दुर्गादेवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं ।।

अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीं

वारीं वारीं जन्ममरणातें वारीं ।।

हारी पडलों आतां संकट नीवरीं ।। ।।

जय देवी जय देवी महिषासुरमथिनी ।।

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी।। जय. ।। धृ.।।

त्रिभुवनभुवनीं पहातां तुजऐसी नाहीं ।

चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं ।।

साही विवाद करितां पडले प्रवाहीं ।।

ते तूं भक्तांलागीं ते तूं दासालागी पावसि लवलाही ।। जय. ।। ।।

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा ।।

क्लेशापासुनि सोडीं दु:खापासुनि  सोडीं तोंडीं भवपाशा ।।

अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।।

नरहरि तल्लिन झाला पदपंकज लेशा ।। जय.।। ।।

~ by manatala on ऑक्टोबर 22, 2007.

तुमचा अभिप्राय नोंदवा