दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे

दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
त्या आठवनींचा उमाळा आला की
मन भारावुन जाते पावसाप्रमाण
पावसाचा प्रत्येक थेम्ब आठवण करून देत
त्या भारवलेल्या क्षणाप्रमाण पण त्या
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे || १ ||

सारे जग आडपडदा होऊन  गेल
नदीप्रमाण सगळ कही वाहून नेल
मनातल्या आठवनीना ऊजळ करून गेल
सार काही होऊन गेल पण त्या 
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे || २ || 

कौलेजमधले क्षण निघून गेले
जीवनातले आनंदी क्षण निघून गेले
कामाच्या व्यापाने जीवन निघून गेले
आजही आठवते त्या पान्यातल्या नावा पण

दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे || ३ ||
ज्या क्षणाची वाट पहात होतो
त्या क्षणाला विसरू पहात होतो
जीवनाचा रंग मनात शोधत होतो
काही राहून गेल याप्रमाण मन हरविणार होत पण त्या

दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे || ४ || 

कवि : संदीप (शांतात्मज)

~ by manatala on सप्टेंबर 18, 2007.

One Response to “दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे”

  1. ati sunder

तुमचा अभिप्राय नोंदवा