समर्थांचा आत्माराम

मनाचे श्लोक, आत्माराम आणि दासबोध ही समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी समजली जाते. समर्थांनी मनाचे श्लोक चाफळला लिहिले, तर दासबोध शिवथरघळीत लिहिला. आत्माराम हा ग्रंथ मात्र त्यांनी नाशिक येथे तप:श्चयेर्च्या काळात लिहिला. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे हा ग्रंथ गुरू-शिष्य संवादात्मक असला तरी ग्रंथाची सुरुवात शिष्याच्या प्रश्नाने झालेली नाही. समर्थांच्या मनात शिष्याबद्दल करुणा निर्माण झाली आणि समर्थ बोलू लागले. आत्माराम या ग्रंथाचे पाच समास असून, ओवीसंख्या १८३ आहे. याचा अर्थ हे प्रकरण अत्यंत छोटे आहे.

प्रारंभी समर्थांनी श्ावणाचे महात्म्य सांगितले. श्ावण कसे करावे हे सांगताना समर्थ चातक पक्षाचा दृष्टान्त देतात. चातक पक्षी ढगातून पडलेले शुद्ध पाणी पितो. जमिनीवरील अथवा नाल्यातील पाणी पीत नाही. त्याप्रमाणे साधकाने शुद्ध चरित्र, संतांच्या मुखातून उपदेश ग्रहण करावा. जे लोक स्वत: मायेत अडकलेले आहेत, त्यांचा कितीही व्यासंग असला आणि भाषाप्रभुत्व असले, तरी अशा श्ावणाने साधकाचे जीवन बदलणार नाही. साधकाला माहिती मिळेल, पण समाधान मिळणार नाही. मायेचा त्याग ही तर साधनेची खरी कसोटी आहे.

समर्थांनी आत्माराम या ग्रंथात मायेचे यथार्थ वर्णन केले आहे. त्यांच्या मते माणसाने आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घ्यावा. त्यासाठी मायेचा त्याग करावा लागेल. माणसाचे मन हीच माया आहे. मनामध्ये सतत विचार येत राहतात. हा विचारांचा पडदा म्हणजेच माया होय. मात्र साधकाला एकदम निविर्चार होणे शक्य नाही. हे समर्थांनादेखील ठाऊक आहे. म्हणून आत्माराम या ग्रंथात त्यांनी मायेचे दोन भाग पाडले. मन जेव्हा इंदियांच्या पातळीवर विषयसुखाचा विचार करते, तेव्हा ती माया माणसाच्या बंधनास अथवा पुनर्जन्मास कारणीभूत ठरते. याउलट मनातील विचार भगवंतासंबंधीचे, परमात्म्यासंबंधीचे असतील तर हळूहळू हेच मन साधकाला निविर्चार करेल. ईश्वरासंबंधीचे विचार जरी मायेचे स्वरूप असले तरी ही माया साधकाला बंधनातून मुक्त करण्यास उपयोगी ठरू शकते. त्यासाठी साधकाने एकांतात राहून वृत्तीशून्य होण्याचा सतत अभ्यास केला पाहिजे. या ठिकाणी समर्थांनी सारीपाटाच्या खेळाचा सुंदर दृष्टान्त दिला आहे. या खेळात आपण सोंगट्या मागून घेतो आणि खेळतो. खेळताना पडलेल्या दानावरून अनेकदा भांडणे होतात. दोन्ही भिडू हमरीतुमरीवर येतात. समर्थांच्या मते खेळातलाच हा अहंकार माणसे जीवनामध्ये आणतात. आपले सारे नातेवाईक आणि मित्रमंडळी हे आपण वाटून घेतलेल्या सोंगट्यांप्रमाणे आहेत. अहंकार आणि वासना यामुळे माणूस या सगळ्यांना माझे माझे म्हणतो. शेवटी ज्यांच्याकडून आपण सुखाची अपेक्षा करतो, तेदेखील आपणाकडून सुखाची अपेक्षा करीत असतात. अपेक्षांची टक्कर सुरू झाली म्हणजे प्रेमाला स्पधेर्चे स्वरूप येते आणि मनुष्य अधिकाधिक मायेत गुरफटत जातो. जीवन संगीत न होता सावळागोंधळ होऊन जाते.

चौथ्या समासात समर्थांनी साधकाला मायेतून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला. हा मार्ग सांगताना समर्थ पुन्हा श्ावणभक्तीकडे वळतात. अनेकांची अशी समजूत आहे की, आत्माराम हा वेदांतपर ग्रंथ आहे; पण समर्थांच्या मते भगवंताची भक्ती केली म्हणजे वेदांतातील तत्त्वज्ञान जीवनात उतरते. माणसाला परब्रह्मााचा प्रत्यक्ष अनुभव येतो. मात्र त्यासाठी सत्पुरुषांच्या सहवासात राहून वारंवार श्ावण करावे लागते आणि संतांनी सांगितले त्यानुसार आपल्या जीवनाला आकार द्यावा लागतो. याचा अर्थ, समर्थांच्या मते भक्तीशिवाय ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. येथे समर्थांनी दास्य आणि आत्मनिवेदन हे दोन भक्तीप्रकार निवेदन केले. नुसते श्ावण पुरेसे नाही. ज्याच्याकडून ज्ञान हवे आहे, त्याची सेवा घडायला हवी आणि त्याच्याशी मनाने एकरूप व्हायला हवे. आज शिक्षणसंस्थेतील ज्ञानदान हा पैसे आणि माहिती यांचा विनिमय झाला आहे. त्यात सेवा आणि समर्पण कोठेच नाही.

शेवटच्या समासात शिष्य प्रसन्न होऊन आपल्याला आत्मज्ञान झाले आहे असे आनंदाने सांगतो, तेव्हा समर्थ म्हणतात की, ज्याप्रमाणे गाढ झोपलेला मनुष्य ‘मी गाढ झोपलो आहे’ हे सांगायला शिल्लक उरत नाही, त्याप्रमाणे तूदेखील मला ज्ञान झाले, असे सांगायला उरू नकोस.

Advertisements

~ by manatala on जुलै 27, 2007.

One Response to “समर्थांचा आत्माराम”

  1. As per above description,we have to come to conclusion that Shravan bhakti is greatest in our life.It help us to reach to god.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: