गोपाळकाला-दहीहंडी
गोपाळकाला , गोकुळाष्टमी , कृष्णजन्मोत्सव अनेक ठिकाणी धामिर्क विधींच्या स्वरूपात साजरे होतात. पण ‘ दहीहंडी ‘ चा उत्सव झाला तो खऱ्या अर्थाने मुंबईत आणि त्याचा आधार राहिला मुंबईतला कोकणी माणूस. कृष्णजन्म आणि गोकुळाष्टमी थेट मथुरेपासून उत्तर भारतातल्या अनेक शहरांत साजरी होते पण ‘ दहीहंडी ‘ चं ‘ क्रीडाक्षेत्र ‘ मुंबईच आहे! असा मुंबईतला ‘ दहीहंडी ‘ च्या सार्वजनिक उत्सवाचा इतिहास हा गेल्या १०० वर्षांतला आहे. ‘ सत्यनारायणा ‘ ची पूजा ही जशी १९०५ पूवीर् कुठे-कुणी-कधी केल्याचा उल्लेख नाही , किंबहुना भारतीय पूजाविधीपेक्षा आगळ्या-वेगळ्या स्वरूपाची ही सत्यनारायणाची पूजा त्याच्या त्या चमत्कारांनी भरलेल्या कथेसह केव्हा कुठून आली आणि रुजली यावर अजूनही मतमतांतरं आहेत. तसंच ‘ दहीहंडी ‘ साठी मानवी थर रचून ‘ दहीहंडी ‘ फोडण्याची आणि ‘ गोकुळाष्टमी ‘ साजरी करण्याची प्रथा नेमकी कोणी , कुठे सुरू केली आणि तिला सार्वजनिक मान्यता आणि लोकप्रियता मुंबईत कुणामुळे मिळाली , याचे अचूक उल्लेख उपलब्ध नाहीत. पण सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय जागृती आणि ऐक्याच्या प्रेरणेतून सुरू झाला. त्याच सुमारास मुंबईत , विशेषत: कोकणी मराठी माणसाच्या मध्य मुंबईतल्या लालबाग , परळ , दादर आणि गिरगाव या परिसरात ‘ दहीहंड्यां ‘ ची प्रथा सुरू झाली , असं म्हणतात.मुंबई शहराचे खास असे जे उत्सव आहेत त्यापैकी ‘ दहीहंडी ‘ हा ‘ एक्सक्लुझिवली ‘ मुंबईचा म्हणता येईल. गणेशोत्सव रोषणाईमुळे पुण्यात अधिक लोकप्रिय आहे तर भव्य गणेशमूतीर् हे मुंबईचं आकर्षण आहे. पण दहीहंडी बघावी तर मुंबईतच. मुंबईत हजाराहून अधिक छोटीमोठी मंडळं दहीहंडीच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर कार्यरत असतात. पूर्वतयारी , नियोजन आणि सराव करून ज्यामध्ये समूहाने लोक सहभागी होतात असा ‘ दहीहंडी ‘ हा एकमेव उत्सव किंवा क्रीडाप्रकार असावा.



![UT 3, 4 & The Milky Way [video] UT 3, 4 & The Milky Way [video]](http://static.flickr.com/2633/4135738280_d16c9dd389_t.jpg)
तुमचा अभिप्राय नोंदवा