यात्रा अमरनाथची…

हिमालयातील ही सगळ्यात खडतर यात्रा मानली जाते. श्रावण महिन्यात ही यात्रा गुरुपौणिर्मेस सुरू होऊन रक्षाबंधनला संपते. जम्मू-काश्मीर राज्य सरकार, जम्मू-काश्मीर पोलिस व भारतीय सैन्याच्या मदतीने ही यात्रा आयोजित केली जाते. दरवषीर् यात्रेच्या तारखांमध्ये थोडाफार फेरबदल केला जातो. यंदाही यात्रा ३० जून २००७ ते २८ ऑगस्ट २००७ या काळात आयोजित केली जाणार आहे. ही यात्रा कायमच दहशतवाद्यांचे लक्ष्य असूनही दरवषीर् यात्रेकरूंची संख्या वाढत आहे.

अमरनाथला जाण्याचे दोन मार्ग : एक बालताल मार्ग आणि दुसरा पहेलगाम मार्ग. यात्रेकरूंना जाण्याचा मार्ग प्रथम ठरवून त्या प्रमाणे बुकिंग करावं लागतं. बालतालमागेर् अमरनाथ गुहा हा साधारणत: १६-१७ किमी खडतर चढणाचा मार्ग आहे. पण बालतालहून यात्रेकरू अमरनाथ गुहेस एका दिवसात पोहोचू शकतात, पण पेहलगामहून येणाऱ्या यात्रेकरूंना मात्र एक दोन मुक्काम करून अमरनाथ गुहा गाठता येते. यात्रेकरूंना बुकिंग करताना दर्शनाचा दिवस दिला जातो, तेव्हा जो मार्ग बुक करायचा आहे, त्याला लागणारा अवधी लक्षात घेणं आवश्यक आहे.

मुक्काम आणि खाण्यापिण्याची सोय : यात्रेच्या रस्त्यावर काही ठिकाणी रात्रीच्या मुक्कामासाठी तंबूंची सोय केली जाते. तसंच जेवणाच्या सोयीसाठी वाटेत अनेक ठिकाणी लंगरची व्यवस्था असते. यात्रेकरूंना नि:शुक्ल भोजन दिलं जातं.

अशी घडते यात्रा : ज्या यात्रेकरूंना यात्रा पेहलगामहून करायची असेल, त्यांना जम्महून यात्रेकरूच्या जथ्यातून पेहेलगामला येता येते अन्यथा प्रथम जम्मूहून श्रीनगरला जाऊन तिथे अतिरिक्त सामान हॉटेलमध्ये ठेवून नंतर पेहलगामला येता येतं. पेहेलगाम ते चंदनीवाडी हा दोन किमीचा रस्ता बस किंवा जीपने पार करता येतो. चंदनवाडीतून यात्रेकरूंची खडतर यात्रा सुरू होते. यात्रेकरूना ही यात्रा डोली किंवा घोड्यानेही करता येते. डोली आणि घोड्याचे दर ठरलेले असतात. यात्रेकरू पूर्ण यात्रेसाठी घोडा करू शकतात वा पॉइण्ट टू पॉइण्ट करू शकतात. यात्रेकरू सामान उचलण्यासाठी हमाल (पिट्टू) ची सोय असते. यात्रेकरूची पहिली खडतर परीक्षा पिसू टॉप चढतानाच होते. चंदनवाडीहून पिसू टॉप पार करून यात्री १३ किमी अंतरावर रात्रीच्या मुक्कामास शेषनागला राहू शकतात. इथे शेषनागचे तळे अत्यंत मनोहारी आहे. शेषनाग हे समुदसपटीहून ३,५७३ मीटर उंचीवर आहे तर चंदनवाडी २,८९५ मीटर उंचीवर आहे, त्यामुळे काही यात्रेकरूंना वातावरणाशी जुळवून घेण्यास त्रास होतो, पण यात्रेत सर्वत्रच वैद्यकीय मदत चोख असते. शेषनागहून १३ किमी अंतरावर पंचतरणी हे ठिकाण आहे, जिथे जाताना यात्रेकरूंना दुसऱ्या खडतर परीक्षेस तोंड द्यायला लागते, ते म्हणजे महागणेश वा महागुणस टॉप पार करणं. यात्रेकरू पंचतरणीस रात्रीचा मुक्काम करू शकतात. व अजून सहा किमी अंतरावर असलेल्या अमरनाथ गुहेतील शिवलिंगाचे दर्शन तिसऱ्या दिवशी घेऊ शकतात. पंचतरणी ते गुहा या रस्त्यात संगम या ठिकाणी बालतालहून येणारे यात्री पेहलगामहून येणाऱ्या यात्रेकरूंना भेटतात. शिवलिंगाचे दर्शन झाल्यावर यात्रेकरू पेहलमागमागेर् परतू शकतात वा बालतालमागेर्ही परत जाऊ शकतात.

बालतालहून अमरनाथ गुहेस जाणाऱ्या यात्रेकरूंना जम्मूहून प्रथम श्रीनगरला यावे लागले. बालताल हे ठिकाण श्रीनगर ते

सोनमर्ग या रस्त्यावरून आहे. आजकाल अमरनाथ जाण्यास हेलिकॉप्टरची ही सेवा उपलब्ध आहे. यात्रेच्या दोन्हीही मार्गावर सैन्याचा कडा पहारा असतो.

Advertisements

~ by manatala on जुलै 20, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: