अमेरिकन इफेक्ट’मुळे निर्देशांक पुन्हा एकदा कोसळला
मुंबई – आठवड्याच्या सुरवातीपासून मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात होत असलेली घसरण गुरुवारीही कायम राहिली. गुरुवारी बाजार सुरू होताच निर्देशांक तब्बल ६०० अंशांनी कोसळला. घसरणीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक पुन्हा एकदा १३ हजारांच्या खाली गेला.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही गुरुवारी सकाळी घसरण झाली. निफ्टी १७९ अंशांनी घसरला.
आशियातील इतर बाजाराचे निर्देशांकही गुरुवारी तीन ते चार टक्क्यांनी घसरले. त्यापार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजार निर्देशांक कोसळणे अपेक्षित होते, असे काही शेअर दलालांचे मत आहे.
“वॉल स्ट्रीट’च्या निर्देशांकाने बुधवारी गेल्या तीन वर्षांतील निच्चांकी पातळी गाठली. अमेरिकेतील “अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुप’च्या (एआयजी) मदतीला “फेडरल रिझर्व्ह’ बॅंक धावून आली असली, तरी गुंतवणूकदारांमध्ये त्यामुळे फारसा विश्वास निर्माण झाला नाही. यासर्वाचा परिणाम गुरुवारी मुंबई शेअर बाजारावर झाला.
अमेरिकेतील आर्थिक क्षेत्रातील दिवाळखोरीची छाया गेला आठवडाभर मुंबई शेअर बाजारावर कायम राहिली आहे.




तुमचा अभिप्राय नोंदवा