आषाढी एकादशी…

आषाढ शुद्ध एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे

एकांताचे सुख देई मज देवा ! आघात या जीवा चुकवोनि !! १ !!

ध्यानी रूप वाचे नाम निरंतर ! आपुला विसर पडों नेदीं !! धृ !!

मायबाळा भेटी सुखाची आवडी ! तैशी मज गोडी देईं देवा !! २ !!

कीर्ती ऐकोनिया झालो शरणागत ! दासांचे तूं हित करितोसी !! ३ !!

तुका म्हणे मी तों दीन पापराशी ! घालावें पाठीशी मायबापा !! ४ !!

बोला पुंडलीक वरदे हारी विठ्ठ्ल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय !!

जय जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल !!

~ by manatala on जुलै 31, 2007.

तुमचा अभिप्राय नोंदवा