खास वर्‍हाडी उखाणा

नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सरवान्चा
……. चे नाव असते ओठावर पण प्रश्न असतो उखाण्याचा.

बंगलोर उटी म्हैसूर म्हणशिल तिथे जावू….
– घास घालतो, बोट नको चावू….

समानतेचे युग आहे, श्रमांची करु वाटणी
तू कर पोळ्या आणि मी करते चटणी

चहा पिऊन, धुतली कप्-बशी.
XXX सोडुन, बाकी सगळ्या म्हशी!

मांडवाच्या द्वारी पडली होती खोरी
….. सोडुन बाकी सगळे जर्शी गोर्‍ही.

आजघरात माजघर
माजघरात खिडकी
खिडकीत ठिवलं होतं खुरपं
मी ह्यांच्यावर गुरकं अन ते माझ्यावर गुरकं

गोदावरीच्या नदीत
पडला होता धोंडा
….. च्या डोक्यात
मणभर कोंडा  

तीन ओळींच्या कवितेला म्हनतात हायकू
तीन ओळींच्या कवितेला म्हनतात हायकू
— व्हय माहा नवरा अन म्या व्हय त्याची बायकू

इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले ग पाय!
विशालराव अजुन आले नाहीत, पिउन पडले की काय!!

——————————

शिडीवर शिडी बत्तीस शिडी!
विशालराव ओढतात बिडी, न मी लावते काडी!!

——————————

बागेमधे असतात गुलाबाच्या कळ्या!
विशालरावाचे दात म्हणजे दुकानातल्या फळ्या!!

——————————

गोव्यावरुन आणले काजु!
विशालरावांच्या थोबाडात वाजवायला मी कशाला लाजु!!

~ by manatala on जुलै 27, 2007.

One Response to “खास वर्‍हाडी उखाणा”

  1. fdsa

तुमचा अभिप्राय नोंदवा