सुख दु:खाच्या आठवणी

फूलापाखरांच्या विश्वात
रंगीबेरंगी रंगात
विसरून जा या जगाच्या
सुख दु:खाच्या आठवणी ||१||

इन्द्रधनुशाच्या सात रंगात
प्रत्येक रंगाच्या  धुंद प्रकाशात
चराचराच्या वातावरानात
विसरून जा या जगाच्या
सुख दु:खाच्या आठवणी ||२||

निसर्गातल्या प्रत्येक पावसात
पावसाच्या त्या प्रत्येक थेम्बात
विसरून जा या जगाच्या
सुख दु:खाच्या आठवणी ||३||

 कवि : संदीप (शांतात्मज)

~ by manatala on सप्टेंबर 14, 2007.

तुमचा अभिप्राय नोंदवा