अवतार

पंचमावतार-योगिजनवल्लभ श्रीदत्तात्रेय
अत्रि ऋशींच्या आश्रमात प्रभुंचा अवतार झाल्यानंतर दत्तप्रभुंना पहाण्यासाठी तेथे देव, ऋशी, गंधर्व, चारण सारे जण जमले. त्य़ा सर्व जणांचा भाव पाहुन, बालरुपातील भगवानांनी त्रिमुर्ती रुप घेतले व उपस्थितांना योगोपदेश केला. त्यानंतर ते सर्वजणांच्या ह्र्दयात ज्योतिःरुपाने प्रकट होऊन म्हणाले, की मी सर्वव्यापी आहे म्हणुन जिथे आपण जाल तिथे मी सोबतच आहे.
योगीजनांना तुश्टवणारा हा अवतार पंचमावतार होय…
मार्गशीर्श शुक्ल पोर्णिमा वार गुरुवार हा या अवतारचा प्रकट दिन होय.
भगवान दत्तात्रेयांनी योग दिक्शा दिलेल्या साधकांना गुरुवारी उपदेश केला म्हणुन तो दत्तोपासनेत मह्त्वाचा मानला जातो.
 

सहावा अवतार – लीलाविश्वंभर श्री दत्तात्रेय
एकदा देशात खुप मोठा दुश्काळ पडला… लोक अन्नपाण्यावाचुन तडफ़डुन मरु लागले.
हे पाहुन ऋशीमुनी, सत्शील ब्राम्हण आणि भक्तजन भगवान दत्तत्रेयांना शरण गेले. भगवानांची स्तुती केली. त्या पुण्याने त्यांचे दुरित नाश पावले.. या मुळे सर्व भक्तांनी प्रार्थना केली , ” हे दयाघन प्रभो , आम्हाला आपणासोबत अखंड राहु द्या. सेवा करु द्या “.
आसक्ति व उपाधी हे योगाभ्यासातील विघ्न आहे, त्यामुळे ते टाळण्यासाठी दत्तप्रभुंनी जवळ्च्या सरोवरात उडी मारली. काही जण कंटाळुन निघुन गेले. तर काही जण वाट पहात बसले. त्यांची परीक्शा घ्यावी म्हणुन प्रभु पाण्यातुन वर आले. आपल्या योगमायेला मांडीवर घेवुन ते क्रीडा करु लागले. हे पाहुन काहि जण त्यांना भ्रश्ट म्हणुन तिथुन निघुन गेली.. परंतु आपली निश्ठा अभंग ठेवुन काहि जण तिथेच बसुन राहीले. त्यांचेवर भगवानांनी अनुग्रह केला.
हा अवतार पौश पोर्णिमा , पुश्य नक्शत्र , बुधवार, सुर्योदयाचे वेळि झाला. य़ा अवतारात भक्तजनांच्या परीक्शेसाठी व कल्याणासाठी लीला केल्यामुळे याला लीलाविश्वंभर दत्तात्रेय असे म्हणतात. 

सातवा अवतार-सिद्धराज
भगवान दत्तात्रेय एकदा फ़िरत फ़िरत बद्रिकावनात आले. तेथे अनेक सिद्ध तपाच्या बळावर सिद्धींचा वापर करत होते. त्यात अनेक जण विशयांच्या आहारी गेले होते. कॊणी नास्तिकांचा पक्श घेउन तर कोणी आस्तिकांचा पक्श घेउन वाद घालण्यात मग्न होते. यांना बोध करावा म्हणुन दत्तप्रभु बालरुप घेउन त्यांच्या गर्दीत एकटेच मागे जाउन बसले. या तेजःपुंज बालकाकडे सारे जण आकर्शित झाले. ते त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारु लागले.
प्र- बाळ तुझा आश्रय कोण?
उ- माझा कोणि आश्रय नाही..मी निरंजनरुप आहे.

प्र-तुझा मार्ग कोणता?
उ- ज्या मार्गाने शिवतत्वाचा बोध होतो तो माझा मार्ग होय. त्या मार्गाशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही तोच माझा मार्ग होय.

याप्रमाणे सिद्ध आणि भगवान आदिदत्तात्रेयांचा संवाद चाललेला असताना , आकाश मार्गाने जाणारे अनेक देव ते चिन्मय रुप पाहुन खाली आले.त्यांची गति कुंठित झाली.. यावर सर्व सिद्ध वाद घालु लागले की ते त्यांच्या तपाच्या प्रभावामुळे झाले आहे. त्यावर दत्तप्रभु म्हणाले , या देवांना जो कोणी पुन्हा तपःप्रभावाने आकाशस्थ करेल तो श्रेश्ठ… परंतु कोणी सिद्ध ते करु शकले नाहीत.
सर्व सिद्ध यामुळे लज्जित झाले. त्यांचा अहंकार पार गळाला. आता ते अनुग्रहाला पात्र झाले हे पाहुन दत्तप्रभुंनी त्यांना योगोपदेश केला.या अवताराला म्हणुन सिद्धराज म्हणतात…अवतार दिन माघ शुद्ध पोर्णिमा वार गुरुवार…
 

आठवा अवतार- Dhnyaan raaj …
हे सर्व जग कामाच्या आधीन आहे. काम म्हणजे इच्छा.. मनात इच्छेचा अंकुर निर्माण झाला की एकातुन दुसरी , त्यातुन तिसरी, अशी इच्छांची मालिकाच तयार होते.. त्रिविध तापांचे मुळ या मालिकेत दडले आहे. म्हणुन सिद्धराज दत्तत्रेयांनी विचार केला की या सर्व अनुग्रह झालेल्या जीवांना मला कामनेच्या जाळ्यातुन मुक्त केले पाहिजे. यथार्थ स्वरुपाच्या आकलनाने हे कामनेतुन मुक्त होतील. म्हणुन ते बालरुपाचा त्याग करुन पुन्हा कौमार रुपात प्रकट झाले. या अवताराला Dhnyaan raaj हे नाव देण्यात आले.
बद्रिकाश्रमात ते एका तेजोवलयात डोक्याइतक्या उंचीवर प्रकट झाले. सिद्धांना त्यांचे हे नवीन रुप कळाले नाही. सर्व सिद्धांनी पुर्ण शक्ति एकवटून त्यांचेवर आघात करण्याचा प्रयत्न केला. पण ते काहीच करु शकले नाहीत. सर्व सिद्धांची खात्री झाली के हे पुर्वीचेच परमात्मरुप अवतरित झाले आहे. ते त्यांना शरण जाउन त्यांचि स्तुती करु लागले.
“हे देव सर्व देवेश, दीनानाथ जगत्पते
त्वत्प्रसादाद्वयं सर्वे तव शक्तिमुपागताः
या अवतारात दत्तप्रभुंनी सर्वांचॆ अंतःमालिन्य नाहिसे केले म्हणुन या अवताराला, Dhnyaan raaj म्हणतात.
अवतार दिवस फ़ाल्गुन शु. दशमी , सुर्योदय मुहुर्त, पुनर्वसु नक्शत्र..  

नववा अवतार-विश्वंभरावधुत श्री दत्तात्रेय
आठव्या अवतारात सिद्धांना उपदेश करणारे परमकारुणिक दत्तप्रभुंनी भक्त जनांना भेट देण्याचे ठरविले. श्रीगुरु फ़क्त भक्तांना उपदेश करुनच थांबत नाहीत तर त्यांना वारंवार भेटी देऊन त्यांचे वर क्रुपा करतात आणि साधन-अभ्यासातील प्रगती पण पहात व त्यातील विक्शेप दुर करत असतात.
या अवतारात प्रभूंनी नेहेमीचे मनोहर रुप न घेता एक विचित्र वेश धारण केला. भिल्लासारखी अंगकांती, राकट चेहेरा, भुरके केस, आणि मळके वस्त्र कमरेला गुंडाळुन त्यांनी बद्रिकाश्रमात प्रवेश केला. गळ्यात काळा दोरा, हातात वाकडी-तिकडी काठी, सोबत काळा कुत्रा..अश्या वेशात ते शिश्यांचे समॊर प्रकट झाले.निर्मळ ब्रम्ह पण भक्तांची परिक्शा पहावी म्हणून मळकट रुप घेतले.
या सर्व भक्तांना सांगितलेले गुरुमंत्रानुश्ठान ते करतात की नाही हे पहावयाचे होते. गुरुमंत्रानुश्ठानामुळे चित्तशुद्धि होते. इंद्रिये अंतर्मुख होतात. मन स्वरुपानुसंधानात स्थिर होते. हे सर्व श्री गुरुंना पहावयाचे होते. म्हणुन त्यांनी बद्रिकाश्रमात प्रवेश केला.
मंत्रानुश्ठान सोडुन, काही सिद्ध, चंचल चित्ताने थट्टामस्करी करत होते. तर काही जण, एकमेकांवर संतापलेले होते. काही जण दुःखी कश्टी,त्रस्त होते. काही जण स्वरुपात मनॊलय करुन बसले होते.हे सारे पाहुन दत्तप्रभूंचे मन कळवळले. त्यांनी सर्वांचे लक्श आपल्याकडे वेधुन घेतले. तेव्हा सर्व सिद्ध महात्मे पुन्हा दत्तप्रभुंचे रुप पहात बसले. ते निश्चल मनाने प्रभुंच्या या अवधुत रुपाकडे ऒढले गेले. दत्तप्रभु ऊठले की त्यांनीपण ऊठावे, ते बसले की यांनी पण बसावे.. क्शणभर सर्व सिद्धांना वाटले की हा कॊण आपले मन वेधुन घेत आहे?? असा विपरित विचार करुन त्यांनी अवधुत रुपी दत्तांचा छळवाद मांडला. त्यांना मागील अवताराचे वेळी विचारलेले प्रश्न विचारले..त्या सर्व प्रश्नांची उत्तरे ऐकुन, सिद्ध चकीत झाले. व त्यांना शरण गेले…नाथ भागवतातील एक ओवी या अवताराचे वर्णन ऐकताना आठवते. दत्तप्रभुंच्या जनार्दन या नांवाचा अर्थ ही ऒवी प्रकट करते…
लिंगदेहाचे मर्दन
तेचि जनांचे अर्दन
यालागी नाम जनार्दन
प्रकट प्रसिद्धी…
दत्तप्रभूंनी या अवतारात सिद्धजनांच्या मनोमालिन्याचे ,म्हणजे लिंगदेहाचे, अर्दन केले. त्या जनार्दनरुपी दत्तप्रभूंचे आपल्यावर अखंड प्रेमछत्र असो…हा अवतार, चैत्र शुक्ल पॊर्णिमा , चित्रा नक्शत्रावर, वार मंगळवार दिवशी झाला.
दहावा अवतार- मायामुक्तावधूत

एकदा शील नांवाच्या सदाचारसंपन्न ब्राम्हणाच्या इथे श्राद्धकर्म चालले होते.अचानक भगवान दत्तात्रेय तेथे भिक्शुरुपाने प्रकट झाले. अजानुबाहु, करी भिक्शापात्र, दैदिप्यमान सुवर्णकांती,कटीवर कौपिन, समोर छाटी, कंठी रुद्राक्शाची माळ असे मनोहर रुप माध्यान्ही दत्त म्हणुन उभे राहीले. भस्मविलेपित हे सुन्दर ध्यान आणि पाठीमागुन येणारा काळा कुत्रा, अश्या वेशात दत्तावधुत ब्राम्हणाघरी प्रकट झाले.त्यांना पाहुन सर्व ब्राम्हण संतापले आणि विचारु लागले–तू कोण आहेस? यावर श्री दत्तात्रेय म्हणाले, मी अप्रतीत, अस्वरुप असा अनंत नामांनी , अनंत रुपांनी नटलेला विश्वव्यापी अवधुत आहे. हे उत्तर ऐकुन त्या शील ब्राम्हणाला खात्री झाली की बद्रिकाश्रमात सिद्धांना उपदेश करणारे हेच भगवान सिद्धराज दत्तात्रेय.शील ब्राम्हणाने, दत्तप्रभूंची शोडशोपचारे पुजा केली. श्राद्धकर्म करावयास आलेले ब्राम्हण हे पाहुन खवळले आणि “अब्रम्हण्यम..अब्रम्हण्यम” असे म्हणत अवधुतांशी उद्धटपणा करु लागले. तेव्हा भगवान दत्तात्रेयांनी त्या ब्राम्हणांना प्रश्न केला, ब्रम्ह म्हणजे काय? कर्म म्हणजे काय?ते मला सांगा..मी एका आत्मरुपाशिवाय कशालाही ऒळखत नाही…
तेव्हा ब्राम्हण म्हणाले “ऒम हे एकाक्शर ब्रम्ह आहे. संध्या, वैश्वदेव, श्राद्धादि ही कर्मे आहेत. वेदांचे श्रवण करण्याचा अधिकार मात्र तुला नाही आणि आम्ही ते तुला सांगणार नाही..
त्यावर भिक्शुवेशधारी भगवान त्यांना म्हणाले, वेदांनी सांगितलेले कर्म त्रिगुणात्मक आहे. मी त्या त्रिगुणांना स्पर्शही करत नाही..ही त्रिगुणात्मक स्रुश्टिच माझ्या मागे श्वानाच्या रुपाने आली आहे. मायेने बनली आहे म्हणुन ते श्वान काळे दिसते. हा कुत्राच तुम्हाला चारी वेद म्हणुन दाखवेल. एका पट्टीच्या वैदिकाप्रमाणे तो कुत्रा चारी वेदांचा घोश करु लागला. या प्रसंगी शील ब्राम्हणाचे सर्व पितर पित्रुलोकातुन खाली आले व दत्तस्वरुपात विलीन झाले. दत्तत्रेयांच्या या अद्भुत शक्तिने ब्राम्हणांच्या गर्वाचा परिहार झाला. व ते देवाला शरण आले.
देवदेव जगन्नाथ, सर्वध्न्य परमेश्वर
देहि देहि तदस्माकं, ध्न्यानं दुःखविनाशकं..
अस्माकं भवकीटानां, कोन्यस्त्राता विना त्वया
त्रायस्य नः पुनः पाहि महात्मन पुरुशेश्वर
हा अवतार वैशाख शुद्ध चतुर्दशी, बुधवार, स्वाती नक्शत्र, माध्यान्ह काळी प्रकट झाला.

अकरावा अवतार–मायायुक्तावधुत
अकरावा अवतार–मायायुक्तावधुत
भगवान दत्तात्रेय सर्व संसारधर्मांनी रहित, त्रिगुणरहित असुन अत्यंत सुंदर दिसत होते. ते ध्यानामध्ये लीन असताना आपल्या योगमायेने वामांकावर सुंदर, तरुण आणि देखणी अशी एक स्त्री धारण केली होती.
विशयवासनेने मोहित झालेल्या कांही भक्तांनी त्यांच्या समोर सांसारिक मागण्यांची रांगच लावली. कूणाला, पुत्र हवा होता तर कुणाला धन,कुणी किर्ती तर कुणी आरोग्य.. परमार्थाकडे कुणाचेच लक्श नाही हे दत्तप्रभूंना दिसुन आले.
आपला ध्यानयोग काहीवेळ बाजुला ठेवुन दत्तप्रभू आपल्या वामंकावर बसलेल्या योगमायेसह न्रुत्य करु लागले. त्यानंतर आपल्या समॊर त्यांनी मद्य मांसादि अभक्श्य पदार्थ निर्माण केले… तरीही ते लोक दत्तप्रभूंचा पिच्छा सोडेनात. तेव्हा प्रभु म्हणाले, मी अभक्श्य भक्श्ण करणारा, भ्रश्ट आपली इच्छा पूर्ण कशी करणार?? स्त्री असो वा पुरुश असो, विशयासक्ति दःखच देते..मग मी विशयासक्त , तुमची ईच्छा कशी पुरवणार?? दत्तात्रेयांचे हे भाशण ऐकुन विशयासक्त लोक त्यांना सोडुन गेले… दत्तात्रेय मनाशी म्हणाले,”बरे झाले, या स्त्रीने, व मद्य मांसादिने मला या दुर्जनांपासुन सॊडवले. दुर्जन स्वतःही सुधारत नाहीत व इतरांना पण बिघडवतात. शहाण्या माणसाने दुर्जनांच्या संगती पासुन दुर रहावे”. द्रुढ निश्ठेने जवळ राहिलेल्या काही भक्तांना दत्तप्रभूंनी हे विचार बोलुन दाखवले.
मानवाला सर्व दःखातुन मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे विशयांचा त्याग केला पाहिजे. त्यासाठी सद्ग्रंथ वाचावे, साधुसहवासामुळे त्यांचा गुढार्थ कळतो… त्यानंतर चिंतन करावे. असा कळकळीचा उपदेश करुन दत्तप्रभूंनी उरलेल्या मुमुक्शूंना ध्यानमार्गास लावले. या मायावधुत रुपाने ते सगळीकडे संचार करु लागले. त्यांचा संचार नर्मदेच्या दक्शिण तटापासुन माहुरगडापर्य़ंत सह्याद्रि पर्वताकडे होत राहिला. येथेच, जंभासुराने पीडीत इंद्रादि देव त्यांना भेटले. कार्तवीर्य सहस्त्रार्जुन, श्रीपरशुराम यांच्यावर, येथेच क्रुपानुग्रह झाला. या सर्व कथा दत्तमहात्म्य या ग्रंथात विस्ताराने येतात. श्रीत्रिपुरारहस्य आणि श्रीविद्येची दीक्शा परशुरामांना याच परिभ्रमणाच्या काळात प्रभूंनी दिली..
हा अवतार मायायुक्तावधुत या नांवाने ऒळखला जातो. अवतार दिवस… जेश्ठ शु त्रयोदशी, वार शुक्रवार, स्वाती नक्शत्रावर सुर्योदयाचे वेळी झाला.

बारावा अवतार– आदिगुरु
मदालसेचा पुत्र अलर्क यास उपदेश करण्यासाठी जो अवतार झाला तो आदिगुरु अवतार. ही कथा पण दत्तमहात्म्यात विस्ताराने येते.मदालसेचा पुत्र अलर्क राजवैभवात गुंतुन गेला. त्याला परमार्थाचे विस्मरण झाले. त्याला वैराग्य उपजावे या पवित्र हेतुने, त्याचा भाउ सुबाहु याने काशिराजाचे सहाय्य घेउन अलर्कावर स्वारी केली. त्याच्या राजधानीला वेढा दिला आणि त्याची रसद बंद केली. अलर्क प्रजाहितदक्श राजा होता. प्रजेची उपासमार त्याला पहावेना. संकटाच्या वेळी उपयोग व्हावा म्हणुन त्याच्या आईने त्याला एक अंगठी दिली होती. उद्विग्न मनाने त्याने ती अंगठी उलगडुन पाहिली.त्यावर एक संदेश लिहीलेला होता.
“असंग रहावे. तसे न जमल्यास संतांची संगती करावी. कोणत्याही गोश्टीची इच्छा करु नये.ते दुःखमुळ आहे.उत्तम संत कॊण ते मदालसेने आधीच लिहुन ठेवले होते. त्याप्रमाणे शोध करत अलर्क सह्याद्रि पर्वताच्या परिसरात आला. भगवान दत्तात्रेयांनी अवधुत रुपाचा त्याग केला आणि आदिगुरु स्वरुपात ते अलर्कासमोर उभे राहिले. त्यांचे चरणी साश्टांग नमस्कार करुन अलर्क म्हणाला, “हे दयानिधी , मला दःख झाले आहे ते आपण दुर करावे अशी प्रार्थना आहे.”
दत्तप्रभूंनी त्याच्या पाठीवरुन प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले ,”हे राजा , दुःख तुला झाले म्हणजे नेमके कोणाला झाले. पाच तत्वांच्या या विनाशी देहाला की मनाला.. तु ते मनही नाहीस आणि देहही नाहीस. अविनाशी असा आत्मा तु आहेस.”
ते शब्द शाब्दे परे च निश्णातं अशा गुरुदेवांचे होते. त्यांचा तात्काळ अलर्काच्या मनावर परिणाम झाला…तो म्हणाला , “महाराज, आपल्या क्रुपेने माझे अध्न्यान संपले. मी ते राज्य सुबाहुला परत करतो आणि आत्मचिंतनात उर्वरित आयुश्याचा सदुपयोग करतो.”
हा अवतार आशाढ शुद्द पोर्णिमा, वार मंगळवार, पहाटेच्या पहिल्या प्रहरी झाला.

तेरावा -अवतार शिवगुरु दत्तात्रेय.
तेरावा -अवतार शिवगुरु दत्तात्रेय.
सह्यगिरीच्या जवळ पिंगलनाग नांवाचा एक कर्मठ ब्राम्हण रहात असे. त्याचे आचरण अत्यंत सनातनी होते. ऎके दिवशी त्याला एका क्रुश्णामलकीच्या(काळा आवळा ) व्रक्शाखाली एक तरुण बसलेला दिसला. त्याच्या मुखावर ब्रम्हतेज पसरलेले दिसत होते. डोक्यावर जटा, अंग धुळीने माखलेले अश्या अवस्थेत तो हातात पोथि घेवुन वेदमंत्रांचा घोश करत होता.
त्याला पिंगलनागाने प्रश्न केला, “हे युवका, तु कॊण आहेस? ब्रम्हचारी म्हणावे तर, कौपिन, कमरेला मौंजीबंधन काहीच नाही. ग्रहस्थाश्रमी म्हणावे तर दुहेरी जानवे दिसत नाही, ते एकेरीच आहे. वानप्रस्थाचे तुझे वय नाही आणि संन्यासी म्हणावे तर दंड नाही कमंडलु नाही, भगवी छाटी नाही. तुझा आश्रम कोणता?तुझ्याजवळ स्त्री व मद्य दिसत आहे, यावरुन असे दिसते की तू सदाचारी नाहीस.म्हणुन तुला वेदपाठ करण्याचा अधिकार नाही. मग तू आहेस तरी कॊण?”
त्यावर दत्तप्रभु म्हणाले. कॊणत्याही प्रकारचा भेद मनात न ठेवता जो जगात विहार करतो आणि त्याकडे आत्मद्रुश्टीने पहातॊ, त्याला पंचमाश्रमी म्हणतात. माझा आश्रम पंचमाश्रम होय. विवेक आणि वैराग्य बाजुला ठेवुन केवळ वर्णाश्रमाचे थोतांड करणारे लोक हा आश्रम समजु शकणार नाहीत.
तेव्हा पिंगलनागाच्या अंतःकरणात प्रकाश पडला व त्याची खात्री झाली की हे अवधुतचुडामणि भगवान दत्तात्रेयच आहेत.त्याने शिवगुरु दत्तप्रभूंना साश्टांग प्रणाम केला.क्शमायाचना करुन अनुग्रहाची विनंती केली.
पुज्य टेंबेस्वामी महाराजांचे शिश्य दिक्शित स्वामी महाराज,औरवाड, यांचे विशयी एकदा स्वतः स्वामी महाराजांनी गौरवॊद्गार काढले होते.”आम्ही फक्त चार आश्रम सिद्द केले पण आमचे शिश्याने मात्र पंचमाश्रम सिद्ध केला.
अवतार दिवस, श्रावण शुद्ध अश्टमी वार सोमवार आहे.

चौदावा अवतार- देवदेवेश्वर..
हा अवतार, शतानंदावर क्रुपा करण्यासाठी घेतलेला अवतार होय. ही कथा मार्कण्डेय ऋशींनी वर्णिलेली आहे.नर्मदेच्या किनारी असलेल्या अरण्यातुन भ्रमण करत स्वामी दत्तात्रेय सह्याद्रि पर्वताच्या माहुरगडाजवळ असलेल्या भागात आले. विशेशतः ही दत्तप्रभूंची जन्मभुमी असल्यामुळे एका पर्वतशिखरावर त्यांनी निवास केला. आपण आज या भागाला दत्तपादुकाशिखर असे म्हणतो.
दत्तप्रभूंचा येथे अतिशय सुंदर आश्रम होता. जनकराजाचे पुरोहित आणि गौतम ऋशींचे पुत्र महामुनी शतानंद तेथे दर्शनासाठी आले. क्रुश्णामलकाच्या छायेत दत्तप्रभु विराजमान होते. सत्यलोकातुन ब्रम्हदेव आणि सर्व देव देवता दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी आल्या. देवदेवतांना तुश्टवण्यासाठी दत्तप्रभूंनी सर्वांना शंखचक्र, आयुधांना धारण करुन दिव्य दर्शन दिले.
हा अवतार, भाद्रपद शुक्ल चतुर्दशी वार शुक्रवार, शततारका नक्शत्रावर झाला.

पंधरावा अवतार– दिगंबर
सोम वंशातील प्रसिद्ध राजा यदुराजाला बोध करण्यासाठी हा अवतार झाला. यदु हा एक थोर दत्तभक्त होता. एकदा वनात फिरत असताना अकस्मात त्याला दिगंबर अवधुताचे दर्शन झाले. त्याने दत्तावधुतांचे चरणी दंडवत साश्टांग प्रणाम केला आणि नम्रपणे बोलू लागला,” महाराज, सर्व लोक संपत्ती, किर्ती, वैभव यासाठी प्रयत्न करताना दिसतात. आपण तेजस्वी, तरुण, आणि समर्थ असुन रानावनात असे का हिंडता बरे?? या वयात बहुधा सारेच जण कामाच्या प्रभावाखाली असतात. परंतु तरुण असुनही ,आपल्या मुखकमलावर जी विलक्शण शांती आहे, ती कशी काय ? आपल्याकडे वैभव नसुनही आपण राजापेक्शा सुखी दिसत आहात.”
यावर, दिगंबर दत्तावधुत म्हणाले , ” आत्मसमाधानाच्या शोधात निसर्गाचे निरीक्शण करत असताना,मी चोवीस गुरु शोधुन काढले. त्यांच्या कडुन मी वेगवेगळ्या प्रकारचे बोध घेतले आणि आत्मसाक्शात्कारापर्यंत जावुन पोहोचलो.तेथे मला शांतीचा आणि आत्मसमाधानाचा पुर्ण लाभ झाला.
कोणी कितीहि अपराध केले तरीही आपण क्शमाशील असावे हा बोध मी प्रुथ्वी पासुन घेतला.
आपले जीवन परोपकारार्थ असावे हा बोध मी पर्वतापासुन घेतला.
प्राणवायु किंवा पंचभुतांपैकी एक असणारा वायु, सर्व विशय़ांच्या संपर्कात येवुनही अलिप्त असतॊ. विशयांपासुन अलिप्त असावे हा बोध मी वायु पासुन घेतला. आकाश सर्वांना व्यापुनही सर्वांपासुन निराळे असते हा बोध मी आकाशापासुन घेतला.जलापासुन मी स्वच्छता आणि मधुरता हे गुण घेतले.अग्नीपासुन तेजस्वी असण्याचा गुण घेतला. चंद्राला क्शय आणि व्रद्धी आहे पण आत्मा हा क्शयव्रद्धिरहित आहे हा गुण मी चंद्रापासुन शिकलो.आपण वैभव मिळवावे व ते परोपकारार्थ देवुन टाकावे हा गुण मी सूर्यापासुन घेतला. अतिस्नेह कॊणावर करु नये हा गुण मी कपोत पक्श्यापासुन घेतला. दैवाने मिळेल त्यात समाधानी असावे हा गुण मी अजगरापासुन शिकलॊ. ऋतुचक्रांचा परिणाम होवु न देता अखंड समस्थिती मी समुद्रापासुन शिकलो. पतंग दिव्यावर झेप घेउन आपले मरण ऒढवुन घेतो तसे विशयांकडे आक्रुश्ट होवु नये हा गुण मी पतंगापासुन घेतला. मधमाश्या मध साठवतात पण त्यांना हाकलुन देवुन त्याचा उपभोग रानावनात फिरणारे लोक घेतात, यापासुन अतिसंचय विनाशाला कारणिभुत होतो हा गुण मी मधमाश्यांपासुन घेतला. हत्तिणीच्या स्पर्शासाठी हत्ती तिच्या मागे लागतॊ व जाळ्यात अडकतो तसे शहाण्याने स्त्रीच्या मागे लागुन बंधनात अडकु नये हा गुण मी हत्ती पासुन घेतला.

नादाला लुब्ध होवुन हरिण पारध्याच्या तावडीत सापडते तसे माणसाने विशयात लुब्ध होऊन आयुश्याचा नाश करु नये हे मी हरिणापासुन शिकलॊ. मासा ज्याप्रमाणे आमिशाला बळी पडतो त्याप्रमणे विशयास बळी पडू नये हा बोध मी माश्यापासुन घेतला. परपुरुशाची व धनाची अपेक्शा करत पिंगला रात्रभर जागली. खोट्या आशेने आयुश्याचा नाश करु नये हा बोध मी पिंगलेपासुन घेतला.टिटवी मांसाचा तुकडा चोचीत घेउन उडते व इतर पक्शी तिच्यावर हल्ल करतात. जेव्हा ती तो तुकडा टाकुन देते तेव्हा सुखी होते. मनुश्य आपले जवळ असलेल्या धनाचा त्याग करतॊ तेव्हा सुखी होतो हा बोध मी टिटवी पासुन घेतला. हा बोध मी टिटवीपासुन घेतला.लहान मुलास आईने त्रुप्त होईपर्यंत पाजले व ठेवुन दिले की ते स्वतःशीच खेळते त्याप्रमाणे आत्मक्रीड असण्याचा बोध मी बाळापासुन घेतला. एका ब्राम्हणाच्या घरी अतिथी आले असताना त्याच्या कन्येने धान्य कांडले. कांकणाचा आवाज होतो म्हणून सर्व काकणे काढून फ़क्त दोनच ठेवली. तसे अनेकंमधे आपण राहीलॊ तर कलह निर्माण होतो हा बोध मी त्या कुमारीच्या काकणांपासुन घेतला. सर्प जसा लोकांतापासुन दुर गिरीकंदरात रहातॊ तसे आपण रहावे हा बोध मी सर्पापासुन घेतला.ज्याप्रमाणे लोहार बाणाचे टोक तयार करताना एकाग्र होतो त्याप्रमाणे एकाग्र होऊन ब्रम्हचिंतन करावे हा बोध मी लोहारापासुन घेतला. कुंभारिणिने घरात ठेवलेली अळी ज्याप्रमाणे तिचा ध्यास घेउन कुंभारिण बनते तसे ब्रम्हाचा ध्यास घेउन आपण ब्रम्हरुपच बनतो हा बोध मी कुम्भारिणी पासुन घेतला. कॊळी जाळे विणुन पुन्हा ते आपणच आवरुन घेतो त्याप्रमाणे ईश्वर विश्व तयार करुन ते पुन्हा आपल्यात सामवुन पुन्हा एकटाच उरतो हा बोध मी कोळ्यापासुन घेतला.
फार काय सांगु, माझ्या देहाकडे पहा, मी त्याकडे पाहुन वैराग्याचे चिंतन करतो त्याप्रमाणे तू पण सर्व स्रुश्टी कडे पाहुन बोध घे व ब्रम्हचिंतनात मग्न हो, हा अक्शय सुखाचा मार्ग आहे.
याच अवतारात महाभक्त प्रल्हादाला दत्तप्रभूंनी आत्मसुखाचा बोध केल्याची कथा श्रीमद भागवतात येते. ब्रम्हदेवाचे मानसपुत्र धर्म ऋशी आणि प्रजापती दक्शाची एक कन्या साध्या यांचे पुत्र साध्यदेव यांचेवर याच अवतारात अनुग्रह झाला.
हा अवतार अश्विन शुद्ध पोर्णिमा वार बुधवार, अश्विन नक्शत्रवार झाला…

सोळावा अवतार–श्रीक्रुश्णश्यामकमलनयन
अनेक भक्तांचा उपदेशाने उद्धार करुन भगवान दत्तात्रेय क्रुत्क्रुत्य भावनेने ध्न्यानरुपी शय्येवर पडले. क्रुतार्थ झालेल्या सर्व भक्तांना त्यांचे मनोहर दर्शन ज्या रुपात झाले तो क्रुश्णश्यामकमलनयन अवतार होय.
दत्तप्रभू सर्व भक्तांना म्हणाले की धर्मयुक्त जीवन जगत तुम्ही माझे ध्यान करा. जसा मी सर्व अवतारात भक्तांना स्वतःला समर्पित झालो तसेच माझे अनन्यप्रेमाने चिंतन करणारे भक्त त्यांनाही मी आत्मसमर्पण करीत आहे.
हा अवतार कार्तिक शु. द्वादशी, बुधवार रेवती नक्शत्र या दिवशी झाला.

Advertisements

~ by manatala on जुलै 27, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: