धर्मवीर संभाजीला उपदेश

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू ३ एप्रिल १६८० या दिवशी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर रायगडावर कारभार कोणी सांभाळावा या मुद्यावरून संघर्ष सुरू झाला. याचा फायदा घेण्यासाठी स्वत: औरंगजेब सात लाख फौज घेऊन महाराष्ट्रावर चालून आला. या सर्व घटनांमुळे समर्थांचे अंत:करण अत्यंत व्यथित झाले. देह ठेवण्यापूवीर् त्यांनी संभाजी महाराजांना उपदेश करणारे अत्यंत भावपूर्ण पत्र लिहिले. या पत्रावरून समर्थ जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विश्वाची चिंता कशी करीत होते ते दिसून येते.

संभाजी महाराजांना रामदास स्वामी लिहितात-

अखंड सावधान असावें। दुश्चित कदापि नसावें।

तजविजा करीत बैसावें। एकांत स्थळी।।

मागील अपराध क्षमावे। कारबारी हातीं धरावे।

सुखी करून सोडावे । कामाकडे।।

श्रेष्ठीं जे जे मेळविले। त्यासाठी भांडत बैसले।

मग जाणावें फावलें। गलिमांसी।।

बहुत लोक मिळवावे। एक विचारे भरावे।

कष्ट करोन घसरावें। म्लेंच्छांवरी।।

आहे तितुके जतन करावें। पुढें आणिक मिळवावें।

महाराष्ट्र राज्य करावें। जिकडे तिकडे।।

शिवराजास आठवावें। जीवित्व तृणवत् मानावें।

इहपरलोकी रहावें। कीतीर्रूपे।।

शिवराजाचे आठवावे रूप। शिवराजाचा आठवावा प्रताप।

शिवराजाचा आठवावा साक्षेप । भूमंडळी।।

आपला समाज संघटित होऊ शकत नाही, हे लक्षात घेऊन परकीय शक्तींनी त्याचा वेळोवेळी फायदा घेतला आहे. संघटना उभी करण्यासाठी आपल्याच लोकांचे काही अपराध पोटात घालावे लागतात. राजाने अखंड सावधान असावे लागते. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ह दोघेही सारखेच पराक्रमी होते; परंतु जी सावधानता शिवाजी महाराजांकडे होती, ती संभाजी महाराजांजवळ नव्हती. शिवाजी महाराज औरंगजेबाच्या आग्रा येथील तुरुंगातून सहीसलामत निसटले आणि संभाजी मात्र खुद्य महाराष्ट्रात औरंगजेबाच्या तडाख्यात सापडला. याचे कारण कुठे तरी गाफिलपणा नडला. वस्तुत: संभाजी महाराज इतके पराक्रमी होते की सात वषेर् औरंगजेबच्या प्रचंड फौजेशी ते आत्मविश्वासाने लढत होते, पण स्वराज्यातील दुफळी, आमची आपआपसातली भांडणे आणि सावधानतेचा अभाव यामुळे संभाजी महाराज पकडले गेले आणि मारले गेले. एका विचाराने भरलेली व भारलेली माणसे राष्ट्रासाठी सर्वस्वाचा होम करतात. म्हणून समर्थांनी त्यांना माणसे संघटित करायला सांगितली. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत- ”राष्ट्र म्हणजे केवळ विशिष्ट चौरस मैल भूप्रदेश नव्हे, एका ध्येयाने प्रेरित झालेल्या निष्ठावान लोकांचा समुदाय म्हणजे राष्ट्र.”

छत्रसाल बुंदेला जेव्हा उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आला, तेव्हा शिवछत्रपतींनी त्याला प्रेरणा दिली व बुंदेलखंडात हिंदवी स्वराज्याची निमिर्ती करण्यास सांगितली. छत्रपतींपासून प्रेरणा घेऊन छत्रसालने बुंदेलखंड स्वतंत्र केला. संभाजी तर छत्रपतींचा पराक्रमी पुत्र होता. त्याने शिवाजी महाराजांचे स्वराज्य सांभाळावे. उलट स्वातंत्र्याची ही चळवळ महाराष्ट्राबाहेर पोहचवावी अशी अपेक्षा समर्थ व्यक्त करतात.

पत्राच्या शेवटी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण ठेवणे, त्यांच्या चरित्राचे चिंतन करणे हा महत्त्वाचा संदेश समर्थ रामदास देतात. वस्तुत: औरंगजेब सात लाख फौजेसह पंचवीस वषेर् महाराष्ट्रात लढत होता; परंतु त्याला यश मिळाले नाही. याचे कारण मराठा सरदारांच्या रक्तात शिवचरित्र भिनलेले होते. संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मराठा सरदारांना नवीन दृष्टी प्राप्त झाली. कसे जगावे हे आम्हाला शिवाजी महाराजांनी शिकवले व कसे मरावे हे संभाजी महाराजांनी शिकवले.

आजसुद्धा आपण जर शिवचरित्राचे स्मरण ठेवले, शिवाजी महाराजांच्या धेयधोरणांचा अभ्यास केला, तर आपल्या राष्ट्रपतींना अपेक्षित असलेला भारत निर्माण होऊ शकेल. त्यासाठी शिवाजी महाराजांचे आथिर्क धोरण, शेतीविषयक धोरण, गनिमी कावा, लष्कर भरती, युद्धनीती, त्यांनी केेलेली राष्ट्रीय चारित्र्याची निमिर्ती या सर्व गोष्टी आज आवश्यक आहेत. लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर, वासुदेव बळवंत, सुभाषचंद बोस, योगी अरविंद या सर्व देशभक्तांना स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून मिळाली.

Advertisements

~ by manatala on जुलै 27, 2007.

One Response to “धर्मवीर संभाजीला उपदेश”

  1. apanahi shivaji maharajan sarkhe kahitari kele pahij. mala garv ahe mi marathi ahe. malahi watat apan deshasathi kahitari kel pahij.ani te mi ani apan karuyat. JAI BHAVANI JAI SHIVAJI.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: