कमीपणा घेतला आहे. आपण सामान्य आहोत, आपल्याला काहीही कळत नाही, असा विचित्र दावा सगळ्याच संतांनी केला आहे. ज्ञानी माणसे स्वत:ला अज्ञानी समजतात आणि अज्ञानी माणसे स्वत:ला परमज्ञानी समजतात या विसंगतीने हे जग भरले आहे. आपल्या हिंदी पदात समर्थ म्हणतात-

ज्ञान न जानुं, ध्यान न जानुं। अंतर भाव न हो।।

दान न दिया, धर्म न किया। मुक्तिकु जानत् हो।।

रामदास कहे मै तो ऐसा। फुकट खावन हो।।

समर्थांना कबीर आणि तुलसीदास या दोघांप्रमाणे सर्वत्र राम दिसू लागला. ‘सीताराममय सब जग जानी’ ही तुलसीदासांची दशा समर्थांना प्राप्त झाली तेव्हा ते लिहितात-

जित देखो उत रामहि रामा। जित देखो उत पूरणकामा।।

तृण तरूवर सातो सागर। जित देखो उत मोहन नागर।।

जल थल काष्ठ पाखाण आकाशा। चंद सूरज नच तेज प्रकाशा।।

मोरे मन मानस राम भजो रे। रामदास प्रभु ऐसो कियो रे।।

एका हिंदी कवितेत समर्थांनी फार परखड विचार मांडला आहे. ते म्हणतात की, माणसे तीर्थक्षेत्री वणवण हिंडतात, नाना पवित्र नद्यांत स्नान करतात, पण भगवंताचे यथार्थ स्वरूप समजून घेत नाहीत. भक्तीच्या नावाखाली आंधळ्या कोशिंबीरीचा खेळ चालू असतो; तर काही ठिकाणी साधू लोक बगळ्यासारखे ध्यान लावून बसतात. समर्थांनी हिंदी रचनेतदेखील कृष्णाबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. एका पदात ते म्हणतात-

बन्सी बजावे सरस रस गावे। चपल मनकी रहे गत हो।।

रैन दिन नैननभो आनन। श्यामसुंदरकी मूरत हो।।

बहुरंग नाटक रंग जगावे। दास सज्जन जन रत हो।।

माई मोरे नयन श्यामसुंदर’ हे समर्थांचे हिंदी पद वाचताना ‘बसो मेरे नैननमें नंदलाल’ या मीराबाईंच्या पदाची आठवण होते. मात्र कृष्णभक्त असलेली मीरा समर्थांप्रमाणे ‘मैंने रामरतन धन पायो’ असे म्हणते.

समर्थांच्या उत्तर भारतातील हिंदी प्रवचनांना अनेक मुसलमान श्ाोते येत असावेत. म्हणून समर्थांनी काही पदांमध्ये हिंदू आणि मुसलमान यांच्या ऐक्याचा विचार मांडला. राम जसा सर्वत्र व्यापून आहे, तसेच अल्लाशिवाय या जगात काहीही नाही, असे समर्थ म्हणतात. संत एकनाथ व संत नामदेव यांच्या हिंदी पदांतही सर्वधर्मसमन्वय आढळतो. ‘बुडाला औरंग्या पापी’ असे समर्थ म्हणतात ते इस्लाम धर्माच्या विरोधात नसून, त्यात औरंगजेबाच्या धर्मवेडाचा धिक्कार आहे. त्याच्या आसूरी प्रवृत्तीची चीड आहे.

Advertisements

~ by manatala on जुलै 27, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: