मुसलमानी अष्टक

महाराष्ट्रातील संत मालिकेत संत नामदेव आणि समर्थ रामदास यांनी मराठीबरोबरच हिंदी रचनादेखील केल्या. संत नामदेव यांच्या ६२ हिंदी रचना शिखांच्या ग्रंथसाहेबामध्ये समाविष्ट केल्या गेल्या. समर्थ रामदासांच्यादेखील हिंदी रचना पुष्कळ आहेत. त्यांच्या हिंदी रचनेत ‘मुसलमानी अष्टके’ ही रचना मनाच्या श्लोकासारखीच आहे. धर्माच्या बाबतीत सगळ्याच संतांचा दृष्टिकोन व्यापक होता.

समर्थांच्या दृष्टिकोनातूनदेखील अल्ला आणि राम यामध्ये काहीएक भेद नाही. अल्लाला समजून घेणे म्हणजे स्वत:ला समजून घेणे होय, असे समर्थ म्हणतात. येशू ख्रिस्तानेदेखील आपल्या शिष्यांना ्यठ्ठश्ा२ ह्लद्ध४ह्यद्गद्यद्घ हाच संदेश दिला. भगवंताचा शोध घेऊ जाता आपणच भगवद्स्वरूप आहोत याचा प्रत्यय भक्ताला येतो. उर्दूमध्ये अल्लासाठी खुदा हा शब्द वापरला जातो. खुद् म्हणजे आपण स्वत:. त्या दृष्टीने खुदा हा शब्दसुद्धा बोलका आहे.

समर्थांच्या सर्वच रचना संवादात्मक आहेत. समर्थ काव्याद्वारे आपल्याशी संभाषणच करीत असतात. संपूर्ण दासबोध बोली भाषेत आहे; तर मनाचे श्लोक हा आत्मसंवाद आहे. मुसलमानी अष्टकातदेखील समर्थ संवादच साधतात. त्यासाठी श्ाोत्यांना ते भाई म्हणून संबोधतात. प्रत्येक श्लोकाच्या शेवटी ‘कहे रामदासो’ अशी आपली नाममुदा समर्थ वापरतात. मुसलमानी अष्टकांची रचनादेखील मनाच्या श्लोकाप्रमाणे भुजंगप्रयात वृत्तात आहे. इस्लाम धर्मातील सुफी फकीर हे हिंदू धर्मातील वेदांत तत्त्वज्ञानाप्रमाणेच अद्वैताचे प्रतिपादन करतात. मुसलमानी अष्टकांचे वैशिष्ट्य असे की, समर्थांनी आपल्या ग्रंथात परब्रह्मााचे अथवा रामचंदाचे वर्णन करण्यासाठी जी विशेषणे वापरली, ती सारी विशेषणे अल्लासाठी वापरली आहेत. मात्र श्ाीराम, गणेश, शारदा, परमेश्वर असे शब्द न वापरता खुदा, इलाही, पैगंबर, पीर, अल्ला अशा शब्दांचा वापर समर्थ मनमोकळेपणे करतात.

अल्ला हे सर्वश्ाेष्ठ तत्त्व असून, ते अलख निरंजन म्हणजे डोळ्यांनी पाहता येण्यासारखे नाही. ज्ञानचक्षूनेच अल्लाला जाणता येते. माझ्या पीरानेच अल्ला हे तत्त्व मला समजावून सांगितले. अल्लाचा शोध घेण्यासाठी माणसाला आत उतरावे लागेल. त्यासाठी त्याला चमत्कार, बुवाबाजी, दुर्वर्तन या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागेल. समर्थ म्हणतात-

आबे छोड दे वो करामत भुतों की। बुरी छोड देना राह देवतों की।।

अल्ला ही संकल्पना धर्म, जात, गोत्र या सगळ्यांच्या पलीकडे आहे, असा तर्कशुद्ध विचार समर्थ मांडतात. त्याला कोणताही रंग नाही. ब्राह्माण मोठा की मुसलमान मोठा असा वाद घालण्यापेक्षा अल्लाला जाणून घेणे जास्त चांगले, असे त्यांचे मत होते. समर्थ म्हणतात-

अल्लख वो निरंजन कैसा यह रे आलखवो।

किसेहि सारिखा नाहीं क्या कहुरे।।

नहि रंग ना रूप रेखा कछुही।

मुँह से हि कहेसा नूहि वोईलाहि।।

धर्माधर्मातील संघर्ष समर्थांना अजिबात मान्य नव्हते. या ठिकाणी अध्यात्मातील अत्युच्च शिखर गाठताना समर्थ म्हणतात-

नही वो मुसलमान हिंदू कछुहि । सयथ्बी नहीं क्या कहूँ मैं ई सेही ।।

सभी ज्यातसे वो है रे नियारा। कहे रामदासो चला वेहि सारा।।

याचा अर्थ खरा परमेश्वर हिंदूही नसतो अथवा मुसलमानही नसतो. ईश्वराला जाती आणि धर्म यांच्या चौकटीत अडकविणे बरोबर नाही. स्वामी विवेकानंद एका पत्रात लिहितात- ‘आपण आता हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध हे शब्द वापरायचे थांबवले पाहिजे; कारण या शब्दांची उपयोगिता आता संपली आहे. केवळ धर्म हा शब्द पुरेसा आहे.’ अगदी हाच विचार समर्थ मुसलमानी अष्टकात मांडतात. स्वधर्माची व्याख्या सांगताना श्ाीमद् दासबोधात ते म्हणतात- सकळ धर्मांमध्ये धर्म। स्वरूपि रहाणे हा स्वधर्म।

हे चि जाणावे मुख्य वर्म। साधु लक्षणाचे।।

एका गीतात साहिर म्हणतो-

मालीकने हर इन्सानको इन्सान बनाया। हमनें उसे हिंदू या मुसलमान बनाया।

कुदरतने तो बक्षी थी हमें एकही धरती। हमनें कहीं भारत इरान बनाया।।

भक्त हा भक्त असतो. जाती, पंथ संप्रदाय, धर्म या सर्व गोष्टी माणसाने निर्माण केल्या आहेत. मानवाच्या विकासासाठी त्या उपयोगी ठरतात तोपर्यंत त्याला महत्त्व आहे. धर्म हा द्वेषाचा अथवा संघर्षाचा विषयच असू शकत नाही. मुसलमानी अष्टकात तर धर्माच्या नावाखाली संघर्ष करणाऱ्यांना समर्थ बजावतात की मस्जिद तोडल्याने अल्ला तुटत नाही किंवा मंदिर फोडल्याने राम मरत नाही. जे मंदिर आणि मस्जिद तोडतात, ते नष्ट होऊन जातात. मुसलमानी अष्टकात समर्थांच्या तर्कबुद्धीने विचारांचे एव्हरेस्ट शिखर गाठले आहे.

Advertisements

~ by manatala on जुलै 27, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: