भावनाविवश आवेश थाम्बणार कधी
क्षणाक्षणाला आठवतो आहे
मनातल्या विचारांचा आक्रोश
ज्वालामुखीप्रमाणे फाटनारा हा
भावनाविवश आवेश थाम्बणार कधी ||१||
किती म्हणून सहन करायच
आपल मन आपणच समजावयाच
कळणार आहे का कधी या जगाला
भावनाविवश आवेश थाम्बणार कधी ||२||
सरकारी धोरण पड़तात कधी
आपल्या गोटात मातीच माती
ज्वलंत प्रश्नाला उत्तर देणार कधी
भावनाविवश आवेश थाम्बणार कधी ||३||
कवि : संदीप (शांतात्मज)




तुमचा अभिप्राय नोंदवा